Phiniks (फिनिक्स) - डॉ. उमेश कळेकर
Phiniks (फिनिक्स) - डॉ. उमेश कळेकर

Phiniks (फिनिक्स) - डॉ. उमेश कळेकर

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

- डॉ सुनील दादा पाटील, संपादक आणि प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर सुदर्शन, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र मोबाईल - 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com Dr. Sunil Dada Patil Editor and Publisher of KavitaSagar Publication, Jaysingpur Sudarshan Palace, Plot # 16, Padmavati Society, Near Nandani Naka, Bypass Road, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India Ph: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com - झुळझुळत्या प्रवाहाबरोबर नृत्य करता करता ज्यांनी सुरांचे गंध कधीच उधळले नाहीत, एखाद्या चांदण्या रात्री चांदणीचे रूप हातात घेऊन ते पाहताना ज्यांचे डोळे कधीच लखलखले नाहीत, डोळ्यांनी बोलणा-या मुक्या प्राण्यांच्या पाठीवरून ज्यांनी कधीही आपला मऊ हात फिरविला नाही, कथा, कविता, संगीत, साहित्य, नृत्य यांच्यावर ज्यांनी कधीच प्रेम केले नाही ती माणसं आयुष्यात दुर्दैवी असतात. पण, मी सुदैवी आहे, त्याचे कारण संगीताबरोबरच साहित्यावर प्रेम करणारे डॉ. उमेशजी कळेकर यांचा सहवास मला लाभला व या सर्वांचा परिपाक म्हणून ‘फिनिक्स’ या जातिवंत साहित्य कलाकृतीची (काव्यसंग्रहाची) प्रस्तावना लिहिण्याची संधी मला मिळाली हेच मी माझे परमभाग्य समजतो. खरं तर ‘फिनिक्स’ हा पक्षी जरी कल्पनेतील असला तरी शून्यातून विश्व किंवा स्वतः बेचिराख होऊनही नवजीवन प्राप्त करून घेणारा पक्षी. याची प्रेरणा घेऊन उध्वस्त झालेल्या मानवी मनांना नव चेतना देणारा हा काव्यसंग्रह, जीवनाच्या वेगवेगळ्या वाटांवरती मनोमिलन साधतो हीच या काव्यसंग्रहाची खासियत. कविता हा कवी आणि रसिक यांच्यातील सुसंवाद असतो व कवितेचा आस्वाद हा सुद्धा एक विलक्षण आनंददायी अनुभव असतो. याची प्रचीती याचं काव्यसंग्रहात मिळते. ‘फिनिक्स’ ही तर मुखड्याची कविता. तसं माझं बरं आहे हे तुझं खरं आहे अजून पुरता मोडलो नाही डगमगत्या पायांनी तरलो आहे. शस्त्रांच्या घावापेक्षा शब्दांचे घाव जीव घेणे असतात... पण डगमगणारी पावलं जेंव्हा भावानुभावानी जीवनाच्या वाटेवरून खंबीरपणे चालू लागतात, तेथेच ‘काजळलेल्या’ आयुष्याची प्रकाशवाट व त्याचं वाटेवर असणारा ‘फिनिक्स’ सारखा ‘दीपस्तंभ’ जीवनाची नवीन वाट दाखवितो. मानवी जीवनाच्या कुरुक्षेत्रावर ‘वयम् पंचाधिकम् शतम्’ हा आपपर भाव विसरून ‘कौरव’ मधील मुखवट्या आडचे मुखडे हेच सांगतात… वेगळे नव्हते काही, वेगळे डोळेच होते गोड शब्दांच्या तळाशी झाकलेले पेच होते. ही दुखरी वेदना डॉ. कळेकर तेवढ्याच ताकतीने मांडतात. ‘फिनिक्स’ मधील गझलसाद हृदया मधील स्पंदनांना साद घालतांना... पापण्यांना प्रतीक्षा तुझ्या आगमनाची मिटलेल्या या लोचनी अश्रू थांबलेला तहानलेला चातक थेंबासाठी घायाळ कलेवरावर त्याचा ढग ओथंबलेला. अशा व्याकूळ वेदनांना अखेर कागदावरच वाट सापडते, ती अशी. घरातल्या व्यक्तींना कवी जे सांगू शकत नाही ते तो कागदाला सांगू शकतो. म्हणून इथं मला अमृता प्रितम याचं एक वाक्य आठवत ते असं... ‘माझ्या लेखणीचा प्रियकर कागद आहे.’ डॉ. कळेकर यांचं लेखणी व कागदाशी असणारं नातं या पेक्षा वेगळ कसं असेल? कविता अशी जागोजागी, सर्व प्रवाहातून मांडून ठेवलेली असते. आपण कवितेच्या क्षणी पोहचणं महत्वाचं असतं. जो पर्यंत जगणं, जगविणं, जागविणं हे हातात हात घालून चालत असतात, ‘ती वेळ’ साधून केलेलं ‘मागणं’ विचारांची एक नवी श्रीमंती देऊन जाते. शिक्षक म्हणून माझी एक श्रद्धा आहे ती अशी... ‘शेतकरी विसरेल पण बिया उगवायचं विसरणार नाहीत.’ या कवितेतील विचारांची बीजं सुद्धा ताठ कण्याने पेटत्या पाण्यामधून सुद्धा तरारून अंकुरतील. या काव्यसंग्रहात गझल, चारोळी, रुबाई या काव्य प्रकारांचही ‘रूप लहान पण आशय महान’ या अर्थानं यथार्थ दर्शन घडवीलं आहे. केवळ चार ओळीत जीवनाचं सारं तत्वज्ञान चारोळीकरांनी मांडलेलं असतं. जीवनातील अनेक पैलूंवर त्यांनी प्रकाशझोत टाकलेला असतो. ‘कृष्णामाई’ च्या तीरावरील हा भावसंपन्न कवी नदीला लडिवाळ प्रश्न विचारतो. कृष्णामाई तुला विचारावसं वाटतं कुशीतल्या लेकरांवर कुणी इतकं का रागवतं? खरं म्हणजे ‘नदी’ हे आईचं प्रतीकात्मक रूपच डॉ. कळेकर शब्दामधून चितारतात. ‘प्रेमस्वरूप’ आईचे दर्शन घडते ते इथेचं. तसं पाहिलं तर स्त्री ही क्षणाचीचं पत्नी वा ‘सखी’ असते, पण अनंतकाळची माता असते. ते सुद्धा अवखळ वय असतं. जेंव्हा झुल्यावर बसून प्रेमीक प्रेमाचा गोफ विणतात आणि मग काळजाचा ठोका चुकविणारे क्षण आपणास गंधीत करतात. नाही म्हणावयाला इतके घडून गेले कुठल्या तरी क्षणाला मी मोहरून गेले दारात यौवनाच्या पाऊल ठेवता मी कित्तेक काळजाचे ठोके चुकून गेले! ‘प्रिया’ दारी उभी राहते ती याच अर्विभावात. डॉ. कळेकर प्रेम जखमा येथेच सुगंधित करतात. हा हळवा कवी जेंव्हा ‘रात्र’ जागवितो तेंव्हा अशीच वेदना त्यांच्या कवितेतून जन्म घेते. आसवांची एक माला रात्र झरते श्रावणी दूर तू महालात राणी कढत भिजते पापणी लाख अश्रूंच्या थेंबात प्रियेची प्रतिमा जपणारा हा कवी, या प्रतिभासंपन्न कवीचं दर्शनही इथंच घडतं. तसे डॉ. कळेकर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत पण कविमन घेऊन जन्माला आलेले. जेंव्हा ते माणसांवर आणि माणुसकीवर ही ‘इलाज’ करतात तेंव्हा ते ‘शब्दवैद्य’ अ‍ॅप्रन मधून प्रेम आणि वेदना या दोन परस्पर भिन्न रोगावर केवळ ‘शब्दांची शस्त्रक्रिया?’ ती पण हृदयस्पर्शी लेखणीने? केवढी अजब किमयागारी आहे, नाही? आपल्या व्यवसायातील खाचाखोचा रसिकांपर्यंत आणून पेशंटनाही ‘शहाणपणाचे बाळकडू’ पाजतांना या व्यवसायात लपलेलं मर्म काव्यप्रेमींना डोळस करण्यासाठी ‘अंजनाची’ मात्रा ठरतात. नुसतं तोंड बघायला पैसं लागत्यात द्यायला डॉक्टर नाही कन्सल्टंट म्हंत्यात त्याला ५०० रु. औषधाची चिट्ठी बघून तेचा खोकला बिन औषधाचा गेला आईच्यान सांगतो आजपावतर त्याला खोकलाच नाही आला. डॉक्टर आणि पेशंट यांचं नात अत्यंत विनोदाच्या झालरीतून विणण्याची एक वेगळी मौज आणि त्यातले गुपीत सांगण्याचे धाडस केवळ शब्दशहाणेचं करू शकतात. ‘तेथे पाहिजे जातीचे’ शब्दवेधी कळेकरांचे या काव्यसंग्रहात ‘कन्सल्टंट व जी. पी.’ काव्यरसिकांना अजाणतेपणातील वेगळी जाणीव देऊन जातात. डॉक्टर पेशंटना बरं करतात, पण खेडेगावातील दवाखान्याच्या समोरील पारावर बसलेले ‘विलेक्शन’ प्रेमी यांनाही ते ‘रसिकरंजन हॉस्पिटल’ मध्ये अ‍ॅडमीट करतात. अमक्यानं मताला तमकं दिलं तमक्यानं मताला कोंबड दिलं बांबलीच्यानं रात्रीतनं मतदान फिरवून कसं सुक्काळीच्याला लांबड केलं? जाता जाता वरवर फुकट वाटणा-या जेवणावळी व ‘दारूचं बॅरल’ यात गुंग होऊन सुध्दा एक विदारक सत्य सांगून जातांना डॉ. कळेकर ‘अत्यंत हळुवार’ हातानं ‘ड्रेसिंग’ करतात व ‘प्रिस्क्रिप्शन’ देतात. खरं हाय गड्यांनो, हे काय बी खरं न्हाई कुणी बी आला नी गेला, राबल्याबगार थारा न्हाई आईच्यान सांगतो, पूडल्या विलेक्शन पातुर विलेक्शनच्या लडतरीत पडणार न्हाई! खरंय, डॉक्टर साहेब, जे निसटून जातं, ते धरून ठेवण्यासाठी शब्दसाधना लागते. सगळीच हुरहूर व्यक्त करता येणारे आपल्यासारखे शब्द साधक थोडेच? आपल्याला जे भावते, जी हरवते ती असहायता व सत्य भावना व्यक्त करण्यासाठी केवळ कविताच कामी येते. डॉ. उमेशजी कळेकर हेच ‘शब्दप्रभू’ आहेत म्हणूनच, मी जे कांही ‘वाचलं आणि वेचलं’ या शिदोरी मधून माझे भाव प्रगट करण्यासाठी सांगेन, शब्दातून मज राऊळ भेटे, अर्थांचे मज दिवे त्या तेजातून मला गवसती दिवे आणखी नवे मातीचे निजधाम सोडूनी, अंकुर वळती जिथे त्या गंधातून, त्या स्पर्शातून वाट नवी गावते टळे अमंगळ, दिशा सुमंगल ही कुठली पुण्याई आनंदाहून हृदया मधल्या, दुसरी कविता नाही! धन्यवाद! डॉ. उमेशजी आपल्या काव्यप्रवासास आमच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा! श्री. डी. डी. कुडाळकर