Razakar (रझाकार) - अशोक दादा पाटील (बेळगाव)
Razakar (रझाकार) - अशोक दादा पाटील (बेळगाव)

Razakar (रझाकार) - अशोक दादा पाटील (बेळगाव)

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

KavitaSagar कवितासागर o Registered with the International ISBN Agency, London, UK and The Government of India, Ministry of Human Resource Development, New Delhi o Title - Razakar (रझाकार) o Author - Ashok Dada Patil (अशोक दादा पाटील) शाकुंतल अपार्टमेंटच्या मागे, हेरवाडे कॉलोनी, जयसिंगपूर - 416101, जिल्हा - कोल्हापूर संपर्क : 02322 - 226102, 8793531760, 9075581838, 9075581838 o Year of Publication - March 08, 2015 (मार्च 08, 2015) o Edition's - First (प्रथम आवृत्ती) o Volume - One (खंड पहिला) o Price - Rs. 75 /- (मूल्य 75 /- रुपये) o Subject - Sociological Novel (समाजशास्त्रीय कादंबरी) o Language - Marathi (मराठी) o Total 76 Pages including covers. o Copyright © Ashok Dada Patil अशोक दादा पाटील All rights reserved. No part of this publication may be reproduced, stored in a retrieval system or transmitted, in any form or by any means, electronic, mechanical, photocopying, recording or otherwise, without the prior permission of the copyright holder. Only the publisher can export this edition from India. Due care has taken to ensure that the information provided in this book is correct. However, the publishers bear no responsibility for any damage resulting from any inadvertent omission or inaccuracy in the book. o Published in India in 2015 by - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील) On Behalf of KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन) Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India 02322 - 225500, 09975873569, kavitasagarpublication@rediffmail.com, sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com, www.KavitaSagar.com o Typesetting by - Dhudat Desktop Publishing Center o Cover Design by - Shrikant Shinde (श्रीकांत शिंदे) o Printed and Bound in India by - KavitaSagar Printing Services o Views expressed in this book are entirely those of the respective Authors and do not represent the opinions or thoughts of the Publisher दर्पण… माननीय श्री. अशोक दादा पाटील रहाणार शेडबाळ, तालुका - अथणी, जिल्हा - बेळगांव, कर्नाटका; हे एक वयोवृद्ध, तपोवृद्ध असे लेखक असून त्यांनी ‘रझाकार’ या नावाची समाजशास्त्रीय लघु कादंबरी नुकतीच लिहिली आहे. डॉ. सुनील दादा पाटील या सुजाण व अभ्यासू प्रकाशककाने ‘कवितासागर’ या प्रकाशन संस्थेमार्फत ती प्रकाशित करीत असून सदर कादंबरीच्या समीक्षेचे काम माझेवर सोपविले आहे. आमचे ज्येष्ठ बंधू श्री. अशोक दादा पाटील यांच्या ‘रझाकार’ कादंबरीचे आपण प्रथम स्वागत करू या. साहित्याचे सानंद स्वागत म्हणजेच एका साहित्यिकाला उभे करणे असा त्याचा साधा अर्थ आहे. प्रत्येकाची अनुभूती वेगळी, तसा त्यांचा समज - उमज ही आगळा वेगळा असू शकतो; अशाच भावनेने त्या लिखाणाकडे वाचकांनी पहावे. खरे तर डोळस समीक्षेमुळे साहित्याचे शितिज समृद्ध होऊ शकते, अशा विचारसरणीचा मी आहे. गुणावगुणांचे दर्शन घडविणे आणि न्यूनगंड - अहंगंड यातील अंतर कमी करणे हा ही समीक्षेचा मुख्य उद्देश असतो. हे सगळे जरी खरे असले तरी समीक्षा करतांना साहित्यिकास नाउमेद करावे असे मात्र आम्हांस कधीच वाटत नाही! असो... ‘रझाकार’ ही स्वातंत्र्य पूर्व इतिहास काळातील झलक दाखविणारी कांहीसे सत्य व कांहीसे काल्पनिक कथानक असलेली अशी छानशी संमिश्र कथा गुंफली आहे. त्या काळातील जाती धर्मातील भांडणे म्हणजेच हिंदू - मुस्लीम या समाजात दुही पाडून, भांडणे लावून, जाळपोळ करून, झुंडशाही निर्माण करून स्वतःची तुमडी भरणारी, स्वार्थ साधणारी आणि विकार वासनांचे सोस उपभोगणारी एक टोळीच निर्माण केलेई होती. दहशतवादी दबदबा निर्माण करून समाजात सर्वदूर भीतीचे वातावरण पसरविले होते. ही सर्व दुष्कृत्ये ‘रझाकार’ नावाने ओळखल्या जाणा-या म्होरक्याची म्हणजेच एका खलनायकाचीच दिसतात. सदर कथेतील काळाचा बोध स्वातंत्र्य पूर्वकाळातील असावा असा जाणवतो. त्याचे कारण असे की, त्या कळत स्वामी रामानंद तीर्थ स्वातंत्र्यासाठी तथा समाजधारणेसाठी कार्य करीत होते हे सर्वश्रुत आहे. असे कांही दाखले यात मिळतात; म्हणून तो स्वातंत्र्यपूर्व काळातील घडामोडीचा, चळवळीचा इतिहास जाणवतो. अगदी रणरणत्या उन्हात प्रचंड वटवृक्ष डेरेदारपणे थंडगार सावली देतो तेही निरिच्छपणे! मानवीमन असे होईल का? अशी कांही वाक्ये - विचारांना थंडावा व शांती प्रदान करून जातात. ‘रझाकार’ व्यक्ती म्हणून दृष्ट होता, व्यभिचारी व मांसाहारी होता पण शाकाहारी बाई माणसास मांस शिजविणेस भाग पाडीत नव्हता. मांसाहार खाणेस जोर जबरदस्ती करीत नसे, इतकेच नव्हे तर दारू पिऊन दंगा करीत आलेला ‘रझाकार’, रात्री अपरात्री येऊन ही स्वतः मांस शिजवून घेत असे. या घटना प्रसंगातून असे दिसून येते की, माणसे कितीही दुष्ट असली तरी त्यांची ही एक जीवन प्रणाली असते, त्यांची ही तत्व - निष्ठा ठरलेली असते. (इतिहाकालीन, पुराणकालीन असे अनेक दुष्ट राजे, मुस्लीम राजे शाकाहारी होते. खुद्द हिटलर सुद्धा शाकाहारी होता) मतितार्थ असा की अत्यंत अप्पालपोटी क्रूर माणसे सुद्धा कांही सदगुण बाळगून असतात हे ही या कथानकात लेखकाने जाता - जाता दाखवून दिले आहे. भूपेंद्र उर्फ रझाक याची ज्या भागातून, इलाख्यामधून भटकंती झाली तेथील नैसर्गिक हवामान, समाजातील सण, खाणे - पिणे, शेतीच्या - पिण्याच्या पाण्याची अवस्था, शिल्पकला, सामाजिक - सांस्कृतिक ठेवण, कीर्तिमान व्यक्तींचे वैशिष्टय यांचे ही लेखकाने लीलया मांडणी केली आहे. उदाहरणार्थ मजूर लोक इथल्या खाणीतील उत्तम प्रतीचे विशिष्ट दगड (प्रस्तर) नेऊन विकत असत! येथे जक्कान्ना सारखे शिल्पी होऊन गेले, त्यांनी राजघराण्याचे तथा राज्याचे ही वैभव वाढविले! ख्यातकीर्त तेनालीरामा इथे राहात असे! बहामनी सारखा कुशल राजा इथलाच होता!... वगैरे ... वगैरे... मरणोन्मुख अवस्थेत, अत्यंत जखमी निश्चेष्ट अवस्थेतील रझाकाराला घोडयावरून खाली टाकतात. तो क्षीण आवाजात पाणी मागतो. पाण्यासाठी तडफडत असतो. कल्याणी पाण्याचा तांब्या घेऊन येऊन तो तांब्या हाताच्या कक्षेत येऊ नये अशी ठेवते. पूर्व संस्कारामुळे कल्याणी पाणी देण्याच्या मनस्थितीत असते. पण... तो यातून वाचणार नाही अशी खात्री होताच, याच्या क्रूरकर्माची अशीच केविलवाणी दशा व्हायला हवी! कुत्र्याच्या मरणाने हा मरायला हवा अशी मनोमनी भावना व्यक्त करून, पाण्याचा तांब्या मागे सरकावते. अशावेळी मानवी मनातील ‘मनोव्यापारांचे’ फासे कसे पडत असतात - किंबहुना कसे मुद्दाम टाकले जातात याची अनुभूती येथे आल्यावाचून राहत नाही. या प्रसंगातून ‘रझाकार’ जगणार नाही याची पुरेपूर खात्री पटल्यावर, कल्याणी आपल्या मानलेल्या मुलीला घेऊन सासरी जाण्याचा निर्धार करून, छकडा गाडीवाल्याला भाडे ठरवून, निश्चिंतपणे ती मार्गक्रमू लागते. छकडा गाडी पेक्षा कितीतरी प्रवेगाने तिचे मन धावत सुटलेले असते. मनात प्रचंड काहूर माजलेला असतो. माणसाची गीजीविषा (अदम्य इच्छाशक्ती) ही अंतर्मनाला उभारी देते व मार्ग शोधीत राहते. जीवनातील चढउतार, हृदय पोळलेने होणारी मनाची घालमेल याची मांडणी लेखकाने खुबीने केली आहे. या कादंबरीत ‘रझाकार’ या व्यक्तीरेखेकडे आपण खलनायक म्हणूनच पहिले पाहिजे. कारण खलनायक हा दुष्ट असतो. समाजाला त्रास देणारा असतो. स्वार्थानुसार अन्यायाने वागत असतो तोच खरा खलनायक होय! भूपेंद्र उर्फ रझाक या व्यक्तीची भूमिका, ही अहं भूमिका आहे. जंगलात सदैव फिरणारा, झाडे झुडपे, काटे कुटे, दगड धोंडे तुडवीत राहणारा, अत्यंत प्रतिकुलतेशी नेहमीच झुंजत राहणारा, खाण्यापिण्याचा झोपण्याचा सुद्धा निश्चित ठाव ठिकाणा नाही, अशा व्यक्तीच्या कष्टाचे मोल कसे करता येईल? दिवसा फिरता येत नव्हते व रात्री निशाचरा सारखी भटकंती नशिबी होती. ज्या व्यक्तींचे भूपेंद्रवर प्रेम जिव्हाळा होता तेथे त्याला उजळ माथ्याने वावरता येत नव्हते. किती दैव दुर्विलास होता त्याचा. ध्येयवादी व्यक्तीच ध्येय गाठते म्हणतात तसे याचे झाले होते! तो महाभयंकर यातना भोगून ही अत्यंत शांत व अचल राहिला म्हणून तो नायक ठरला आणि आपल्या ध्येयाप्रत पोहोचला! कल्याणी ही थोर घराण्यातील होती पण तिला पळवून नेल्याने ती समाजाच्या दृष्टीने किंबहुना तिच्याच मनाने तिला कलंकित ठरविले होते. चार चार दिवस कधी कधी आठ पंधरा दिवस ‘रझाकार’ त्या धाब्याच्या घरी फिरकत नव्हता तरीही ती पळून गेली नव्हती. तीने स्वतःला कर्मकलंकित व बाटलेली बाई अशी स्वतःची समजूत करून घेतली होती. तथापि तिने आपल्या आचरणातील पोक्तपणा, शालीनता, माणुसकीचा ओलावा सोडला नव्हता म्हणूनच तिच्याविषयी आपल्याला सहानुभूती व आदर वाटतो. त्यामुळेच ती या कथेची नायिका वाटते. जैनारबीचे सुरुवातीचे जीवन ठीक होते. गोड बोलून सर्वांशी तिने हितसंबंध जपले होते. मानवतेचा झुळझुळणारा झरा तिच्याकडे वाहत असायचा त्यामुळेच भूपेंद्र व काशी कांही काळ तेथे स्थिरावू शकले. कालांतराने तिचे ही घर जळाले आणि सगळेच अंतराळी झाले. या कादंबरीत कर्मसिद्धांताप्रमाणे (निसर्ग नियमाप्रमाणे) अनेक वेळा असे पहायला मिळते की, सज्जन माणसांच्यावर, दुस-यांना सतत मदत करणा-यावर, उदारमतवादी व्यक्तींवर नेहमीच संकटे कोसळतांना दिसतात. अशा व्यक्तींचे दु:ख पाहून आपण ही व्यथित होऊन जातो. अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्व नेहमीच उठून दिसते याचे श्रेय लेखकाला निश्चितच जाते. योगायोगाने रझाकारचा सैनिक व भूपेंद्र एका ठिकाणी झोपतात. रात्री भूपेंद्र त्या सैनिकाच्या डोक्यात मोठा दगड घालून ठार मारतो. आपले कपडे त्याला, त्याचे कपडे आपण घालून त्या प्रेताची विल्हेवाट लावतो व कुणी पाहणार नाही अशा शितापीने तो तिथून पसार होतो. हा प्रसंग श्री. अशोक पाटील यांनी चांगला चितारला आहे. ‘हाडाचा शिक्षक’ असा या लेखकाचा पिंड असलेने, लिखाणात आदर्शवादाचे अनेक मुद्दे / विचार प्रवाह वारंवार दृष्टीगोचर होतात. या कादंबरीत जसे आवश्यक निसर्ग वर्णन, तत्वज्ञान, उत्तम विचार वगैरे ओघाने आले आहेत तसेच, खूप सांगण्याच्या मोहापोटी अनावश्यक अनेक तपशील ही यात येऊन गेलेले आहेत. ‘रझाकार’ ही कादंबरी कथावस्तू म्हणून वाचकांना निश्चितच आवडेल. कादंबरी वाचत असतांना आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासात गेल्याचा तथा वेगळ्या भाव विश्वात पोहोचल्याचा सुखद अनुभव येईल. हे सुद्धा या कथानकाचे व लिखाण शैलीचे वैशिष्टयच मानावे लागेल. यातील भाषा साधी, सोपी आणि ओघवती असलेने मनुष्य वाचनात गुंग होतो. व्यक्तिचित्रणे उभी राहतांना ती कथेच्या बुंध्यावर मिठीमारून थांबलेली दिसतात. खरे तर ‘रझाकार’ म्हणून त्याचे स्वतंत्र अस्तित्व म्हणजेच त्याचा पराक्रम, शारीरिक बल - शक्ती, यांनी तो कुठेच उठून दिसत नाही. दोन चार डायलॉग सोडले तर त्याचे कौर्या त्याच्या वक्तव्यातून दिसत नाही. त्या टोळीमार्फत घरे - झोपडया जाळणे, स्त्रियांच्यावर अन्यायाने (टोळीच्या सहाय्याने) पळवून आणणे, बलात्कार करणे अशी दुष्कृत्ये निदर्शनास येतात. तो दारू पिऊन दंगा करीत येत असे, मांसभक्षण करीत असे. स्त्री लोभी (लंपट) होता वगैर चित्रणामुळे; कथेमधील दुष्ट घटनांमुळे तो खलनायक शोभतो. या कादंबरीमध्ये - रझाकार, भूपेंद्र, कल्याणी, जैनारबी, काशी अशा व्यक्तींसाठी स्वतंत्र (प्लॉट पाडून) विभागणी करून, त्यांच्या व्यक्तीमत्वाची उंची वाढविता आली असती. स्वागत किंवा मनो विश्लेषण, तसेच संभाषणातील कौशल्याचा उपयोग करून - भूपेंद्र, कल्याणी जैनारबी यांच्या संस्कारी विचारांचा, सेवाभावी गुणांचा फुलोरा व सुगंध, मनाला मोहिनी घालणारा ठरवता आला असता. असो. या कादंबरीतील भाषा थोडी अवघड वाटते. लेखकाची मूळ भाषा कन्नड असलेने, मराठीमधील लिंग, वचनांचा थोडा गोल जाणवतो. खरे तर आपले लिखाण झाल्यावर दोनत - तीन वेळा स्वतः वाचायला हवे. व त्याचे फेर लिखाण व्हायला हवे. त्याचा येथे अभाव जाणवतो. किती कथा कादंब-या लिहिल्या या पेक्षा किती ‘सकस’ व ‘मौल्यवान’ मांडणी केली. आपल्या लेखनाच्या माध्यमातून समाजास कोणता संदेश दिला याला अधिक महत्व द्यावे. साहित्य हे ‘अक्षय’ व ‘अक्षर’ स्वरूपी असलेने तेथे घाई गडबड मुळीच करू नये. वार्धक्यात ही श्री. अशोक दादा पाटील यांचे लिखाण पाहून आम्हांस सुखद धक्का बसतो. त्यांच्या या साहित्य प्रवासास तथा आराधनेस आमच्या खूप खूप शुभेच्छा! त्यांच्या या ‘रझाकार’ लघु कादंबरीचे समाजाने सहर्ष स्वागत करावे अशी सद् भावना प्रकट करतो! ...इति भद्रम् भूयात | कविरत्न विजयकुमार बेळंके संस्थापक - साहित्य सुधा मंच, निमशिरगांव 02322 - 259082, 9096382062 माझं मन सांगतय... ‘रझाकार’ या प्रदीर्घ कथेचं रूप कादंबरी सारखं आहे. कादंबरीला असलेला आयाम या कथेला आहे. अनेक व्यक्ती, अनेक प्रसंग, अनेक अकल्पित घटना अशा प्रवाहात ही कथा वाहत ठेवण्याचा प्रयत्न मी केला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, यातील प्रमुख पात्र माझ्या परिचयाचे आहे. ती व्यक्ती आज हयात नाही; पण त्याचे वंशज म्हणजे नातू वगैरे आपल्या गावापासून चाळीस - पन्नास मैलावरील एका मोठ्या गावात राहतात. पुढचे काही मला माहित नाही. जी व्यक्ती या कथेत नायक म्हणून आहे त्यांनी मला आपल्या तोंडाने जे सांगितले त्याला स्मरून मी कथा थोडयाफार फरकाने इकडचं तिकडं करून पण समन्वय साधून लिहिली आहे. ही कथा अर्ध्या भागात मी ‘सविता’ या मुंबईमधून प्रकाशित होणा-या एका मासिकात खूप वर्षापूर्वी लिहिली होती. साधारणपणे ही गोष्ट मी 1953 - 54 मध्ये लिहिली होती. म्हणजे आपणास कल्पना येईल की ही कथा साठ वर्षापूर्वी म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यावर लिहिली आहे. रझाकारांच्या काळ्या कारकीर्दीचा आणि निजामाचे राज्य भारतात विलीन करून घेतल्याचा इतिहास आपणास या पूर्वीच कदाचित माहितही असेल; पण अलीकडील लोकांना त्याची कल्पनाही नसेल. दुसरी पुढील कथा त्या पूर्वीच्या कथेला थोडीशी कलाटणी देऊन दु:खांता ऐवजी सुखांत स्वरुपात मांडली आहे. ‘रझाकार’ जरी एक दीर्घ कथा असली तरी सुद्धा ‘रझाकार’ ही कादंबरी स्वरुपात वाचकांनी वाचायला काही हरकत नाही. मात्र सदर पुस्तकातील वर्णन, गांवे अजून अस्तित्वात आहेत ह्याची कल्पना वाचकांना येईल व मांडणीशी सुसंगतता साधली असून सदर कथानकाला अकल्पित कलाटणी देण्यात आलेचे दिसून येईल. या दीर्घ कथेविषयी आपण जरून ध्यानी ठेवावे; की ही काही काल्पनिक व काही सत्य याच्या स्वरुपात उतरलेला एक ढाचा आहे; आणि तो वाचकांना निश्चितच आवडेल एवढेच मी सांगू शकतो. ‘रझाकार’ या लघु कादंबरीस कवीरत्न विजयकुमार बेळंके यांनी प्रस्तावना लिहून दिली आणि डॉ. सुनील दादा पाटील यांनी तत्परतेने माझ्या इच्छेनुसार ‘रझाकार’ लघु कादंबरी प्रकाशातही आणली... त्यांचा या कार्याचा व्याप व सततचे परिश्रम याला कारणीभूत असून त्यांना मी शतशः धन्यवाद देऊन आभार मानतो. तसेच ज्ञात अज्ञातांकडून मिळालेले प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सहकार्यही तेवढेच मोलाचे समजून त्यांनाही धन्यवाद देतो व त्या सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. - अशोक दादा पाटील, (रा. भा. कोविद) भुजगौडर वाडा, मुक्काम पोस्ट - शेडबाळ Shedbal - 591315, Taluka - Athani, Belgaum तालुका - अथणी, जिल्हा - बेळगाव, कर्नाटका - डॉ सुनील दादा पाटील, संपादक आणि प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर सुदर्शन, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र मोबाईल - 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com Dr. Sunil Dada Patil Editor and Publisher of KavitaSagar Publication, Jaysingpur Sudarshan Palace, Plot # 16, Padmavati Society, Near Nandani Naka, Bypass Road, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India Ph: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com