Prernadayee Vichar - 2015 (प्रेरणादायी विचार) - सौ. संजीवनी सुनील पाटील

Prernadayee Vichar - 2015 (प्रेरणादायी विचार) - सौ. संजीवनी सुनील पाटील

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Prernadayee Vichar - 2015 (प्रेरणादायी विचार) - सौ. संजीवनी सुनील पाटील - प्रेरणादायी विचार कवितासागर प्रकाशनाचे कार्यकारी संचालक आणि माझे मित्र डॉ. सुनील दादा पाटील यांनी सौ. संजीवनी सुनील पाटील द्वारा संकलित 'प्रेरणादायी विचार' हा सुविचारांचा संग्रह प्रस्तावना लिहिण्यासाठी माझ्या हाती देवून गेले. सर्व सुविचारांचे मी प्रथम वाचन केले. विविध विषयावरील सुविचारांचे संकलन करण्याचा अनोखा छंद या संग्रहाच्या रूपाने कळून आला. तो वाचता - वाचता हाती अमुल्य ठेवा गवसल्याची जाणीव झाली. कोणत्याही साहित्याचे वाचन करतांना त्यामध्ये मनाला भोवणारी अनेक वाक्ये सापडतात; ती वाचल्यानंतर विसरता येत नाहीत. त्या वाक्यांचा मनावर सखोल परिणाम होतो. ही वाक्ये थोर संतांची असो अथवा साहित्यिकांची, पण त्यातील ‘प्रेरणादायी विचार’ हे जीवनाला स्पर्शून जाणारे, मनाला बळकटी देणारे असतात. ह्या विचारांमध्ये जीवाला उन्नत बनवून त्यामध्ये परिवर्तन घडवण्याची टाकद असते. ‘प्रेरणादायी विचार’ अंधारलेल्या मनाला प्रकाशाची दिशा दाखवण्याचे काम करतात. मानवी मनाला सुखाचे क्षण देणारे, दु:खातून जिद्दीने जीवन जगण्याची उमेद निर्माण करण्याची टाकद प्रेरणादायी विचारातून व्यक्त होते, हा विविध विषयावरील शेकडो विचारांचा संग्रह म्हणजे मौल्यवान ठेवाच आहे. सौ. संजीवनी पाटील यांनी संकलित केलेले विविध विषयावरील सुविचार अनेक क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींचे असून त्याची मांडणीसुद्धा मराठी वर्णाक्षरानुसार केलेली आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात एखाद्या संकटातून वाचवण्याचे व यशस्वी करण्याचे सामर्थ्य सुविचारात आहे. याची आम्हाला दैनंदिन व्यवहारातून प्रचिती येते. एक सुविचार वाचला तर पुढील सुविचार वाचावा अशी उत्कंठा वाढवणारे व लहानांपासून वृद्धांच्यापर्यंत सर्वांनाच ‘प्रेरणादायी विचार’ हे पुस्तक आवडेल याचा मला विश्वास आहे. प्रत्येक क्षण आपण कसा जगू शकतो आणि त्यातून कोणता अनुभव घेवू शकतो या बाबत वाचकांना मार्गदर्शन करणारे 'प्रेरणादायी विचार' संकलकाने या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या आनंदासाठी संकलित केलेले आहेत. जीवनातील प्रत्येक क्षणाचा उपभोग घेवून त्याला सुंदरता व सौंदर्यभावना वाढीस लावणारा हा आगळा वेगळा संग्रह आहे. या संग्रहातील अनेक प्रेरणादायी विचार वाचकांच्या मनात रुजतील व त्यांना स्वतंत्रपणे विचार करावयास भाग पाडतील आणि त्यातूनच त्यांना आपल्या अंतर्मनाचा शोध घेण्याची प्रेरणा मिळेल. सुविचार वाचनाबरोबर त्याचे चिंतन केले पाहिजे, त्यामुळे आचार विचारात बदल होतो आणि जीवनाची फुलणारी वाटसुद्धा त्यातून सापडू शकते असे मला वाटते. आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटे टाळता येणं शक्य नाही, पण... दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते. कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणा-या प्रत्येकाने हे सुविचार वाचायला हवेत… नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवेत…! आपल्या प्रापंचिक जीवनातून वेळ काढून वेचक सुविचार संग्रहित करून ते पुस्तक रूपाने वाचकांच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल सौ. संजीवनी पाटील यांचे अभिनंदन! भावी काळात आपल्या संग्रहातून, लेखनातून पुढील कार्य यशस्वीपणे घडावे यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! सदर पुस्तकाची तिसरी आवृत्ती निघत आहे या वरूनच हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला नक्कीच उतरले असल्याचा आनंद संकलकाला मिळाला आहे. पुस्तक किती लहान आहे या पेक्षा त्यातील विचार माणसाच्या जीवनाला चांगली उभारी देत असेल तर नक्कीच त्याला सुज्ञ वाचकवर्ग उपलब्ध होतो याची प्रचीती तिसरी आवृत्ती प्रकाशित करतांना आली आहे. समाजातील सर्व थरातील वाचकांनी संग्रही ठेवण्यासारखे हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या तिस-या आवृत्ती प्रकाशनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा! तसेच प्रकाशक व संकलक यांचे पुनश्चः अभिनंदन! डिसेंबर 15, 2015 नंदकुमार शंकरराव गायकवाड