Readwhere logo

Shabadratn (शब्दरत्न) - महावीर कांबळे

By KavitaSagar International Media Group, Jaysingpur

Education

Free

Read

Available on

  • Pay via readwhere wallet and get upto 40% extra credits on wallet recharge.
  • This is an e-book. Download App & Read offline on any device (iOS, android and even desktop/Laptop).

- डॉ सुनील दादा पाटील, संपादक आणि प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर सुदर्शन, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र मोबाईल - 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com Dr. Sunil Dada Patil Editor and Publisher of KavitaSagar Publication, Jaysingpur Sudarshan Palace, Plot # 16, Padmavati Society, Near Nandani Naka, Bypass Road, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India Ph: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com - शब्दरत्न: एक सर्वोत्तम निबंधमाला शब्दरत्न हे कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूरने प्रकाशित केलेले पुस्तक हाती लागले आणि ते मी एका बैठकीतच वाचून संपवले; महावीर कांबळे हे स्वतः एक प्रयोगशील शिक्षक असल्याने मुलांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहनाचे खतपाणी घालण्याच्या हेतूने अनेक कलात्मक व धोरणात्मक विषय मुलांसाठी राबवतांना दिसून येतात याचा डॉ. राजन गवस यांच्या प्रस्तावनेत झालेला आहे. प्रस्तुतच्या निबंधमालेतून त्यांनी ज्या पद्धतीने विविध विषयांना स्पर्श केलेला आहे यावरून त्यांच्यामधील संवेदनशीलता प्रत्ययास येते. स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यानंतरच्या काळातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रातील विविध व्यक्तींच्या कतृत्वाचा व व्यक्तिमत्वाचा बारीक - सारीक तपशिलासह केलेल्या वर्णनामुळे लेखकाने घेतलेल्या परिश्रमांची येथे साक्ष पटते. यशवंतराव चव्हाणांसारखे बहुआयामी व्यक्तिमत्व शब्दबद्ध करतांना लेखकाने लिहिले - ‘जेंव्हा महाराष्ट्राचे राजकीय चित्र ढगाळलेले होते, माणसे व त्यांची माने विस्कटलेली होती. तेंव्हा यशवंतराव आपल्या नेहमीच्या पद्धतीने, विरोधातून मार्ग काढत होते. एकाच वृक्षाच्या फांद्या मूळ विसरून एकमेकांवर आदळत आपटत होत्या. तेंव्हा कित्येकांना वाटले, ‘इतिहासाचे पान’ भोव-यात सापडले. पण पाण्याचे नियम माहीत असणा-यांना पृष्ठभागावर यायला वेळ लागत नाही तेवढी समाज आणि ताकद यशवंतराव यांच्यात जरूर होती. इतिहासाला वळण देणारेच इतिहासाचे पण होतात. यशवंतराव मोठे होते हे काळानेच ठरविले आहे; त्यांचे जतन करण्याची जबाबदारी काळाचीच आहे.’ ...ही वाक्यचं लेखकाची साहित्यिक प्रगल्भता स्पष्ट करतात. स्त्रियांचा शाब्दिक गुणगौरव करत त्यांना देवत्व बहाल करणारा पुरुषप्रधान समाज प्रत्यक्षात स्त्रियांना बरोबरीचा व्यक्तिगत व सामाजिक दर्जा देऊ इच्छित नाही. या बाबतचा विषाद लेखक आपल्या लिखाणातून व्यक्त करतांनाच स्त्री - भृण हत्येमागील सामाजिक अज्ञान दूर करून माणसातील पशुत्व नष्ट झाले पाहिजे ही अपेक्षा मांडायला विसरलेला नाही. मुलांच्या मनामध्ये मातृभाषेतील प्रेम रुजवावे हे सांगतांनाच बहुभाषिक अभ्यासामुळे ज्ञानाच्या कक्षा विस्तारित व विकसित होऊन वैश्विक जीवनाचा स्वीकार करण्याची विवेकपूर्ण जागृती होण्याची अपेक्षा व्यक्त करायला लेखक विसरलेले नाहीत. कृषिप्रधान देशातच शेतक-यांच्या दारिद्रयाचे आणि त्यांनी केलेल्या आत्महत्यांचे राजकीय स्वार्थापोटी केलेले विटंबन मांडतांना लेखकाने प्रत्येक वाचकास आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त केले आहे असे मला वाटते. संत, साहित्यिक, शिक्षक व पत्रकार यांच्या योगदानातूनच समाजाची जडण घडण होत असते याचं वर्णन लेखकाने आपल्या विविध निबंधातून प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माणसांकडून होणारे पर्यावरणातील प्रदूषण, मोबाईल सारख्या आधुनिक सुविधांचा होणारा अति वापर यातून निर्माण होणारे सामाजिक दुष्परिणाम यासाठी इशारा देतानाच बदलत्या सांस्कृतिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी मुलांना लहानपणापासूनच लैंगिक प्रशिक्षण देण्याची गरज याठिकाणी लेखकाने आवर्जून मांडलेली आहे. आपला देश विविध धर्म आणि जातीपाती याच बरोबर प्रांतिक वाद - विवादांमध्ये अडकलेला आहे. ख-या अर्थाने मानवता विकसित व्हायची असेल तर समाजमनावर चढलेला विविध रूढी - परंपरांचा बेगडी बुरखा फाडून काढला पाहिजे आणि एकसंघ समाजाची मानसिकता वाढली पाहिजे यासाठी लेखक आग्रही आहेत. एकंदरीत आपल्या छोटयाशाच पुस्तकातून अनेक विषयांना स्पर्श करतांनाच आपल्यातील संवेदनशील मनाचे दर्शन लेखकाने वाचकांना करून दिलेले आहे. त्यांच्याकडून अशाच प्रकारे समाजमनाचा जागर व्हावा या अपेक्षांसह त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! एका गोष्टीचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आपल्या अवती - भवती लिहिणारे लोक खूप आहेत परंतु पुरेशा माहिती अभावी त्यांचे लिखाण व्यक्तिगत डायरीत अडकून राहते. अशा अनेक प्रतिभावंत लेखक - कवींना शोधून त्यांच्या साहित्याला ‘ कवितासागर’ च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे स्तुत्य काम माझे मित्र डॉ. सुनील पाटील मोठया आनंदाने करत असतात. त्यांच्यातील रत्नपारखी व्यक्तिमत्वास मन:पूर्वक सलाम व शुभेच्छा! पुस्तकाचे नांव - शब्दरत्न: निबंधमाला लेखक - महावीर ई. कांबळे प्रकाशक - डॉ. सुनील पाटील (०२३२२ - २२५५००, ९९७५८७३५६९) प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर किंमत - ८० रुपये पृष्ठ संख्या - १०० sunildadapatil@gmail.com, www.KavitaSagar.com

Feedback readwhere feebdack