Readwhere logo

Vicharanche Manik Moti (विचारांचे माणिक मोती) - डॉ. महावीर अक्कोळे

By KavitaSagar Publication, Jaysingpur

Lifestyle

Free

Read

Available on

  • Pay via readwhere wallet and get upto 40% extra credits on wallet recharge.
  • This is an e-book. Download App & Read offline on any device (iOS, android and even desktop/Laptop).

- डॉ सुनील दादा पाटील, संपादक आणि प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर सुदर्शन, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र मोबाईल - 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com Dr. Sunil Dada Patil Editor and Publisher of KavitaSagar Publication, Jaysingpur Sudarshan Palace, Plot # 16, Padmavati Society, Near Nandani Naka, Bypass Road, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India Ph: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com - विचारांचे माणिक मोती साहित्य हे समाजाच्या आरशासारखे असते आणि म्हणूनच चांगल्या लेखकांच्या, विचारवंतांच्या, कवींच्या, तत्ववेत्त्यांच्या साहित्यकृती वाचतांना जणू आरशात पाहिल्यासारखे वाटते कारण आपणही समाजाचाच भाग असतो. या साहित्यकृतीमधून चांगल्या चांगल्या वाक्यांद्वारा, ओळींच्याद्वारा नीतिमूल्यांचा, जीवननिष्ठेचा पुरस्कार केलेला असतो. अशा ओळी वाचून जगण्याची, लढण्याची, यश मिळविण्याची नि उत्तुंगतेकडे वाटचाल करण्याची नवी उमेद मिळते. जिद्द, आत्मविश्वास, आत्मसन्मान, स्वाभिमान, प्रयत्नवाद, विवेक, धैर्य, स्फूर्ती, साहस, सत्य, स्वातंत्र्य, शिष्टाचार, ध्यासपुर्ती अशा शब्दांचे अर्थ चांगल्या साहित्यातून आपल्याला नव्याने काळात जातात व नकळतपणे त्यातून आपल्यालाही अनेकप्रकारे प्रेरणा मिळते. या छोटेखानी पुस्तकात मराठी, हिंदी व इंग्रजीतील अशा अनेक वाक्यांचा, ओळींचा, विचारांचा समुच्चय सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. साहजिकच आपल्या तरुण मुलामुलींना सुद्धा हे विचारांचे माणिक मोती भावतील व प्रेरणा देतील याची खात्री आहे. वृद्धांपासून किशोरवयीन मुलामुलींपर्यंत सर्वांना हे विचार संजीवित - उत्साहित करतील. यात जनरेशन गॅपसुद्धा बुजून जाईल व प्रथम आईबापांनी आपले बौद्धिक आणि सांस्कृतिक जीवन सुदृढ केले की, मुलांनाही तयार करता येते. शेवटी संस्कार हे थोरांच्या कृतीतूनच होत असतात. राष्ट्राच्या उगवत्या पिढ्या घडविण्याचे सामर्थ्य अशां माणिक मोत्यांच्या वाचनात असते. जैन डॉक्टर्स फेडरेशनच्या “इन्स्पायर २०१४” चे औचित्य साधून हे पुस्तक प्रकाशित होते आहे हा माझ्या दृष्टीने आनंदाचा भाग आहे. नांदणी (तालुका - शिरोळ) चे प्रख्यात उद्योगपती श्री. अण्णासाहेब चकोते यांनी हे “जेडीएफ इन्स्पायर २०१४’ सम्मेलन प्रायोजित केलेय तर ख्यातनाम सर्जन डॉ. अजित मेहता, डॉ. पार्श्वनाथ मगदूम, व डॉ. मिलिंद परीख यांनी या पुस्तिकेच्या प्रकाशनाचा भार उचलला आहे. या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. भगवान महावीरांचे एक वचन आहे की, “सत्पात्री दिलेले दान, उत्तम सकस भूमीत पेरलेल्या बीजाप्रमाणे भरभरून चांगले फळ देते !” या सत्पात्री दानामुळे दातारांनाही नक्कीच आत्मिक समाधान मिळेल. तरुण, उत्साही व सतत कार्यमग्न असणा-या डॉ. सुनील पाटील यांनी प्रकाशनाची जबाबदारी उचलली व अल्पावधीत त्यांच्या ‘कवितासागर प्रकाशना’ च्या माध्यमातून हे “विचारांचे माणिक मोती” दर्जेदार नि देखण्यारुपात वाचकांपुढे आणले. पुस्तक वाचतांना एखादा जिवलग मित्र आपल्याशी बोलतो आहे असे वाटण्याइतपत देखणे सुबक रूप याला आले आहे, त्यांचे आभार. जैन डॉक्टर्स फेडरेशन सांगली - कोल्हापूर विभागाच्या सा-या टीमचे मिळालेले सहकार्य आभारापलिकडचे आहे. सर्वच वाचकांनी खास करून तरुणवर्गाने या माणिकमोत्यांचे वाचन - चिंतन करावे, आपल्या बोलण्यात वक्तृत्वात याचा उपयोग करावा व आयुष्याला - विचाराला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करावा ही माझी अपेक्षाच मी माझा कृतज्ञता भाव समजतो. पुस्तकाचे नाव - विचारांचे माणिक मोती संकलक - डॉ. महावीर अक्कोळे प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर ISBN - 978-81-927074-2-6 पृष्ठे - 48 (कव्हर सह) मुल्य - 40/- संपर्क - 02322 - 225500, 221891, 9975873569

Feedback readwhere feebdack