Readwhere logo

Gatha Utkrantichi (गाथा उत्क्रांतीची) - नीलम माणगावे

By KavitaSagar International Media Group, Jaysingpur

Literature

Free

Read

Available on

  • Pay via readwhere wallet and get upto 40% extra credits on wallet recharge.
  • This is an e-book. Download App & Read offline on any device (iOS, android and even desktop/Laptop).

- डॉ सुनील दादा पाटील, संपादक आणि प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर सुदर्शन, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र मोबाईल - 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com Dr. Sunil Dada Patil Editor and Publisher of KavitaSagar Publication, Jaysingpur Sudarshan Palace, Plot # 16, Padmavati Society, Near Nandani Naka, Bypass Road, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India Ph: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com - गाथा उत्क्रांतीची उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल होय. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. पहिला सजीव म्हणजे अमीबा आणि त्यापासून उत्क्रांती होत अन्य सजीवांची उत्पत्ती झाली. चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतीवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले. इंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यात १२ फेब्रुवारी १८०९ रोजी चार्ल्सचा जन्म झाला. १८१८ मध्ये तो शाळेत जाऊ लागला. त्याला रसायनशास्त्राची फार आवड होती म्हणून आपल्या भावाच्या मदतीने त्याने आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यात छप्पर घालून एक छोटीशी प्रयोगशाळा उभारली होती व तेथे तो प्रयोग करत बसे. त्याचे शाळकरी सोबती त्याच्या या नादाची टर उडवत. कालांतराने त्याची डॉ. ग्रॅट या जीवशास्त्रज्ञाची ओळख झाली. डार्विनने १८२५ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या क्राइस्ट महाविद्यालयात नाव नोंदवून पदवी मिळवली. तेथे त्याला जीवजीवाणू व कीटक निरीक्षणाचा नाद लागला. १८२६ मध्ये कॅप्टन किंगने दक्षिण अमेरिकेच्या संशोधनाची मोहीम काढली. त्याच्या हेन्स्लो नावाच्या मित्राच्या निमंत्रणावरून डार्विन मोहिमेत सामील झाला. त्या मोहिमेवर तो पाच वर्षे होता. निरनिराळे पक्षी-प्राणी एकमेकांशी कसे वागतात, कसे एकमेकांशी जुळवून घेतात, याचे निरीक्षण व अभ्यास त्याने केला व तेथे उत्क्रांतीवाद, सहजीवन, 'बळी तो कान पिळी', ही मूलभूत नैसर्गिक तत्त्वे तो शिकला. माणसाचा मूळ पुरुष, चारपायी पायाच्या माकडापासून झाला असला पाहिजे असे विचार त्याच्या डोक्यात घुमू लागले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज्‌ या २४ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्‍सफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. डार्विन आपल्या प्रयोगशाळेत शांतपणे प्रयोग करत बसला होता. हक्सले डी हूकर या शास्त्रज्ञाने डार्विनची बाजू सडेतोड व सोदाहरण मांडली. बिशपला डार्विनचा सिद्धांत मान्य करावाच लागला. डार्विनला त्या यशाची ना खंत ना खेद. तो आपल्या कार्यातच मग्न राहिला. सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात / जुळवून घेऊ शकतात. त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हे बदल घडायला कोट्यवधी वर्षे जावी लागतात. असा या सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा आहे. हा सिद्धांत चार्ल्स डार्विन आणि आल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी १ जुलै १८५८ मध्ये मांडला. चार्ल्स डार्विन याने 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज्‌ बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन्‌ द स्ट्रगल फॉर लाइफ' नावाचा ग्रंथही लिहिला. या ग्रंथाचे सार "प्राणिजगतात वंशसातत्याची सहजप्रवृत्ती असते. नैसर्गिक परिस्थितीतील बदलांना तोंड देऊन जे जगू शकतात, त्यांनाच वंशसातत्य टिकवता येते. अशा बदलांना तोंड देऊन वंश चालवू शकणारे हेच खरे जगण्यायोग्य सजीव". नीलम माणगावे यांनी काव्यरूपाने सादर केलेले ‘गाथा उत्क्रांतीची’ हे पुस्तक म्हणजे मानवी उत्क्रांतीवर एक दृष्टिक्षेप आहे. शास्त्र हा विषय अनेकांना गूढ, गहन, गंभीर वाटतो. केवळ अणूंची संरचना बदलल्याने काजळीचा हिरा कसा होतो, हे समजून घेणे अनेकांच्या आवाक्याबाहेरचे असते. तरी त्यांना विज्ञानात रस नसतोच, हे मानणे चुकीचे आहे. विज्ञान हा अभ्यासाचा नव्हे पण कुतूहलाचा विषय असणार्‍यांसाठी ‘गाथा उत्क्रांतीची’ हे पुस्तक म्हणजे जिज्ञासेला मेजवानीच आहे. या पुस्तकात मानवाच्या एकूण उत्क्रांतीचा सर्वसाधारण इतिहास काव्यरूपाने दिला आहे. या पुस्तकाच्या आशयाची नेमकी एका वाक्यात ओळख करुन देणे कठीण आहे, कारण उत्क्रांती हा विषयच तसा क्लीष्ट आहे. ती जैविक सांस्कृतिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या अंगांनी तपासता येते. हे पैलूही एकमेकांवर अवलंबून असणारे व परस्परपूरक असे आहेत. त्यामुळे त्यांचे समग्र वाचनच उत्क्रांतीच्या सर्वांगाचे दर्शन घडवू शकेल. अन्न, संस्कृती, ज्ञान, मानवी शरीर, मेंदूमधील बदल यांचा विचार या पुस्तकात झाला असून मन, प्राण, ज्ञान, स्वप्न, विचार अशा मानवी आयुष्याशी निगडित विषयांवर काव्यात्मक विवेचन केले आहे. उत्क्रांतीचा क्लीष्ट विषय बर्‍याच मोठया प्रमाणात काव्यरूपाने सोपा करुन सांगितल्याचं श्रेय नीलम माणगावे यांना द्यायलाचं हवं. डॉ. सुनील पाटील द्वारा संचलित कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या वतीने ‘गाथा उत्क्रांतीची’ या काव्यसंग्रहाची दुसरी व सुधारित आवृत्ती तयार करण्यात आली असून या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर समर्पक चित्रे आहेत. मुखपृष्ठ अगदीच आकर्षक व अप्रतिम आहे. पुस्तकाची बांधणी, छपाई व कागद उत्तम दर्जाचा आहे. खास मुलांसाठी पुस्तकाचा फॉन्ट मोठा वापरलेला आहे. पुस्तक वाचनीय आहे. - सौ. संजीवनी सुनील पाटील पुस्तकाचे नाव - गाथा उत्क्रांतीची लेखक - नीलम माणगावे प्रकाशक - डॉ. सुनील पाटील प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर ISBN - 978 - 81 - 927074 - 3 - 3 आकार - 1/8 पृष्ठे - 44 (कव्हर सह) मुल्य - 40/- आवृत्ती - दुसरी ई-बुक - फेसबुक, मोबाईल व इंटरनेटवर उपलब्ध विषय - बालकविता संपर्क - 02322 - 225500, 228891, 9975873569 kavitasagarpublication@rediffmail.com

Feedback readwhere feebdack