Readwhere logo

Aahuti (आहुती) - अशोक दादा पाटील (बेळगाव)

By KavitaSagar International Media Group, Jaysingpur

Literature

Free

Read

Available on

  • Pay via readwhere wallet and get upto 40% extra credits on wallet recharge.
  • This is an e-book. Download App & Read offline on any device (iOS, android and even desktop/Laptop).

Who read this also read

- डॉ सुनील दादा पाटील, संपादक आणि प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर सुदर्शन, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र मोबाईल - 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com Dr. Sunil Dada Patil Editor and Publisher of KavitaSagar Publication, Jaysingpur Sudarshan Palace, Plot # 16, Padmavati Society, Near Nandani Naka, Bypass Road, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India Ph: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com दर्पण… ‘आहुती’ या कथासंग्रहात असलेल्या सात लेखांपैकी चार कथा आहेत, एक व्यक्तीचित्र आहे. एक व्यक्ती चरित्रात्मक लेख आहे. एक संस्मरणीय लेख आहे; आहुती, भुकेली, झेड पी निवडणूक व अघटीत तेच घडलं या त्या चार कथा होत. तर आब्या हे व्यक्तीचित्र आहे. आण्णाराय मिर्जी हा व्यक्ती चरित्रात्मक लेख आहे तर मंतरलेले दिवस हा संस्मरणीय लेख आहे. या सातही लेखांची कांही खास वैशिष्टये आहेत. कथांचा विचार करता कथेची म्हणून जी खास वैशिष्टये असतात ती चारही कथात पाहण्यास मिळतात. उत्कंठा वाढवीत जाणारी कथाबीजं, मनात ठसणारे घटना प्रसंग, उत्कृष्ट व्यक्तिरेखा, आकर्षक सुरुवात व शेवट आणि कथा वाचून संपल्यावर मनात रेंगाळत राहणारे कथाविषय ही सर्व वैशिष्टयं या कथात प्रकर्षानं पाहण्यास मिळतात. स्वतःचे बलिदान गावासाठी देणारी ‘आहुती’ या कथेतील पद्मावती तर माणसाला असलेली प्रेमाची भूक ‘भुकेली’ या कथेत लेखकाने चिगरी, तुळशी व संतू यांच्या रुपानं वाचकांसमोर ठेवली आहे. ‘झेड. पी.’ या कथेच्या रूपानं लोकशाहीत होणा-या निवडणुकीतील अनेक डावपेच, मतदारांना दाखविली जाणारी लालूच अत्यंत समर्पकपणे वाचकांसमोर ठेवली आहे. कोणाचा झेंडा घेवू हाती या चित्रपटातील तरुणांची जी ससेहोलपट होते व कांही स्वार्थी शिष्य स्वतःचा स्वार्थ कसा बेमालूमपणे साधतात व एखाद्या पक्षासाठी जीव तोडून भांडणारी पोरं कोर्ट कचे-यात गुंतून कशी वा-यावर सोडली जातात व स्वतःच्या पायावर कसा धोंडा मारून घेतात याचं मनोहारी व क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणारं कथानक ‘झेड. पी. निवडणूक’ या कथेत पाहण्यास मिळतं. खेडेगावात चालणा-या बाराभानगडी ‘अघटीत तेच घडलं’ या कथेत चित्रित केल्या आहेत. संपत्तीच्या हव्यासापोटी माणसं किती खालच्या थराला जातात व किती जणाचं आयुष्य नासवून टाकतात ते या कथेत पाहण्यास मिळते. प्रस्तुतचे लेखक जेवढ्या ताकदीनं कथा लिहू शकतात तेवढ्याच ताकदीनं साहित्याच्या इतर विभागातही लेखन करू शकतात हे उर्वरित लेखांमधून आपणासमोर येतं. उत्कृष्ट व्यक्तिरेखा साकारणारी ‘आब्या’ ही कथा थेट पु. ल. देशपांड्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकाची आठवण करून देते. कष्टात व गरिबीत जीवन कंठलेला आब्या मृत्यूपूर्वी गावातील सर्व दैवतांना देणगी ठेवून मरतो. ही आकर्षक कथा स्वार्थी समाजमनाला अंतर्मुख करणारी आहे. स्व. आण्णाराय मिर्जी या साहित्यिकाचे जीवन त्यांचे लेखन, कर्तृत्व, कार्य इत्यादी वरील लेखकाचे लिखाणही असेच मनोवेधक आहे. आण्णांना वि. स. खांडेकरांप्रमाणे ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळायला हवा होता. हा विचार कोणाही निस्पृह व्यक्तीस पटण्यासारखा आहे. शिक्षण, साहित्य, समाज या विषयी असणारी आण्णांच्या मनातील तळमळ त्यांनी अत्यंत जिव्हाळ्याने व्यक्त केली आहे. हे व्यक्तीचित्रण एखाद्या सुंदर चित्रकृतीप्रमाणे चित्ताकर्षक व मनोवेधक असून म्हणूनच वाचनीय झाले आहे. ‘स्वातंत्र्य लढ्यातील मंतरलेले दिवस’ या लेखातून लेखकाच्या जाज्वल्य देश निष्ठेचा प्रत्यय तर येतोच पण त्याचबरोबर त्यांनी प्रत्यक्ष केलेल्या चळवळीचा रोमहर्षक इतिहास वाचतांना अंगावर शहारे येतात. रेशनच्या रॉकेलचे त्यांनी केलेले वाटप, स्वातंत्र्याकरिता त्यांनी केलेली मदत, ब-याच क्रांतीविरांशी त्यांचा असलेला संबंध व एवढे करूनही स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिळणारे पेन्शन न घेण्याची त्यांची त्यागी वृत्ती लेखकाबद्दलचा आदरभाव आपल्या मनात निर्माण केल्याशिवाय राहत नाही. ‘रत्नत्रयपुरी शेडबाळ’ या संस्था परिचयाच्या निमित्ताने जैन धर्माच्या उन्नतीचा इतिहास, जैन तत्वज्ञान, या धर्माची सद्य:स्थिती, आचार्याश्री विद्यानंद मुनी महाराज, प. पु. १०८ श्री शांतीसागर महाराज यांचे महनीय कार्य या संस्थेच्याच नव्हे तर समस्त जैन समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने कांही मूलगामी विचार श्री. अशोक दादा पाटील या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी, जे या पुस्तकाचे लेखक आहेत; त्यांनी या लेखात मांडले आहेत. एकंदरीत पाहता कथांमध्ये कथाबीज उत्तम आहे. कथाबीज फुलविणारे घटना प्रसंग ही वाचकांच्या मनाची पकड घेणारे आहेत. मात्र ‘झेड. पी. निवडणूक’, ‘अघटीत तेचं घडलं’ या कथांच आणखी एकदोन वेळा पुनर्लेखन झालं असतं तर या कथा अजून उठावदार झाल्या असत्या. विचारगर्भ लेख मात्र फारच छान झाले आहेत. लेखक केवळ कथाकारच नाहीत तर तत्वचिंतक, धर्माचे गाढे अभ्यासक व मानवतेचे हितचिंतक आहेत हे नि:संशय. अधिक परिश्रमपूर्वक त्यांनी अधिकाधिक लेखन करावे व साहित्यात मोलाची भर घालावी कारण लेखकास लागणारे अनेक दुर्मिळ गुण त्यांच्यात आहेत हे खास... त्यांना भावी लेखनासाठी शुभेच्छा! जयसिंगपूर व जयसिंगपूरच्या परिसरातील अलीकडील काळात नवोदितांचे व त्याचबरोबर वयोवृद्ध कवी - लेखकांची पुस्तकं प्रसिद्ध होत आहेत, या पाठीमागं ‘सुनील पाटील’ या तरूण प्रकाशकांचे फार मोठे योगदान आहे. फारसा अर्थलाभ नसतांनाही त्यांनी छंद म्हणून ‘युनिवर्सल लायब्ररी’, ‘कवितासागर प्रकाशन’ या संस्था नावारूपाला आणल्या आहेत. अशोक पाटील यांचा प्रस्तुतचा कथासंग्रह लेखकाच्या वयाच्या ८६ व्या वर्षी प्रकाशित होत आहे या पाठीमागंही सुनील पाटील यांचीच प्रेरणा व धडपड आहे. त्यांनाही भावी कार्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद देतो! - बी. बी. गुरव, सेवा निवृत्त प्राचार्य एम. जी. शहा विद्यामंदिर, बाहुबली 02322 - 224161, 9421287107

Feedback readwhere feebdack