Gharate (घरटे) - सौ. विजया बन्ने
Gharate (घरटे) - सौ. विजया बन्ने

Gharate (घरटे) - सौ. विजया बन्ने

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

- डॉ सुनील दादा पाटील, संपादक आणि प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर सुदर्शन, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र मोबाईल - 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com Dr. Sunil Dada Patil Editor and Publisher of KavitaSagar Publication, Jaysingpur Sudarshan Palace, Plot # 16, Padmavati Society, Near Nandani Naka, Bypass Road, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India Ph: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com - अभिप्राय ... आमच्या नवजीवन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर येथील सहाय्यक शिक्षिका सौ. विजया प्रविण बन्ने यांनी २०१४ मध्ये ‘घरटे’ नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध करण्याचा जो मनोमनी ध्यास घेतलेला आहे, तो असामान्य आहे. नवजीवन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर हे मी, संस्थापक चेअरमन असलेल्या जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळामार्फत चालविले जाते. त्यामुळे प्रत्येक शिक्षक व शिक्षकांच्याबद्दल नेहमीच संपर्क येत असतो. त्या मध्ये काही निवडक शिक्षक, शिक्षिका ज्यांच्यामध्ये एक वेगळे विशेषत्व आहे. त्यामध्ये सौ. विजया प्रविण बन्ने मॅडम यांचा उल्लेख करावाच लागेल. शाळेतील कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन असो, मुलांना व मुलींना संस्कार शिबिरामार्फत संस्कार शिबीर घेऊन त्यांच्यातील सुप्तगुणांना प्रेरणा देणे, चांगले काय? वाईट काय? याची जाणीव करून देणे. या मध्ये त्यांचा हातखंडा आहे. उदाहरणचं द्यायचे म्हटले तर त्यांच्या ‘घरटे’ या कवितासंग्रहातील ‘जीवनाचे मोल’ ही कविता हृदयाला चटका लावून जाते. या कवितेमध्ये अभ्यासाच्या त्रासाने किंवा परीक्षेमध्ये नापास झाल्यानंतर जे विद्यार्थी आत्महत्या करतात ती रोखण्यासाठी; विद्यार्थी मनावर कवितेच्या माध्यमातून... तुझ्या आईची अवस्था काय होईल? तुझ्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणा-या तुझ्या वडिलांना काय वाटेल? प्रत्येक भाऊबीजेला तुझ्या छोट्या बहिणीला काय वाटेल? व आत्महत्या करणे म्हणजे भ्याड कृत्य आहे. हे कवितेच्या रूपाने विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘घरटे’ या कवितेला श्री. अशोकराव माने प्रतिष्ठान, शिरोळ यांचेकडून राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक देवून गौरव केलेला आहे. हा कवितासंग्रह एक आदर्श कवितासंग्रह होणार आहे. या कवितासंग्रहामधून विविध विषयावर साध्या आणि मार्मिक भाषेत कविता लिहून कवितेच्या माध्यमातून समाज जीवनावर एक चांगला प्रकाश टाकण्याचे काम सौ. बन्ने मॅडमनी केलेले आहे. ते प्रशंसनीय आहे. कविता लेखन हे सांगून सवरून किंवा ठरवून केले जात नाही. कवितेला काव्यरूप प्राप्त व्हावे अशी प्रत्येक कवींची अपेक्षा असते. म्हणूनच काव्य लेखनात पारदर्शकता येते. म्हणूनच अशा कवितांमधून माणूसपणाचे दर्शन होते. असा मला हा कवितासंग्रह वाचताना प्रत्यय आला व तो प्रत्यय घेतांना आनंद वाटला. ‘घरटे’ या काव्यसंग्रहातील एक नि एक कवितांचा आस्वाद घेतांना रसिकांनीही तसाच आनंद घ्यावा असे मला वाटते. बाळासाहेब भांदिगरे, संस्थापक अध्यक्ष, नवजीवन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर प्रस्तावना… कवयित्री सौ. विजया प्रविण बन्ने यांचा ‘घरटे’ हा कवितासंग्रह आज रसिकांच्या हाती येत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. प्रत्येकाला घरट्याची ओढ असते आणि घरट्यासाठी झिजण्याची तयारीही असते. कवयित्रीच्या मनात जितकी स्वतःच्या घरट्याची काळजी आहे, तितकीच दुस-याची ‘घरटी’ जपण्याची संवेदनशीलताही आहे. म्हणून तर चिमणा चिमणीच्या घरटे बांधण्याच्या प्रयत्नाला दाद देत ती शपथ घेते.... हात धरून घेतली शप्पथ घरट्यापाशी जायचे नाही जोडता नाही आलं तरी दुस-याचं घरटं मोडायचं नाही. कवयित्री एक अभ्यासू, चिंतनशील आणि विद्यार्थीहित जपणारी शिक्षिका असल्याने तिच्या ‘गीत अक्षराचे’, ‘परीक्षा मुलांची’, ‘गुरुजी’, ‘निर्णय’ आणि ‘जीवनाचे मोल’ या कवितांमधून विद्यार्थ्यांना बरेचकाही समजावून सांगते आणि त्यांच्या भावनिक विश्वात चिंतन करतांना तळमळीने म्हणते... आत्महत्या म्हणजे भ्याड बाळा असं कधीच करायचं नसतं परमेश्वर परीक्षा घेत असतो त्यात खरं उतरायचं असतं मुलांबरोबर पालकांनीही आपल्या अपेक्षांचं ओझं मुलांवर लादू नये असा संदेश ‘निर्णय’ या कवितेतून देते... शाळा, अभ्यास, परीक्षा आणि गुण एवढंच नसतं विश्व त्याही पल्याड सादं घालणारं असतं सुंदर भावविश्व ‘कविता’ या साहित्यकृतीत, जसे कवी मनाचे प्रतिबिंब लपलेले असते; तसेच वाचकांचेही भावमन गुंतलेले असते, म्हणून तर कवयित्री सौ. विजया बन्ने यांच्या ‘आठवणींचा झुला’, ‘माझी आई’, ‘ गांव माझा’, ‘एकाकी’, ‘पंख’, ‘नातीगोती’, ‘गुरुजी’, ‘प्रेम असं असावं’, ‘मैत्री’ या वैयक्तिक भावभावनांची गुंफण असलेल्या कविता वाचतांना कवयित्रीच्या भावविश्वाशी नकळत वाचकही जोडला जातो आणि वाचकाला ती कविता आपलीच वाटायला लागते, ती मनाला बालपणीच्या ‘आठवणींच्या झुल्यावर’ नेवून ठेवते... एकटीचं बसले असतांना आठवणींना जाग येते खेडेगावातील बालपण माझे पुन्हा मला साद घातले कवयित्रीला स्वतःच्या भावविश्वाबरोबरच सामाजिक प्रश्नांचीही चिंता सतावते. सध्या समाजात घडत असलेली स्त्री भ्रृण हत्या, भ्रष्ट्राचार, मुलींची असुरक्षितता, स्त्रीयावरचे अत्याचार अशा विषयांचे चिंतन ‘हाक एका कळीची’, ‘भ्रष्ट्राचार’, ‘स्त्री - एक अदभूत शक्ती’, ‘जरा जपून’ इत्यादी कवितांमधून व्यक्त केले आहे. ‘स्त्री’ ने मनावर घेतले तर या समस्या सहज सुटू शकतात हे सांगतांना ती म्हणते भले लढाया जरी लागले लढीन मी गं सर्वांशी निर्धाराने वाढवीन उदरी अन् घालीन तुजला जन्माशी निसर्गाची ओढ कवयित्रीच्या स्वभावातच आहे. त्यामुळे निसर्गातील अनेक घटनांची सूक्ष्म निरीक्षणे कवयित्रीच्या ‘ताराफुले’, ‘वैशाख वणवा’, ‘रागावलेले ऋतू’, ‘रम्य संध्या’, ‘जादू पहाटेची’, ‘दुष्काळ’, ‘जादू पावसाची’ इत्यादी अशा निसर्गवर्णनपर कवितांमधून दिसून येतात. निरभ्र आकाशातील शुभ्र तारका तिच्या मनाला भुरळ घालतात. रम्य संध्याकाळ मधुर स्वप्नात हरविते तर पहाटेची जादू तलम धुक्याची चादर घेऊन येते. निसर्गात जितकी सुंदरता आहे तितकीच दाहकता वैशाख वणव्यातही आहे. पावसाची वाट पाहणा-या शेतक-याच्या डोळ्यातील पाणी पाहून, सुकलेली पिके पाहून ती दु:खी कष्टी होते तेंव्हा दुष्काळ या कवितेतून ते मांडताना कवयित्री म्हणते ... माना टाकल्या वेलींनी धडपडून जगण्यासाठी थांबवले मुळांनाही खोल जाणे पाण्यासाठी एकंदर कवयित्रीच्या प्रत्येक कवितेमधून समजावणे, विचार करणे, प्रेम - माया व्यक्त करणे, सामाजिक प्रश्नांची जाण आणि माणुसकीची नाती जपण्याचे भाव व्यक्त होतात. कविता दीर्घ असल्यातरी सोप्या सरळ भाषेत असल्याने त्यातील विचार वाचकांपर्यंत थेट पोहचतात. ‘घरट्यातून’ जन्माला आलेल्या या सर्व कवितांचा प्रवास विस्तीर्ण नभापर्यंत भरारी घेत उत्तरोत्तर असाच वाढत राहो व रसिकमनाला निखळ आनंद देत राहो हीच अपेक्षा व्यक्त करून कवयित्री सौ. विजया बन्ने यांच्या या ‘घरट्याला’ मनापासून शुभेच्छा देते! - सौ. सरिता दत्तात्रय राजमाने (कवयित्री) मनोगत ... प्रिय वाचकहो... मी सौ. विजया प्रविण बन्ने; ‘घरटे’ हा माझा पहिलाच कवितासंग्रह आपल्यासमोर घेऊन येत आहे. तो आपल्या हाती सुपूर्द करतांना मला खूप - खूप आनंद होत आहे. करवीर तालुक्यातील ‘खेबवडे’ या लहानशा खेडेगावात माझे बालपण गेले. एकत्र कुटुंब पद्धतीत अनेक चांगले संस्कार मला मिळाले. शालेय वयात आल्यापासून भाषा विषयाची आणि वक्तृत्वाची आवड असल्यामुळे शब्दांची जादू कळत गेली आणि तेथूनच काव्य लेखनाचे बीज रुजले. पण ख-या अर्थाने या बीजाचे अंकुरण झाले ते म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेतांना. मनातील विचार आणि कल्पनांना शब्दात बांधण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला असला तरी मी काही कुणी फारशी मोठे कवयित्री नाही हे प्रांजळपणे आपल्यासमोर कबूल करते. छंद म्हणून कविता करता - करता विद्यार्थी आत्महत्या या विषयावरील ‘जीवनाचे मोल’ या कवितेने मला सामाजिकतेचे भान करून दिले. ‘शिक्षण संक्रमण’ सारख्या मासिकातून ती प्रकाशित झाली व माझ्या लेखणीला धार आली. नवजीवन हायस्कूल, जयसिंगपूर मध्ये शिक्षिका या पदावर काम करतांना शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमा दरम्यान माझ्या विविध कविता सदर केल्या. या काळात माझ्या शाळेतील सर्व शिक्षक बंधू - भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. जीवन शिक्षण मासिकात ‘घरटे’ ही कविता प्रकाशित झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. ही घटना माझ्या पुस्तक प्रकाशनाला प्रेरणा देणारी ठरली. हे माझे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी माझे पती श्री. प्रविण शंकर बन्ने यांनी माझ्यापेक्षाही जास्त प्रयत्न केले. या माझ्या चांगल्या कामात माझे सासर व माहेरकडील सर्व कुटुंबीय बहिणी, भाऊ यांनी प्रेमाचे सहकार्य केले. तसेच अनेक मान्यवरांच्या शुभेच्छांचे खूप मोठे पाठबळ मिळाले. या सर्व कामाला कळस चढविण्याचे काम केले ते ‘कवितासागर’ प्रकाशनाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी. म्हणूनच आम्ही उभयता या साहित्यिक कामासाठी प्रोत्साहन देणा-या प्रत्येक व्यक्तींचे शतशः ऋणी आहोत. प्रत्येकाच्या जीवनात घडणा-या वास्तववादी घटनांना सामोरे ठेवून लिहिलेल्या या वास्तववादी काव्यसंग्रहास आपण सर्वांनी स्वीकारावे अशी विनम्र विनंती. धन्यवाद! सौ. विजया प्रविण बन्ने --------------------------------- आमच्या गावच्या स्नुषा कवयित्री सौ. विजया प्रविण बन्ने यांच्या ‘घरटे’ या पहिल्या साहित्यकृतीला आमच्या खूप - खूप शुभेच्छा! उल्हास पाटील, आमदार, शिरोळ विधानसभा मतदार संघ सौ. विजया प्रविण बन्ने यांच्या ‘घरटे’ या पहिल्या काव्यसंग्रहास तसेच त्यांच्या भावी साहित्यिक वाटचालीस आमच्या लाख - लाख शुभेच्छा! राजन वाले, सेक्रेटरी - नवजीवन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर सौ. विजया प्रविण बन्ने यांचा पहिला - वहिला कवितासंग्रह शिरोळ येथील साहित्य संमेलनात प्रसिद्ध होत असल्याचा मनस्वी आनंद झाला. सौ. बन्ने यांच्या रूपाने शिरोळ परिसराला एक प्रतिभावंत कवयित्री लाभली. पुंडलिक रामचंद्र (पी. आर.) पाटील, सामाजिक कार्यकर्ता, शिरोळ हातकणंगले लोकसभा मतदार संघातील एक प्रतिभावंत लेखिका सौ. विजया प्रविण बन्ने यांच्या ‘घरटे’ या काव्य संग्रहास हार्दिक शुभेच्छा! राजू शेट्टी, खासदार, हातकणंगले लोकसभा मतदार संघ सौ. विजया प्रविण बन्ने यांच्या ‘घरटे’ या काव्यसंग्रहास लाख मोलाच्या शुभेच्छा! नवजीवन परिवारातील व्यक्ती म्हणून आम्हांला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो... त्यांचा कवितासंग्रह सर्वाना प्रेरणादायी ठरावा असे आम्हांला मनापासून वाटते. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, नवजीवन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर घरटे म्हणजे मुक्त भावनांचा अविष्कार अशा मुक्त काव्यांच्या उधळणीसाठी मनापासून हार्दिक - हार्दिक शुभेच्छा! प्रकाश शंकर बन्ने, Civil Engg. & Govt. Contractor, तेजस कन्स्ट्रक्शन, पुणे सौ. विजया प्रविण बन्ने यांच्या साहित्यिक वाटचालीस व ‘घरटे’ कवितासंग्रहास हार्दिक शुभेच्छा! Architects & Engineers Association, Jaysingpur शिरोळ नगरीचा अभिमान आणि साहित्य सांस्कृतिक चळवळीतील एक उगवता तारा सौ. विजया प्रविण बन्ने यांचा पहिला कवितासंग्रह ‘घरटे’ सर्वांच्या हृदयात घर करणारा ठरो अशा आमच्या मंडळाकडून शुभेच्छा! संयुक्त ग्रुप, शिरोळ अनुक्रमणिका… 1. घरटे 19. पंख 2. स्त्री - एक अदभूत शक्ती 20. रम्य संध्या 3. ताराफुले 21. हिंदोळा 4. रंग चेह-याचे 22. नातीगोती 5. जीवनाचे मोल 23. परीक्षा मुलांची 6. गीत अक्षरांचे 24. सत्यमार्ग 7. आठवणींचा झुला 25. जाता आयुष्याच्या गावा 8. माझी आई 26. गुरुजी 9. वैशाख वणवा 27. निर्णय 10. गांव माझा 28. जादू पहाटेची 11. भातुकली 29. दुष्काळ 12. हाक एका कळीची 30. भंगलेले हृदय 13. एकाकी 31. जादू पावसाची 14. भ्रष्ट्राचार 32. वाटा 15. प्रेम असं असावं 33. ध्रुवतारा 16. राजमाता जिजाऊ 34. क्रांतीज्योती 17. रागावलेले ऋतू 35. आदिशक्ती 18. मैत्री 36. जरा जपून