Man Parambya (मन पारंब्या) - Rajendra Shamrao Sargar (राजेंद्र शामराव सरगर)
Man Parambya (मन पारंब्या) - Rajendra Shamrao Sargar (राजेंद्र शामराव सरगर)

Man Parambya (मन पारंब्या) - Rajendra Shamrao Sargar (राजेंद्र शामराव सरगर)

  • Man Parambya (मन पारंब्या) - Rajendra Shamrao Sargar (राजेंद्र शामराव सरगर)
  • Price : Free
  • KavitaSagar Digital Library, Jaysingpur
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Man Parambya (मन पारंब्या) - Rajendra Shamrao Sargar (राजेंद्र शामराव सरगर) - o Title - Man Parambya (मन पारंब्या) o Poet - Rajendra Shamrao Sargar (राजेंद्र शामराव सरगर) ‘शाम-संपदा’ जुना बुधगांव रोड, दडगे प्लॉट, लक्ष्मीनगर, सांगली - ४१६४१६ संपर्क: ७५८८१६७०८७, raj.sargar07@gmail.com o Year of Publication - eBook - April 27, 2016 (एप्रिल 27, 2016) pBook - May 01, 2016 (मे 01, 2016) o Edition's - First (प्रथम आवृत्ती) o Volume - One (खंड पहिला) o Price - Rs. 70/- (मूल्य 70 रुपये) o Subject - Collection of Poems (कवितासंग्रह) o Language - Marathi (मराठी) o Total 68 Pages including covers. o Copyright © Mrs. Tejashree Rajendra Sargar (सौ. तेजश्री राजेंद्र सरगर) o Published in India in 2016 by - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील) Director - KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन) o Exclusively Marketed and Distributed by - KavitaSagar Publication, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India 02322 - 225500, 09975873569, 08484986064 kavitasagarpublication@gmail.com, sunildadapatil@gmail.com o Typesetting by - Dhudat Desktop Publishing Center o Cover Design by - Shrikant Shinde (श्रीकांत शिंदे) o Printed and Bound in India by - KavitaSagar Printing Services o Views expressed in this book are entirely those of the respective Authors and do not represent the opinions or thoughts of the Publisher दर्पण… आज कवितासागर प्रकाशनचे संस्थापक डॉ. सुनिल दादा पाटील भेटले बर्या च दिवसातून भेटल्यामुळे काही गप्पा झाल्या. त्यानंतर बर्याेच दिवसामध्ये नवीन काही वाचावयास न मिळाल्याची खंत मी त्यांना व्यक्त केली. खंत व्यक्त करतो ना करतो तोच डॉ. सुनील पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता राजेंद्र शामराव सरगर अर्थात कवी तेजाकांत यांचा ‘मन पारंब्या’ नावाचा कवितासंग्रह मला वाचावयास दिला आणि प्रस्तावना ही लिहिण्यास सांगितली. कवी तेजाकांत यांचा मन पारंब्या कवितासंग्रह वाचत असताना मी हरवूनच गेलो. कारणही तसेच आहे, यातील सुरूवातीच्या कविता ह्या प्रत्येक व्यक्तीला आत्मपरिक्षण करण्यास नक्कीच मदत करतील. ‘मन पारंब्या’ या कवितासंग्रहातील वैयक्तिकरित्या माझ्या मनाला भिडलेली कविता म्हणजे, ‘त्याला काय होतयं?’ खूपच छान शब्द रचना. त्याच बरोबर कमीत कमी शब्दांमध्ये अनेकांच्या मनाला स्पर्श करणारी अशी कविता आहे. अनेक वाईट गोष्टी जेव्हा स्वतः बरोबर घडतात तेव्हा माणूस दुःखी होतो, परंतु इतरांच्या बाबतीत घडल्या तर सहजपणे बोलून जातात त्याला काय होतयं. आयुष्याच्या या प्रवासात अशाही अनेक परिक्षा येतात कितीही अभ्यास केला तरी हमखास नापास करून जातात. आयुष्य म्हणजे एक पुस्तक आहे. त्यामध्ये सुख-दुःखाची अनेक पाने असतात. तसेच यश-अपयश हे सुद्धा भरलेले असते. कोणत्याही व्यक्तीला आयुष्य जगत असतांना दररोज एक नवीन धडा अभ्यासावा लागतो. दुःखाचं किंवा अपयशाचं एखादं पान आलं म्हणून पुस्तक फेकून द्यायचं नसतं. तर ते पान पलटून पुन्हा खंबीरपणे उभ रहायचं असतं. जीवन ही एक शाळा म्हणता येईल ही शाळा शिकत असतांना प्रत्येक व्यक्ती कोणत्या इयत्तेमध्ये शिकत आहे किंवा पुढे कोणता पेपर आहे हे कोणालाही सांगता येत नाही त्यासाठी प्रत्येक परीक्षेला सामोरे जाणारा व्यक्ती नेहमी यशस्वी होतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, ‘आवडलेलं आणि निवडलेलं याची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड’, कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. अनेक व्यक्ती ह्या देवासमोर भिकार्यातसारखी भिक मागतांना आपण पाहतो आणि देवळाच्या बाहेर जे भिकारी बसलेले असतात त्यांच्या समोर स्वतः देव असल्याचा अहंकार मनी बाळगत असतात. कवी तेजाकांत यांनी ‘दिस सुर्याजीचा’ या कवितेमध्ये खूपच छान पद्धतीने प्रत्येक व्यक्तीची दिनचर्या लिहिली आहे. अगदी साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये संपूर्ण दिवस सामावून घेतला आहे. जीवन जगत असतांना कोणत्याही कठीण प्रसंगी एकच वाक्य सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे ते म्हणजे, ‘हार कधीच मानणार नाही मी’ हे वाक्य प्रत्येक क्षणोक्षणी मनात ज्वलंत ठेवा यश नक्कीच मिळेल. या धावपळीच्या जीवनामध्ये नक्की कोठे थांबायचं आहे हेच अनेकांना माहित नसते किंवा ज्यांच्यासाठी आपण ही धावपळ करत आहे, त्यांना आपण आनंद देवू शकलो नाही तर ही होणारी धावपळ व्यर्थ आहे असे समजले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या मनातील अनेक प्रश्नांआची उत्तरे तसेच समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम कवी तेजाकांत यांच्या ‘मन पारंब्या’ या कवितासंग्रहातून नक्की मिळतील प्रत्येकाने हा कवितासंग्रह जरूर वाचावा. कवी तेजाकांत यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. - मंगेश विठ्ठल कोळी (लेखक-संपादक-समीक्षक) रूपा निवास, पुष्पक चित्रमंदिरच्या मागे, गणेशनगर, शिरोळ - 416103, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र संपर्क : 9028713820, mangeshvkoli@gmail.com मनातल थोडसं.... मला असे वाटते की प्रत्येकाच्या हृदयात एक कविता दडलेली असते. फरक फक्त एवढाच की, त्यातील काही जणांचीच कविता शब्दरूपाने व्यक्त होते. काव्यलेखनाचा कोणताही वारसा माझ्याकडे नव्हता आणि मार्गदर्शन करेल असा कोणी गुरूही नव्हता. इतरांच्या कविता वाचून, ऐकून माझ्या मनातले विचार व्यक्त करण्यासाठी मी हा कवितेचा रस्ता धरला आणि धडपडत चालत राहिलो. जमेल तसं आणि जमेल तिथं कविता लिहित गेलो. माझ्या अनेक कविता कधी कागदावरती, कधी अभ्यासाच्या वहीत, तर कधी वर्तमानपत्रावरती शब्दरूपाने उमटल्या ख-या पण त्या तिथेच ध्यानस्थ झाल्या. पुढे माझं लग्न झालं आणि माझ्या कवितांना माझ्या इतकच जपणारी माझ्या कवितेची श्रोती आणि समीक्षक तेजश्रीच्या रूपाने माझ्या जीवनात आली. तिनेच माझ्या कवितांना वेगवेगळ्या वह्यांतून डायरीमध्ये एकत्र केले आणि मग ख-या अर्थाने कवी तेजाकांतच्या कवितांचा प्रवास चालू झाला. ‘‘मन पारंब्या’’ हा माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित होतोय या विचाराने मन आनंदाने नाचू पाहतय. खरे तर या सर्व विविध विषयांवरील कविता म्हणजे माझ्या मनरूपी वटवृक्षाला फुटलेल्या कवितारूपी पारंब्याच आहेत. ‘मनरूपी वटवृक्षाला, कवितारूपी पारंब्या, व्यक्त होण्यास कवीला, साथ देणार्याप देणार्यात’ माझ्यावर आणि माझ्या कवितेवर प्रेम करणारे माझे आई-बाबा, माझी बायको, कवितासागर प्रकाशनचे प्रकाशक डॉ. सुनील पाटील, माझ्या पुस्तकास प्रस्तावना देणारे लेखक - समीक्षक मंगेश विठ्ठल कोळी, मुखपृष्ठ डिझायनर श्रीकांत शिंदे त्याच प्रमाणे माझे असंख्य मित्र, सहकारी, नातलग व अनेक ज्ञात-अज्ञात वाचक, श्रोते या सर्वांचे ऋण खरे तर फेडणे कठीणच आहे. मला तर ते फेडूच वाटत नाही. या सर्वांचे ऋणछत्र आयुष्यभर असेच रहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझा ‘मन पारंब्या’ हा कवितासंग्रह तुम्हास नक्की आवडेल. धन्यवाद! - राजेंद्र शामराव सरगर

Who read this also read