Aapali Nati (आपली नाती) - आबासाहेब सूर्यवंशी
Aapali Nati (आपली नाती) - आबासाहेब सूर्यवंशी

Aapali Nati (आपली नाती) - आबासाहेब सूर्यवंशी

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Recent Clips

कवितासंग्रह - डॉ सुनील दादा पाटील, संपादक आणि प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर सुदर्शन, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र मोबाईल - 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com Dr. Sunil Dada Patil Editor and Publisher of KavitaSagar Publication, Jaysingpur Sudarshan Palace, Plot # 16, Padmavati Society, Near Nandani Naka, Bypass Road, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India Ph: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com आपली नाती आबासाहेब मारुती सूर्यवंशी कवितासागर प्रकाशन 02322 - 225500, 09975873569 www.KavitaSagar.com KavitaSagar कवितासागर o Registered with the International ISBN Agency, London, UK and The Government of India, Ministry of Human Resource Development, New Delhi o Title - Aapali Nati (आपली नाती) o Poet - Aabasaheb Maruti Suryawanshi (आबासाहेब मारुती सूर्यवंशी) 3913 / क - 1, हेरवाडे कॉलनी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर - 416101, जिल्हा - कोल्हापूर संपर्क : 02322 - 228140, 9552256690 o Year of Publication - March 08, 2015 (मार्च 08, 2015) o Edition's - First (प्रथम आवृत्ती) o Volume - One (खंड पहिला) o Price - Rs. 60 /- (मूल्य 60 /- रुपये) o Subject - Collection of Poems (कवितासंग्रह) o Language - Marathi (मराठी) o Total 60 Pages including covers. o Copyright © Aabasaheb Maruti Suryawanshi आबासाहेब मारुती सूर्यवंशी All rights reserved. No part of this publication may be reproduced, stored in a retrieval system or transmitted, in any form or by any means, electronic, mechanical, photocopying, recording or otherwise, without the prior permission of the copyright holder. Only the publisher can export this edition from India. Due care has taken to ensure that the information provided in this book is correct. However, the publishers bear no responsibility for any damage resulting from any inadvertent omission or inaccuracy in the book. o Published in India in 2015 by - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील) On Behalf of KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन) Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India 02322 - 225500, 09975873569, kavitasagarpublication@rediffmail.com, sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com, www.KavitaSagar.com o Typesetting by - Dhudat Desktop Publishing Center o Cover Design by - Shrikant Shinde (श्रीकांत शिंदे) o Printed and Bound in India by - KavitaSagar Printing Services, Sangli o Views expressed in this book are entirely those of the respective Authors and do not represent the opinions or thoughts of the Publisher II अर्पण पत्रिका II स्व. वडील स्व. आई स्व. बंधू आज मी जो आहे तो केवळ माझ्या दिवंगत ‘आई’ मुळेच आहे. माझे बालपण संस्कारक्षम करण्यात आणि प्रतिकूल परिस्थितीमधून वाट काढत मला ‘शिक्षणाधिकारी’ बनवण्यात केवळ माझे आई - वडीलच कारणीभूत आहेत. आज ते दोघेही हयात नाहीत. माझा ‘आपली नाती’ हा काव्यसंग्रह म्हणजे त्यांच्या प्रयत्नांच्या रोपटयाला लाभलेले एक नयनमनोहर पुष्प आहे. ‘आपली नाती’ हा माझा काव्यसंग्रह माझ्या दिवंगत प्रिय आई - वडिलांना मी मनोभावे अर्पण करतो... तसेच ऐन तारुण्यात देवाघरी गेलेला माझा कनिष्ठ बंधू तानाजी यास हे पुस्तक पाहून खूप आनंद झाला असता. त्याच्या पवित्र स्मृतीस हा काव्यसंग्रह मन:पूर्वक अर्पण करतो... - आबासाहेब सूर्यवंशी मनोगत... संपूर्ण आयुष्य ‘शिक्षण’ या संकल्पनेशी जवळीक साधत घालविल्याने, शिकणे, शिकविणे व शिक्षणाधिकारी असलेने शिक्षण प्रक्रिया जवळून पाहणे या बाबींशी नित्याचाच संबंध आला. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण यातून घडणारा उद्याचा नागरिक हा सुसंस्कृत, सहिष्णू, विचारी व विवेकी असायलाच पाहिजे. भारतीय पुराणातून भारतीय संस्कृतीचे दर्शन होते. त्यामध्ये कौटुंबिक व सामाजिक नातेसंबंधाना विशेष महत्व दिले आहे. ही सर्व नाती कुटुंबात, समाजात जेवढ्या आत्मीयतेने जपली जातील तेवढया एकमेकांबाबतच्या सौहार्दपूर्ण संवेदना टिकून राहतील. असे दिसून येते की, आज नात्यांच्या पावित्र्याबद्दल संवेदना बोथट झालेल्या आहेत. जन्मदाते किंवा पालनकर्त्यांबाबतची जाणीव, त्यांच्या कष्टांची जाण कमी होत चालली आहे. शिक्षण प्रक्रियेतून या जाणिवांचे वृद्धीकरण व्हायला हवे. सेवानिवृत्तीनंतर मी माझ्या नातवास खेळवतांना, त्यास सांभाळतांना, काळजी घेतांना, त्याच्या मागे धावतांना होणा-या कसरती अनुभवल्यानंतर मुलांना मोठे करण्यात थोरांना किती कष्ट घ्यावे लागतात आणि मुले मोठी झाल्यानंतर त्यांना हे कोणी सांगत नसल्याने या जाणीवा त्यांच्या मनात जागृत होत नाहीत. माझ्या काव्यसंग्रहाचा उद्देश हाच आहे की, मुलांना नात्यांची जाणीव होवून त्यांच्या मनात कुटुंबाविषयीचे कर्तव्य व प्रेम निर्माण होवून समाजात प्रेम नांदावे. ‘आपली नाती’ या काव्यसंग्रहातील एकेक कविता शिक्षकांनी किंवा पालकांनी मुलांसमोर वाचून विस्ताराने समजावून सांगितली तर शिक्षणाचा मुख्य उद्देश थोडा तरी सफल व्हायला मदत होईल असे वाटते.माणूस हा निसर्गतःच समाजशील प्राणी आहे. त्याला एकत्रित, मेळाव्याने रहायला आवडते. एकत्रित रहात असतांना एकत्रित राहण्याची बंधने किंवा नियम जर घालून दिले नाहीत तर मानव ही नैसर्गिक प्राणीच असलेने त्याच्याकडूनही कांही नैसर्गिक चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मग इतर प्राण्यांमध्ये व मानव प्राण्यामध्ये फरक रहाणार नाही. म्हणून मानव प्राण्याच्या पिलाला त्याच्या वयातच मेळाव्यात राहण्याची आणि बंधनाची माहिती असायलाच हवी. आपल्या पूर्वजांनी ती एकत्र कुटुंब पद्धतीच्या समाजबंधनातून, परंपरांमधून, प्रत्यक्ष कृतीतून ती दिलेली आहे. पण आजचा समाज हा विघटीत झाला आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचा म्हणजेच समाजशीलतेचा -हास होत चालला आहे. त्यामुळे नात्यांचे महत्व मुलांच्या मनातून कमी - कमी होत चालले आहे, याची प्रचिती येते. म्हणून मुलांना नाती समजण्यासाठी ‘आपली नाती’ या काव्यांच्या माध्यमातून मुलांसमोर कांही तरी ठेवण्याचा हा लहानसा प्रपंच आहे. ‘आपली नाती’ हा काव्यसंग्रह दोन विभागात असून पहिला विभाग हा सरळ मानवी नात्यांवर आहे व दुसरा विभाग हा माणसांचा नित्य घनिष्ठ संबंध ज्यांच्याशी येतो त्यांच्या विषयी आहे. आपली सरळ नाती घेतांना, चुलत, मावस नाती विचारात घेतली नाहीत कारण सरळ व वक्र अशा कोणत्याही नात्यांशी आपण समजून घेणे महत्वाचे आहे. नित्य घनिष्ठ संबंधित सुद्धा विचारात घेण्यासारखी एक प्रकारची नातीच आहेत. म्हणून कवितांच्या माध्यमातून नात्यांचा प्रपंच मांडण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे. माझ्या या काव्यसंग्रहात माझी पत्नी सुनंदा हिचा मोलाचा वाटा आहे. माझी कन्या डॉ. स्वाती हिने ही माझ्या काव्य कल्पनेस प्रोत्साहन दिले. प्रत्येक कविता या दोघींना वाचून दाखविली आणि त्यांनी शब्दांची व वाक्यांची रचना यामध्ये समर्पक बदल सुचवून हातभार लावला. जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिरचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. बी. बी. गुरव, कवी श्री. श्रीपाद पुजारी, कवी महावीर पाटील, आणि श्री. मुकुंदराव गणबावले या मंडळीनी माझ्या कविता पुनःपुन्हा वाचून योग्य त्या रसिकतेने प्रोत्साहन देवून दुरुस्त्या सुचविल्या. प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांनी मुखपृष्ठांबाबत अफलातून कल्पना काढून हे समर्पक मुखपृष्ठ तयार करण्यास मोलाची मदत केली. मला आशा आहे की ‘आपली नाती’ या कवितासंग्रहातील कविता सर्वांना निश्चितच आनंद देतील; खास करून बच्चे कंपनी / शालेय विद्यार्थ्यांना आपल्या नात्यांची नाळ अजून घट्ट करण्यास कारणीभूत ठरतील असा मला पूर्ण विश्वास आहे. - आबासाहेब सूर्यवंशी प्रस्तावना … मानवी नाती आणि त्या प्रत्येक नात्यांवर कविता हा एक अफलातून विषय आहे. कवी आबासाहेब सूर्यवंशी हे नवीन - नवीन कल्पना करण्यात नेहमीच तरबेज असतात. मी त्यांना जवळ - जवळ पंचवीस वर्षापासून जवळून ओळखतो. शिक्षण खात्यात अधिकारी पदावर काम करतांना, रुक्ष अशा विषयात ही त्यांनी गोडवा आणून तो शिक्षकांना पटवून दिला. आम्ही, म्हणजेच मी स्वतः, श्री. सर्जेराव जाधव - सध्याचे शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) व श्री आबासाहेब सूर्यवंशी - तत्कालीन अधिव्याख्याता, डायट सिंधुदुर्ग असे सिंधुदुर्ग जिल्हयात कसाल या ठिकाणी एका खोलीत एकत्र रहायचो. त्यामुळे एकमेकांमधील गुण दोषासह आमचे मैत्रीत रुपांतर झाले. आबासाहेब सूर्यवंशी हे संगीत क्षेत्रात व साहित्य क्षेत्रात निपुण असलेचे आम्हांला त्याचवेळी जाणवले होते. कष्टाळू व नम्र असा स्वभाव असलेले हे कवी मनाचे अधिकारी म्हणजे आमच्या डायट (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) चे एक प्रकारचे हलते बोलते झाड होते. हार्मोनियम वादन व गायन त्यांना अवगत असलेने डी. एड. च्या विद्यार्थ्यांमध्ये ते आवडते अधिकारी होते. ‘आपली नाती’ हा त्यांचा काव्यसंग्रह म्हणजे एक अभिनव अशी नवकल्पना आहे. प्रत्येक माणूस नात्यांच्या बंधनात असल्यानेच एक सुजान नागरिक, सुसंस्कृत माणूस म्हणून कुटुंबात, समाजात स्वतःला सादर करतो. कर्तव्य करायला भाग पाडणारी आई-वडिलांची नाती, लहान मोठयांची जाणीव करून देणारी भावा-बहिणींची नाती, मजा, करमणूक, चेष्टा जोपासणारी मेव्हणा-मेव्हणीची नाती असे किती तरी कंगोरे या नात्यांना आहेत. प्रत्येक नात्यांची एकमेकांविषयीची कर्तव्ये ही थोडीफार भिन्न स्वरुपाची असली तरी ‘प्रेम’ हे सर्वसमान कर्तव्य प्रत्येक नात्याला जखडून ठेवते. आबासाहेब सूर्यवंशी हे एक भावनाप्रधान व्यक्तिमत्व असलेने कदाचित ‘आपली नाती’ हा कौटुंबिक व भावपूर्ण विषय त्यांना सुचला असावा. त्यांचा हा काव्यसंग्रह अनेक वाचकांच्या हाती पडून सर्वांनी सर्व कविता वाचून समाजात नात्याविषयीचा आदर भाव वाढेल अशी मनोकामना करून मी कवी आबासाहेब सूर्यवंशी यांच्या ‘आपली नाती’ या काव्यसंग्रहासाठीची प्रस्तावना थांबवितो. धन्यवाद! - महावीर माने शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे शुभेच्छा संदेश… माझे सन्माननीय सन्मित्र श्री. आबासाहेब सूर्यवंशी, निवृत्त शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांना त्यांच्या ‘आपली नाती’ या प्रथम काव्यसंग्रहाला शब्दरुपी पुष्पांचा शुभेच्छा गुच्छ देतांना मला मनस्वी आनंद वाटत आहे. ‘जे देखे कवी ते न देखे रवी’ या उक्ती प्रमाणे कविता, काव्य, काव्यसंग्रह हा साहित्य रसिकांचा खास प्रांत आहे. या प्रांतात उदंड साहित्य निर्मिती झाली आहे. केवळ एकेका काव्यपंक्तीमुळे, एकेका वाक्यामुळे वा एकेका काव्यसंग्रहामुळे अनेक कवी अजरामर होवून साहित्य प्रांतात ध्रुवाप्रमाणे अढळपद मिळवून बसले आहेत. पण या सर्व काव्याहून एक वेगळाच विषय प्रस्तुतच्या कवींनी हाताळला आहे. म्हणून ते सर्वांच्याच अभिनंदनास पात्र ठरले आहेत. सर्वच जण मान्य करतील की, एकाच काव्य संग्रहात एवढ्या जवळ जवळ कौटुंबिक सर्व नात्यांचा उहापोह एकत्रितरित्या माझ्या माहितीप्रमाणे आजवर झालेला नाही व पुढेही होईल की नाही या बद्दल बोलता येणार नाही. म्हणजे आपण अगदी खात्रीलायकरित्या ठामपणे म्हणू शकतो की, विषय निवडीच्या बाबतीत हा कवितासंग्रह अजोड आहे. असा विषय गेल्या, शतकात नव्हे तर केव्हाच हाताळला गेलेलाच नाही असे मला वाटते. यावरून या कवितासंग्रहाचे महत्व काव्य रसिकांच्या निश्चितच लक्षात येईल. या काव्यसंग्रहास आपली नाती असे नांव कवीने दिले आहे. पण मला असे वाटते त्या पेक्षा ‘उत्सव नात्यांचा’ हे शीर्षक अधिक शोभून दिसले असते. माझ्या या विचारामागे ‘भारतीय संस्कृती’ चा मोठा डौलदार फुललेला पिसारा दृष्टीसमोर येतो. भारतीय कुटुंब व्यवस्था हा भारतात अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून; याचा विचार व अभ्यास जगभरच्या तत्वचिंतकांना, विचारवंताना, समाजधुरीणांना, राजकारण्यांना व या अनुषंगाने साहित्यीकांना व कलावंताना भविष्यात करावा लागणार आहे. कारण मानवी जीवन मानवाच्या सानिध्यात फळतं, फुलतं व बहराला येतं. साधू संतानी, धर्माच्या अभ्यासकांनी दान, त्याग, परोपकार, सत्य, अहिंसा इत्यादी अनेक मानवी मूल्यांचा अकटोविकटो प्रचार केला तरी ही सर्व मूल्ये जन्मतः पाळावीच लागतात, नव्हे काही विशिष्ट व्यक्ती समूहात या नीती मूल्यांना डावलून मानव चालूच शकत नाही व जगूच शकत नाही. म्हणजेच या मानवी समूहात ही सर्व नितीमूल्ये निसर्गतःच वा आपोआपच जोपासली जातात आणि हा मानवी समूह नात्यांच्या समूह होय. माणूस जास्तीत जास्त आनंदी असतो, बनतो तो या मानवी समुहातच. अर्थातच या नाते संबंधातच. या सर्व नाते संबंधास एक फार चांगला शब्द आहे आणि तो म्हणजे ‘गोतावळा’. गोतावळ्यात म्हणजेच नात्यांच्या गोफात माणूस जास्तीत जास्त रमतो, सुखावतो नव्हे नात्याविना माणसाच्या जीवनात अर्थच राहणार नाही. नात्याप्रमाणेच जीवन, मृत्यू, देश, गुरु, शेजार इत्यादी बरोबर सुद्धा मानवाचे अतूट नाते असते. त्या दृष्टीने भाग २ मधील कविता फारच बहारदार व अर्थपूर्ण झाल्या आहेत. आणि प्रेमाशिवाय तर माणूस जगूच शकत नाही. प्रेम नात्यांच्या कविता तीनच आहेत पण ‘घागर मे सागर’ ही उक्ती या तीनच कवितांच्या मधून प्रत्यास येते. वरील सर्व गोष्टी पाहता श्री. आबासाहेब सूर्यवंशी यांचा ‘आपली नाती’ हा पहिला काव्यसंग्रह असला तरी अभिनंदनीय आहे. या काव्य संग्रहास खूप खूप शुभेच्छा! - बी. बी. गुरव, सेवा निवृत्त प्राचार्य एम. जी. शहा विद्यामंदिर, बाहुबली 02322 - 224161, 9421287107 अनुक्रमणिका भाग 1 - आपली नाती 01. प्रिय आईस 02. तीर्थरूप वडिलांचे सेवेशी 27. मामा - भाचा संवाद 03. चिरंजीव नातवास 28. संतान 04. तीर्थरूप आजोबांना 29. आली नाचत नाती 05. तीर्थरूप आजीस 06. प्रिय बंधू भाग 2 आपले घनिष्ठ संबंधित 07. प्रिय ताईस 08. चिरंजीव 01. जीवन 09. प्रिय कन्या 02. निसर्ग 10. प्रिय काकास 03. शेजार 11. प्रिय काकुस 04. देश 12. प्रिय पतीराज 05. माता धरा 13. प्रिय पत्नी 06. प्रिय मित्र 14. मामांचे सेवेशी 07. गुरु 15. तीर्थरूप मावशीस 08. सदन 16. प्रिय वहिणी 09. शेत 17. भावोजींना 10. रुबाब 18. माझी आत्या 11. परोपकार 19. तीर्थरूप सासूबाई 12. मैत्री 20. सूनबाई 13. मृत्यू 21. थोरल्या जाऊबाई 22. नणंदबाई प्रेमनाते 23. विहीणबाई 24. व्याहींना 01. डोळ्यात पाणी 25. भाचा आतीचा 02. रूपगर्विणी 26. प्रिय पुतण्या 03. विरह

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)