Aathavaninchi Sathvan (आठवणींची साठवण) - Ashok Dada Patil (अशोक दादा पाटील)
Aathavaninchi Sathvan (आठवणींची साठवण) - Ashok Dada Patil (अशोक दादा पाटील)

Aathavaninchi Sathvan (आठवणींची साठवण) - Ashok Dada Patil (अशोक दादा पाटील)

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

जीवन कहाणी आठवणींची साठवण अशोक दादा पाटील कवितासागर प्रकाशन 02322 - 225500, 09975873569 KavitaSagar कवितासागर o Registered with the International ISBN Agency, London, UK and The Government of India, Ministry of Human Resource Development, New Delhi o Title - Aathavaninchi Sathvan (आठवणींची साठवण) o Author - Ashok Dada Patil (अशोक दादा पाटील) शाकुंतल अपार्टमेंटच्या मागे, हेरवाडे कॉलोनी, जयसिंगपूर - ४१६१०१, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र, 02322 - 226102, 8793531760 o Year of Publication - March 08, 2016 (मार्च 08, 2016) o Edition's - First (प्रथम आवृत्ती) o Volume - One (खंड पहिला) o Price - Rs. 65/- (मुल्य 65 रुपये) o Subject - Collection of Letters (पत्रसंग्रह) o Language - Marathi (मराठी) o Total 73 Pages including covers. o Copyright © Ashok Dada Patil (अशोक दादा पाटील) o Published in India in 2016 by - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील) Director - KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन) o Exclusively Marketed and Distributed by - KavitaSagar Publication, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India 02322 - 225500, 09975873569, kavitasagarpublication@gmail.com, sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com, www.KavitaSagar.com o Typesetting by - Dhudat Desktop Publishing Center o Cover Design by - Shrikant Shinde (श्रीकांत शिंदे) o Printed and Bound in India by - KavitaSagar Printing Services o Views expressed in this book are entirely those of the respective Authors and do not represent the opinions or thoughts of the Publisher - प्रस्तावना… अशोक दादा पाटील यांच्या साठवणुकीकडे वळण्यापूर्वी माझ्या दोन चांगल्या आठवणी अगोदर सांगतो. सांगलीचे आमचे एक ज्येष्ठ मित्र माजी प्राचार्य श्री. डी. डी. मगदूम यांनी वयाच्या 82 व्या वर्षी प्रबंध लिहून पी. एच. डी. (डॉक्टरेट) मिळवली व दुसरी म्हणजेसहा - सात महिन्यापूर्वीच जयसिंगपूरातील एक ज्येष्ठ, श्रेष्ठ व ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले श्री. अशोक दादा पाटील वय वर्षे 86 यांचा ‘आहुती’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. आम्ही संभाजीपूर मधील सर्व ज्येष्ठ बंधू भगिनींनी या कथासंग्रहाचे उदघाटन मोठ्या उत्साहात केले. उदघाटनानंतर कवितासागर प्रकाशनचे तरुण, उत्साही, तडफदार प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील म्हणाले, ‘या पुस्तक प्रकाशनामुळे अशोक दादा पाटील यांचे आयुष्य 10 वर्षांनी वाढले.’ आणि याचा प्रत्यय ताबडतोबीने येत आहे. खरोखरीच अलीकडे ‘अशोक दादांचा’ उत्साह वाढला आहे. कारण ‘आहुती’ या कथासंग्रहाच्या प्रकाशनानंतर लगेचच... (1) ई-कवितासंग्रह - मुग्धा, (2) ई-कथासंग्रह - सौभाग्य, (3) कवितासंग्रह - निसर्गगंध, (4) कथासंग्रह - विश्वास, (5) कवितासंग्रह - स्वप्नसुंदरी, (6) लघुकादंबरी - रझाकार, (7) कथासंग्रह - काळी आणि गोरी, (8) कवितासंग्रह - रूपसुंदरी, (9) जीवन कहाणी - आठवणींची साठवण असे कथा - कविता - कादंबरी - लेख अशा विविध साहित्य प्रकारांमधून मराठी साहित्याची सेवा केली आहे. आणि या वयातसुद्धा अजून साहित्य निर्मिती करण्याची उर्मी त्यांच्या मनात आहे. त्यांच्या साहित्याला अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अमेरिकेतील काही नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. खरंतर अनेक गोष्टींची साठवण आपण सतत करीतच असतो. ‘माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे’ असं एक इंग्रजी सुभाषित आहे. (Man is a social animal) त्याचबरोबर ‘माणूस हा संग्रह करणारा प्राणी आहे’ असं एक नवीन सुभाषित करायला हरकत नाही. किती किती गोष्टींची साठवण आपण करीत असतो. पैसा, धान्य, पुस्तकं एवढंच नव्हे तर आपण अनेक माणसंही जोडत असतो... म्हणजे एका अर्थानं आपण माणसांची माणसांची साठवणच करीत असतो. अशोक दादा पाटलांनी आयुष्यात अनेक उपद् व्याप (चांगले) केले. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक चांगली मातब्बर माणसं जोडली. उदाहरणार्थ - बी. शंकरानंद, विद्यानंद मुनी, रत्नाप्पा कुंभार इत्यादी. श्रामंतीची खरी व्याख्या करतांना फडक्यांनी एका ठिकाणी लिहिल आहे. खरा श्रीमंत कोण? आणि त्याचं उत्तर त्यांनीच दिल आहे... जो चांगले मित्र जोडतो तो. या व्याख्येनुसार प्रस्तुत लेखकाची गणना कोट्याधीश, अब्जाधीश म्हणूनच करावी लागेल. आठवणींची साठवण हे एक ‘पत्रांच कलेक्शन’ आहे. हल्ली टेलिफोन, मोबाईल, ई-मेल, यामुळं परंपरागत चालत आलेला पत्रप्रपंच जवळपास थांबला आहे. पूर्वी अनेक पुस्तकं ‘पत्ररूपातच’ दिसत. जसे की, नेहरूंची पत्रे, इंदिरेने लिहिलेली पत्रे, टिळक, आगरकरांची, गांधीजींची पत्रे इत्यादी अनेक थोरा मोठ्यांचं आयुष्य पत्ररुपानं आजमितीस जिवंत आहे. समंतभद्र महाराजांचं ‘पत्र पियुष’ हे पुस्तक एक उत्कृष्ट वाङमयीन कलाकृती आहे. पत्र रुपान प्रसिद्ध झालेलं वाङमय एकत्र केल्यास तो एक मोलाचा ऐतिहासिक ठेवाच ठरेल यात संशय नाही. पंचाहत्तरीनंतरही माणूस कर्तृत्ववान राहू शकतो याचं श्री. अशोक दादा पाटील हे खणखणीत उदाहरण आहे. त्यांनी ज्या झपाट्याने अलीकडील काळात लेखन केलं आहे त्या झपाट्याने तारुण्यात लिहिलं असतं व ते प्रकाशात आलं असतं तर आज त्यांच्या नावावर शेकड्यांनी पुस्तकं दिसली असती पण, प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील त्यांच्या आयुष्यात उशिरा आले या नियतीला काय म्हणावे? जीवनाचा गाभा जाणणा-या व प्रचंड अनुभवांचा साठा असणा-या थोर व्यक्तीस: कवी अशोक दादा पाटील यांना शतशः नमन व शंभर पुस्तके लिहून त्यांनी शंभरी गाठावी एवढे शुभभाव सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने प्रगट करून शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो व अधिकाधिक साहित्यसेवा त्यांच्या हातून घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो. - बी. बी. गुरव, सेवा निवृत्त प्राचार्य एम. जी. शहा विद्यामंदिर, बाहुबली 02322 - 224161, 9421287107

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)