Dnyanbhaskar (ज्ञानभास्कर) Dr. Hemchandra Ratansa Vaidya / Pravin Hemchandra Vidya (Kavita Sagar)
Dnyanbhaskar (ज्ञानभास्कर) Dr. Hemchandra Ratansa Vaidya / Pravin Hemchandra Vidya (Kavita Sagar)

Dnyanbhaskar (ज्ञानभास्कर) Dr. Hemchandra Ratansa Vaidya / Pravin Hemchandra Vidya (Kavita Sagar)

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Dnyanbhaskar (ज्ञानभास्कर) Dr. Hemchandra Ratansa Vaidya / Pravin Hemchandra Vidya (Kavita Sagar, Jaysingpur - 416101) मानवी जीवनात ज्ञान चक्षुशिवाय असलेली व्यक्ती ही आंधळी आणि सुसंस्काराचे अधिष्ठान नसलेली व्यक्ती पांगळी असते. ज्ञान आणि सुसंस्कार या दोहोंनी विभूषित व्यक्तीच ख-या अर्थाने ‘मानव’ या संज्ञेस प्राप्त होते. याच उद्देशाने प्रेरित होऊन परमपूज्य गुरुदेवश्री १०८ समन्तभद्र महाराज यांनी आधुनिक गुरुकुल शिक्षण प्रणालीचा पाया घातला. त्याकरिता १९१८ साली कारंजा (लाड) येथे आणि त्यानंतर १९३४ साली श्री अतिशय क्षेत्र बाहुबली (कुंभोज) येथे अनुक्रमे ‘श्री महावीर ब्रह्मचर्याश्रम’ आणि श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम’ या गुरुकुलांची स्थापना केली व त्यांच्या संवर्धनासाठी नि:स्वार्थी, ध्येयवादी कार्यकर्त्यांची मालिका तयार केली. तत्त्वज्ञान कितीही मोठे असले तरी तत्त्वज्ञान प्रत्यक्षात जगणारी माणसे फार कमी असतात. पूर्वीच्या काळी ‘वाहून घेणे’, ‘समर्पण वृत्ती’ या शब्दांना एक निश्चित अर्थ होता. त्या काळातील लोकांनी दिवसाचे अठरा - अठरा तास एखाद्या कार्याला वाहून घेऊन काम केले. तसेच चित्र श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम या संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बाबतीत दिसून येते.   प्रसिद्धीची हाव नाही, त्यागाचा डंका नाही तत्त्वाशी तडजोड नाही, कामात चुकारपणा नाही   मुरणीच्या पावसासारखे संस्थेच्या कार्यासाठी सतत राबत रहायचे असा ध्येयवाद या लोकांनी जोपासला म्हणूनच या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत गेली.      महाराजांनी अनेक अभ्यासू व ध्येयवादी कार्यकर्ते तयार केली. त्यांनी जिनवाणीचे महात्म्य श्रावकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. आज धर्माविषयी बरीच अंधश्रद्धा आहे. त्याचे एकच कारण म्हणजे तत्त्वज्ञानाविषयीचे अज्ञान.   देव, गुरु, शास्त्र, वीतराग धर्म इत्यादींच्या ख-या स्वरूपाचे ज्ञान नसल्याने, कांही कुलपरंपरेने चालत आलेल्या रूढी, कांही एकमेकांचे पाहून अंगीकार केलेल्या गोष्टी, कांही इतर धर्मियांचे संस्कार व कांही स्वतःच्या भौतिकवादाला जोपासणा-या स्वतःच्याच मतिकल्पना यामुळे ख-या धर्माचे स्वरूपाच लक्षात येत नाही. सुखाच्या शोधार्थ निघालेल्या प्रवाशांचे तारू अशांततेच्या वादळात हेलकावे खाऊ लागतात. त्यांना सुरक्षित किनारा दाखविणारा आशेचा किरण, एका दीपस्तंभाची गरज असते. त्यासाठी परमपूज्य प्रथमाचार्य शांतीसागर महाराज व परमपूज्य गुरुवर्य समन्तभद्र महाराज यांचे चरित्र म्हणजे एक पथदर्शक दीपस्तंभच होय.   ‘थोर महात्मे होऊनी गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा.’   या आश्रमातून अनेक धर्मशील कार्यकर्ते महाराजांनी तयार केले. ही परंपरा टिकवणे हे आपणा सर्वांचे उत्तरदायित्व आहे.  कालचक्राच्या गतीशी नाते राखण्याचा प्रयत्न करीत मानवाने प्रचंड मजल गाठली आहे. गेल्या २५ - ३० वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञान यात झालेल्या प्रगतीमुळे ‘ग्लोबल व्हिलेज’ ही संकल्पना मूर्तस्वरुपात उतरली आहे. या परिस्थितीत मनुष्य पूर्वीपेक्षा अधिक सुखी व आनंदी असायला हवा परंतु प्रचंड भौतिक प्रगती करूनही तो अधिक दु:खी व तणावग्रस्त जीवन जगत आहे. याला उत्तर जैन धर्माचा, जैन तत्त्वज्ञानाचा, जैन साधुसंतांनी व भगवान महावीरांनी सांगितलेल्या विश्वव्यापी अकारत्रयी तत्त्वज्ञानाचा अवलंब करावा लागेल. महाराजांच्या चरित्रातून हाच बोध मिळतो. आज या संस्थांमधून ज्ञान संपन्न, नीती संपन्न व सामर्थ्य संपन्न पिढी घडत आहे. ही परंपरा आचार्य कुंदकुंदाचार्यापासून ते २०व्या शतकातील दिगंबर समाजातील श्रेष्ठ आचार्यांपर्यंत चालू आहे.   जैन समाजातील दुसरी उल्लेखनीय परंपरा म्हणजे समाजातील लेखक, शास्त्रीजी, विचारवंत, संशोधक व कलावंत यांची आहे. प्राचीन काळातील जैन तत्त्वज्ञानाची वैचारिक पायावर मांडणी करून या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य या लोकांनी सातत्याने केले आहे. यामध्ये डॉ. हेमचंद्र रतनसा वैद्य यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. हे पुढे संक्रमित होणे गरजेचे आहे.   गेल्या अनेक वर्षांपासून असे जाणवत राहिले की, सर्व सामान्य जनांना सुबोध, सुस्पष्ट, सोप्या सरळ मराठीत जैन धर्माबद्दल सम्यक कल्पना देणारे चरित्र ग्रंथ कमीच आहेत. जीनधर्म व तत्त्वज्ञान इतके विशाल व विस्तृत आहे की, सर्वसामान्य श्रावकांना ते समजून घेणे अशक्य होते. जैन ग्रंथात इतके वैविध्य आहे की, काय संग्रहीत करावे, ग्रहण करावे व काय सोडावे याचा निर्णय होत नाही परंतु जैनधर्म रत्नत्रय प्रधान आहे. व त्याच्या विवेचनातून जैन धर्माचे सार सांगता येणे शक्य आहे. हे काम ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य यांनी परमपूज्य समन्तभद्र महाराज यांचा चरित्र ग्रंथ ‘ज्ञानभास्कर’ यातून केले आहे. त्यांचे पिताश्री डॉ. हेमचंद्र रतनसा वैद्य यांनी अनेक वर्षे महाराजांच्या सानिध्यात घालविले सबब ते संस्कार त्यांचे चिरंजीव प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य यांच्यावर झाले आहेत. गुरुकुलातून घेतलेले शिक्षण व तसेच वाचन व लेखन याचा व्यासंग त्यामुळे परमपूज्य समन्तभद्र महाराज यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्त त्यांचे विस्तृतपणे व सूक्ष्म अभ्यास करून लिहिलेले चरित्र जयसिंगपूर येथील कवितासागर प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित होत आहे. हा एक मणिकांचन योग आहे. या बद्दल संपादक प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांना धन्यवाद.   प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य  यांनी अत्यंत मुद्देसूद व सोप्या भाषेत महाराजांचे चरित्र लिहिले असून त्यातून जैन तत्त्वज्ञानाचे उत्तम विवेचन ही केले आहे. ‘ज्ञानभास्कर’ हा ग्रंथ आपल्या समाजाला अत्यंत प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे. या अत्यंत स्तुत्य, अशा उपक्रमाबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.   जयसिंगपूर येथील प्रतिथयश प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांच्या ‘कवितासागर’ या प्रकाशन संस्थे मार्फत ‘ज्ञानभास्कर’ चरित्र ग्रंथाचे प्रकाशन होत आहे. यामुळे जागतिक स्तरावर या ग्रंथाचा प्रसार व प्रचार होणार आहे. प्रकाशक यांचे अभिनंदन करून ही प्रस्तावना पूर्ण करतो.   - अॅड्. सनतकुमार आरवाडे, अध्यक्ष, श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम, बाहुबली   ·        चरित्रग्रंथ - ज्ञानभास्कर   ·        ISBN 978-81-934308-1-1 ·        संशोधक - डॉ. हेमचंद्र रतनसा वैद्य ·        संपादक - प्रा. प्रविण हेमचंद्र वैद्य ·        मूल्य - 350/- ·        प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील ·        प्रकाशन - कवितासागर प्रकाशन संस्था, जयसिंगपूर ·        संपर्क - 02322 225500, 9975873569, 8484986064   ·        ईमेल - sunildadapatil@gmail.com

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)