Nisarggandh (निसर्गगंध) - अशोक दादा पाटील (बेळगाव)
Nisarggandh (निसर्गगंध) - अशोक दादा पाटील (बेळगाव)

Nisarggandh (निसर्गगंध) - अशोक दादा पाटील (बेळगाव)

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

- डॉ सुनील दादा पाटील, संपादक आणि प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर सुदर्शन, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र मोबाईल - 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com Dr. Sunil Dada Patil Editor and Publisher of KavitaSagar Publication, Jaysingpur Sudarshan Palace, Plot # 16, Padmavati Society, Near Nandani Naka, Bypass Road, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India Ph: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com - दर्पण… कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन् मरती जणू ती गवताची पाती... या पृथ्वीतलावर अनेक माणसे, प्राणी, जीव - जंतू जन्माला येतात व मरूनही जातात. त्यांचे जगणे म्हणजे अगदी गवताच्या पात्याप्रमाणे असते. पण काही माणसे अशी जन्माला येतात की, इतरांप्रमाणे सर्व जीवनावश्यक गोष्टी करतातच पण त्याच्याच जोडीला... ज्या भूमीवर जन्माला आलो त्या भूमीची शपथ मला मातृभूमीच्या कल्याणाहून जगण्याचा ना हक्क मला असे उदात्त ध्येय मनी बाळगून देशाचा विचार करून मातृभूमीसाठी कार्य करणारे काही ध्येयवेडी माणसेही असतात. अशाच माणसांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री. अशोक दादा पाटील. वय वर्षे 86 वर्षे!! राष्ट्रसेवा दलाचे बाळकडू मिळालेले, 1945 मधील राष्ट्रीय चळवळीत हिरीरीने सहभागी होऊन तावून सुलाखून निघालेले एक कणखर व्यक्तिमत्व! शिक्षकी पेशा, सामाजिक कार्य, संसार इत्यादी निटनेटके करत असतांनाच स्वतःतील कविमनाला जागृत ठेवण्याचे महाकठीण कार्य श्री. अशोक पाटील यांनी लीलया पेलले आहे, ही खरोखरच कौतुकास्पद व आम्हां तरुणांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक अशी बाब आहे. अशा ख-या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या कवीच्या कवितासंग्रहाची प्रस्तावना माझ्या सारख्या नवोदित कवीस; साहित्य सेवकास लिहिण्याचे भाग्य मिळावे ही मी माझी पूर्वपुण्याई समजतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात... बोलावे मोजके | नेमके, खमंग, खमके | ठेवावे भान | देश, काळ, पात्राचे || बोलावे बरे | बोलावे खरे | कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे || अगदी याचं प्रमाणे श्री. अशोक दादा पाटील यांच्या कविता आहेत. नेमके, खमंग आणि खमके तेशी देश, काळ, वेळ व गरजेस अनुसरून. प्रस्तुतच्या निसर्गगंध या कवितासंग्रहात कविवर्यांनी विविध सामाजिक, राजकीय, भावनिक इत्यादी विषय अगदी सहजतेने लीलया हाताळले आहेत. जणू त्यांच्या लेखणीतून साक्षात सरस्वतीच अवतरली आहे की काय असे वाटते. यमक, मुक्तछंद यासारख्या शब्दालंकाराची योजना करत असतांनाच काही ठिकाणी स्वतःची अशी स्वतंत्र काव्यशैलीही त्यांनी तयार केलेली आहे. सर्व विषय जरी हाताळले असले तरी कवीचे मन हे निसर्गातच जास्त रमलेले आहे असे जाणवते. कारण मानवी जीवन हे सभोवतालच्या निसर्गावरच अवलंबून असते. म्हणूनच आपल्या कवितेत ते म्हणतात... देव जसा दीनापाठी देत असे आधार तद्वतच अबोल वृक्ष दमत्याचा कैवार समाजात आजकाल स्वतःपुरते, स्वतःसाठी जगणा-यांची संख्या खूपच वाढत आहे. ‘आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी’ यातच अनेकांचे आयुष्य वाया जात आहे. हा स्वार्थ नेमक्या शब्दात मांडतांना कवी अशोक दादा पाटील म्हणतात... स्वार्थ सर्वांना आंधळे करून नित्य नेमाने ठकवीत असते दुबळे मन डोक्यावर हात ठेवून हताश जगणे जगत असते अशा प्रकारे कविवर्यांनी आपल्या निसर्गगंध या कवितासंग्रहात सध्या भेडसावणा-या अनेक समस्येवर निर्भीडपणे आपले मत काव्यरुपात व्यक्त केले आहे. भ्रष्ट्राचार, दारिद्रय, स्त्री भ्रृणहत्या, आत्महत्या या सारख्या सामाजिक समस्येवर भाष्य करत असतानांच त्यावर केवळ रडगाणे न गाता अगदी योग्य ते उपाय ही सुचवले आहेत. कवीचे मन हे खूपच हळवे, मृदू आहे कारण श्रमिक, शेतमजूर, बाप, आईची महती, आपत्तीग्रस्त माणसे, दारिद्रय, या विषयावरील विविध कवितेत त्यांचं मन आक्रंदते. कांही वेळेस महापूर त्सुनामी ग्रस्तांची अवस्था पाहून मेणाहून मऊ असणारे कवीचे मन वज्राहून कठोरही बनते. नदी, समुद्र यांना खडे बोल सुनावण्यासही मागे पुढे पाहत नाही. आपल्या ‘सागरा’ या कवितेत ‘त्सुनामी’ रूप धारण करून, आपल्या रौद्ररूपाने असंख्य मानवांची कत्तल करणा-या सागराला ते सुनावतात... ‘सावध - सागरा, सावध हो अगस्ती येईलच येईल...’ आजकाल तरुण मुले मुली विविध व्यसनामध्ये समस्येमध्ये गुरफटून, पाश्चिमात्यांचे अनुकरण करत असत्याची कास धरत आहेत. म्हणूनच पुढील शब्दात कवी अशोक पाटील सत्याची महती सांगतात. सत्य हे सत्यच असतं म्हणून ते चिरंतन असतं असत्याला आलेलं तेज क्षणात सारं काळं पडतं रोजच्या जीवनात घडणा-या विविध घटना, प्रसंग यांचे बारकाईने निरीक्षण करून त्यांचे अचूक वर्णन श्री. अशोक दादा पाटील यांनी आपल्या कवितेतून केलेले आहे. आता कवींचे वय झाले आहे पण ते केवळ शरीराने थकले आहेत. मनाने ते अजूनही तरुणच आहेत आणि ते त्यांच्या कवितेवरून जाणवते. माणूस कितीही सामाजिक प्राणी असला तरी कांही वेळा त्याला एकांतही प्रिय असतोच. त्यावेळीच त्याची प्रतिभा शक्ती ख-या अर्थाने स्फुरण पावते. अशा एकांतातच कविवर्यांनी अनेक कविता लिहून त्यावरही मात केली आहे. म्हणूनच आपल्या एका कवितेत ते म्हणतात... आपण असतो एक एकटे येतो एकटे, जातो एकटे सोबत असते दैव एकटे जीवनी असते फूल नी कांटे प्रस्तुत निसर्गगंध कवितासंग्रह हा सर्वगुणसंपन्न झाला आहे कारण यामध्ये बालचमुसाठी खास ‘मेजवानी’ आहे. आजकाल इंग्रजी गाण्यामुळे मराठी बालगीते मागे पडताहेत असे वाटतं होते पण श्री. अशोक दादा पाटील यांची बालगीते म्हणजेच संस्कार - शिक्षण यांच्या जोडीला करमणुकीचे एक खणखणीत दालन असेच म्हणावे लागेल. विविध पक्षी, प्राणी यांच्या जीवनावरील बालगीतांमधून त्यांचे गुणदोष सहज सोप्या अलंकारिक भाषेत मांडली आहेत. आजी - आजोबा, दरवेशी, कुंभार, सुतार, लोहार या हरवत चाललेल्या व्यक्तींची ओळख आपल्या बालकवितांच्याद्वारे कविवर्यांनी करून दिलेली आहे. म्हणूनच ‘निसर्गगंध’ हा कवितासंग्रह बालचमुंनी अवश्य वाचावा असाच आहे. आपल्या कवितेद्वारे एक प्रकारचे तत्वज्ञान सा-या जगाला सांगत श्री. अशोक दादा पाटील वयाच्या 86 व्या वर्षीही साहित्य शारदेची सेवा करीत आहेत. हे खरोखरंच कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या ह्या साहित्याला प्रकाशित करण्याचं शिवधनुष्य प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांनी उचलले आहे; त्यासाठी त्यांचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. उपेक्षित, दुर्लक्षित पण प्रतिभावंत लेखक - कवी यांना सन्मान, प्रतिष्ठा देण्याचं ‘कवितासागर’ नावाचे एक विचारपीठ प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांनी निर्माण केले आहे. त्याच कवितासागर प्रकाशनाच्या वतीने श्री. अशोक दादा पाटील यांचा ‘निसर्गगंध’ हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. सामाजिक, भावनिक, नैसर्गिक जाण वाढवणा-या कवितांचा हा संग्रह वाचकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. प्रतिभावंत, अष्टपैलू कवी श्री. अशोक दादा पाटील यांच्या ‘निसर्गगंध’ या कवितासंग्रहास मन:पूर्वक शुभेच्छा! व त्यांचे उर्वरित आयुष्य सुख समाधानाचे व आरोग्याचे जावो तसेच त्यांची लेखणी अशीच तळपत राहो ही सदिच्छा! शेवटी त्यांच्याच भाषेत... ओबड धोबड देह असा परी करुणा हृदयात पितृभावना ममता वसते, त्याच्या अंतरात सकलासाठी सदा जगावे, झिजवावे तन नित जनाच्या मनी सदा बसावे, अमर ही रीत... - डॉ. कुमार रामगोंडा पाटील लेखक - कवी - संपादक - समीक्षक, आणि संमेलनाध्यक्ष - रानमाळात साहित्य संमेलन 9595716193, 7040804349

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)