Niyati (नियती) - कृष्णा ज्ञानू पाटील
Niyati (नियती) - कृष्णा ज्ञानू पाटील

Niyati (नियती) - कृष्णा ज्ञानू पाटील

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

- डॉ सुनील दादा पाटील, संपादक आणि प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर सुदर्शन, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र मोबाईल - 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com Dr. Sunil Dada Patil Editor and Publisher of KavitaSagar Publication, Jaysingpur Sudarshan Palace, Plot # 16, Padmavati Society, Near Nandani Naka, Bypass Road, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India Ph: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com - कथासंग्रह ‘नियती’चे दर्पण… कृष्णा पाटील यांनी ‘नियती’ कथासंग्रह लिहिला हे समजताच तो वाचण्यास कधी मिळेल या विचारात असतांनाच जयसिंगपूर येथील कवितासागर प्रकाशनचे कार्यकारी संचालक व प्रकाशक डॉ. सुनिलदादा पाटील यांनी ‘नियती’ या कथासंग्रहाचे हस्तलिखित माझ्या हाती देऊन या कथासंग्रहासाठी तुम्हांला प्रस्तावना लिहायची आहे असे सांगून मला एक सुखद धक्का दिला. मी कृष्णा पाटील यांचा पहिला कथासंग्रह ‘विधिलिखित’ मी यापूर्वी वाचला होता. त्यातील कथा मला खूप आवडल्या त्या कथावरती अभिप्राय लिहिला होता. पण तो त्यांच्यापर्यंत पोहचवणे राहून गेले. आणि आता त्याच्या दुस-या कथासंग्रहाची प्रस्तावना लिहिण्याची संधी मला मिळाली. कृष्णा पाटील यांच्या लिखाणात एक अजब जादू आहे. एक कथा वाचली की दुसरी वाचायलाचं पाहिजे. दुसरी कथा वाचली की तिसरी कथा वाचावी अशी त्यांच्या लिखाणात अजब जादू आहे. त्यांचे लिखाण पुढे पुढे वाचण्याची मनाला भुरळ पडते. आणि पूर्ण पुस्तक केव्हा संपले हे कळत नाही. त्यांच्या कथा छोटया - छोटया असून त्या अर्थपूर्ण आहेत. एखाद्या टी. व्ही. मालिकेचा भाग होऊन गेल्याचा भास होतो. लिखाणामध्ये सहजता असावी. ती वाचकांच्या मनाला भावते आणि ती सहजता मला कृष्णा पाटील यांच्या लिखाणात दिसून येते. अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, त्यांच्या लिखाणामध्ये सत्याचा स्पर्श आहे. त्यांच्या या कलाकृतीतील सर्वोत्तम असलेली ‘धरणीमाता’ ही कथा मनाला चटका लावणारी आहे. लेखकाने आपल्या खुबीने आणि एका वेगळ्या लिखाण शैलीने आपल्या समोर हा कथासंग्रह मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा कथासंग्रह आपल्याला खूप आवडेल अशी आशा करतो. - रमेश शिवाजी इंगवले, लेखक - कवी - संपादक - समीक्षक, आणि संमेलनाध्यक्ष - संवाद साहित्य संमेलन, शिरढोण 9637370129, 8855886446 कृष्णास शुभेच्छा अर्थात् - शिंपल्यातील मोती ‘नियती’च्याच मनात असावं की ‘नियती’ हे कृष्णा ज्ञानू पाटील यांचं पुस्तक प्रकाशित व्हावं आणि तसं हे प्रकाशित होत आहे. असं म्हणण्याला दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे याच प्रकाशनाच्या वतीनं अर्थात कवितासागर प्रकाशनाच्या वतीनं गेल्याचं महिन्यात श्री. अशोक दादा पाटील (वय वर्षे 86) यांचा ‘आहुती’ हा कथासंग्रह ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, संभाजीपूर यांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात प्रकाशित झाला. याच प्रकाशनाच्या वतीनं लगोलग ‘नियती’ या कथासंग्रहाचं प्रकाशन होत आहे. दुसरं कारण म्हणजे कृष्णा पाटील यांच्या सारख्या जकात नाक्यावर काम करणा-या लेखनिकानं कथा लिहाव्यात ही सर्वसामान्य वाचकांना भुवया उंचवायला लावणारीचं घटना आहे. अशा जागेवर काम करणा-यांच्या मनात कथाबीज फुलावीत व ही फुलं आकर्षक व सुगंधीत व्हावीत हा त्याहून आश्चर्याचा भाग आहे. कृष्णा पाटलांच्या कथा एक सलग वाचताच मनी भाव उमटतात की; अरे यांच्या लेखनात साने गुरुजींची सुगमता व रचना सौष्ठव आहे. आण्णाभाऊ साठ्यांच्या लेखणीचं आकर्षण ‘कथाबीज’ हे सामर्थ्य आहे. फडक्यांच लालित्य आहे तसेच वि.स. खांडेकरांचं तत्वचिंतनही आहे. ‘आकांत’ या कथेत भाचीच्या नव-याचं अपघाती निधन झाल्याचं भाचीला उशीरा समजल्यानंतर तिनं केलेला ‘आकांत’ व ‘माझं धनी कुठं आहेत’ ही तिनं फोडलेली किंकाळी ही काळजाला पाझर फोडणारी आहे. दुस-याच माणसाच्या मयताला जाण्याचा ‘चकवा’ हा ‘चकवा’ या कथेत घडतो. तर तिस-या स्त्रीभृणाची हत्या वाचवणारा ‘चतुर गणा’ वाचकांच्या मनावर आनंदाचा शिडकावा करतो. अठराविश्व दारिद्रयानं गांजलेल्या लेखकाला धरणीमातेच्या पोटात सोन्याच्या मण्याची माळ सापडते व त्याची आई व कुटुंब आर्थिक संकटातून वाचतात. ती ‘धरणी मातेची कथा’ वाचकाला केवढा तरी मानसिक दिलासा देते. स्वत:च्या मनाविरुद्ध मांडवली करून लेखक हातात आलेली रिंगची गेम शाळेच्या भल्यासाठी हरतो ही ‘घुसमट’ कथा लेखकाच्या मनाचं मोठेपण व दिलदार वृत्ती दाखविणारी आहे. ‘जगावं कसं’ या कथेत शिवा काशीद दोन घटका का होईना पण छत्रपती शिवाजी महाराजासारखा जगतो या वाक्यानं या कथेची ऊंची खरोखरंच एकदम वाढते यात शंका नाही. मित्राच्या पत्नीशी अत्यंत विश्वासाचे वासनेच्या पलीकडचे नाते ही असू शकते हे ‘नात्यांच्या पलिकडचं’ या कथेत आकर्षकरित्या रेखाटले आहे. ‘पैसा’ या कथेत सामान्य माणसाकडे असणारी माणुसकी कांही वेळा डॉक्टरांकडेही दिसत नाही या बाबतचे बहारदार चित्रण आले आहे. ‘विरंगुळा’ ही कथा तशी थोडी ‘हटके’ च आहे. हे ‘हटके’ पण काय आहे ते कथा वाचूनच जाणा व पोट धरून हसा. कल्पना विलासाचा फुलोरा ‘स्वर्गाची वारी’ या कथेत जसा पाहणेस मिळतो तसेच ‘मेजर प्रकाश पाटील’ यांच्याबद्दलचा कृतज्ञता भावही या कथेत पाहणेस मिळतो. वेळीच घातलेला टाका नऊ टाके वाचवितो हे स्वतःच्या मुतखडयाच्या आजारा आधारे लेखकाने आपणासमोर छान पैकी ‘एक टाका’ या कथेत उभे केले आहे. जयसिंगपूर शहरातली एक मातब्बर व्यक्ती म्हणजे धनपाल आण्णा झेले. त्यांचं हुबेहूब शब्दचित्र आणि त्यांच्या स्वभावातले अनेक पैलू व बारकावे ‘झेले आण्णा’ या शब्दचित्रात्मक कथेत लेखक रेखाटतात. एकंदरीत पाहता ‘नियती’ या कथासंग्रहाच्या निमित्ताने ‘कृष्णा ज्ञानू पाटील’ यांच्या साहित्य सेवेत मोलाची भर पडली आहे. आकाशवाणी वरील कथाकथनाचे निमित्त असो वा गावोगावी अधून मधून होणा-या त्यांच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने असो वा त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांच्याद्वारे असो कृष्णा पाटील अधिकाधिक प्रकाशात येत आहेत ही जयसिंगपूर नगरीमधील ‘आम आदमी’ च्या दृष्टीनं आनंदाची बाब आहे. पण या ठिकाणी आणखी एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे आणि तो म्हणजे डॉ. सुनील पाटील या तरुण प्रकाशकाचा. हा ध्येयवेडा तरुण जणू दुर्बीण घेऊन समाजातील आबालवृद्ध लेखक-लेखिकांचा, कवी-कवयित्रींचा शोध घेत आहे. त्यांना लिहितं करीत आहे. प्रसंगी आर्थिक झळ सोसून त्यांचं लिखाण प्रसिद्ध करीत आहे. जयसिंगपूर परिसरात एक मोठ्ठी ‘साहित्यिक चळवळ’ या निमित्तानं उभी राहत आहे. अनेक ‘शिंपल्यांचे मोती’ बनत आहेत. त्यांची ‘ग्रंथदिंडी’ चालू झाली आहे. त्यांत अनेक नवे-जुने ‘साहित्यिक वारकरी’ अत्यंत आनंदाने सामील होत असून, हे एक सुचिन्ह आहे. त्यांच्या या कार्यास शुभेच्छा. कृष्णा ज्ञानू पाटील यांना धन्यवाद. त्यांच्या हातून अशा अनेक साहित्यकृती घडत राहोत ही प्रभू चरणी प्रार्थना. - बी. बी. गुरव, सेवा निवृत्त प्राचार्य एम. जी. शहा विद्यामंदिर, बाहुबली 02322 - 224161, 9421287107 o Title - Niyati (नियती) o Author - Krushna Dnyanu Patil (कृष्णा ज्ञानू पाटील) - 9890559700 o Subject - Collection of Stories (कथासंग्रह) o Total 60 Pages including covers. o Price - Rs. 60/- (मुल्य 60 रुपये) o Published in India in 2015 by - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील) On Behalf of KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन) o 02322 - 225500, 09975873569 o www.KavitaSagar.com, sunildadapatil@gmail.com

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)