Poetry - Pavasach Vay (पावसाचं वय) - Dr. Vyankatesh Jambagi - Kavita Sagar, Jaysingpur
Poetry - Pavasach Vay (पावसाचं वय) - Dr. Vyankatesh Jambagi - Kavita Sagar, Jaysingpur

Poetry - Pavasach Vay (पावसाचं वय) - Dr. Vyankatesh Jambagi - Kavita Sagar, Jaysingpur

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Recent Clips

Pavasach Vay (पावसाचं वय) - Dr. Vyankatesh Jambagi - Kavita Sagar, Jaysingpur     भिजण्यापूर्वी...   कवित्व असावे निर्मळ | कवित्व असावे सरळ || कवित्व असावे प्रांजळ | अन्वयाचे ||   या समर्थ रामदास स्वामींच्या उपरोक्त ओवीप्रमाणे मी प्रांजळपणे सांगू इच्छितो की, मनात आले तसे सरळ लिहिले...! वास्तविक मी वैद्यकीय क्षेत्रातला... साहित्य, संगीत, नाटक याची अत्यंत आवड असलेला...!   स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ५०व्या (१९८१) वाढदिवसानिमित्त सहज त्यांच्या आद्याक्षरावरून एक रचना केली आणि त्यांना पाठविली. एक महिन्यानंतर त्यांच्या लेटरहेडवर कवितेबद्दल आभार प्रदर्शित करणारे पत्र आले... खूप उत्साह आला... थोडं थोडं लिहित गेलो...   महाविद्यालयीन व इतर काव्य स्पर्धेत काही बक्षिसे मिळविली... ‘काव्यवाचन’ कसे करावे हे ही शिकलो... कविता आवडल्याचे काहीजण आवर्जून कळवितात... उमेद वाढते!   कविता स्फुरतांना प्रत्येकवेळी मन नभासारखं दाटून येतं. मग ती कविता कागदावर उतरली की बरं वाटतं...   आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर... युवा, प्रौढ आणि वृद्ध अशा प्रत्येक अवस्थेत... कवितेपूर्वीची अस्वस्थता असते... दाटलेल्या मेघांसारखी...! मग शब्दांचा पाऊस...! या पावसाला प्रत्येकवेळी काही सांगायचं असतं...   ‘पावसाचं वय’ कितीही असू दे... त्याला जे सांगायचं ते सांगून तो मोकळा होतो... मेघांना मोकळा करतो! हा पहिला काव्यसंग्रह आपणा समोर सादर करतांना खूप आनंद होतोय!   ज्या अंकातून काही कविता पूर्व प्रकाशित झाल्या त्या संपादकांचे मनापासून आभार! मला नेहमी मार्गदर्शन करणारे गुरुवर्य प्रा. वैजनाथ महाजन यांनी प्रस्तावना लिहिल्याबद्दल त्यांना धन्यवाद.     ‘पावसाचं वय’ या काव्यसंग्रहात समाविष्ट असलेल्या काही कविता खालील नियतकालिकात पूर्व प्रकाशित आहेत. षटकार(चंद्रकिरण काव्य मंडळ, तळेगाव), शिलेदार (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), युगबोध, कामगार जगत, दैनिक सकाळ, सद् भाव, संवेदना इत्यादी.     माझ्या कवितासंग्रहाचा एक वाचक म्हणून आपण आपले अभिप्राय पाठवावेत हेच या कवितासंग्रहाचे सार्थक आहे.   जयसिंगपूर येथील ‘कविता सागर’ प्रकाशन संस्थेचे संचालक व प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी माझा पहिलाच प्रयत्न प्रकाशित केला त्यांचे आभार आणि अत्यंत  समर्पक मुखपृष्ठ तयार करणारे श्री. सागर सदाशिव सगरे यांचे मन:पूर्वक आभार.            - डॉ. व्यंकटेश जंबगी 9975600887, 7769005605 ·        काव्यसंग्रह - पावसाचं वय ·        ISBN 978-81-934308-3-5 ·        कवी - डॉ. व्यंकटेश जंबगी ·        मूल्य - 80/- ·        पृष्ठे - 68 (कव्हरसह) ·        प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील ·        प्रकाशन - कवितासागर प्रकाशन संस्था, जयसिंगपूर ·        संपर्क - 02322 225500, 9975873569, 8484986064   ·        ईमेल - sunildadapatil@gmail.com

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)