Sadbodhan (सद् बोधन) - Pravin Hemchandra Vaidya (प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य) - KavitaSagar Publication
Sadbodhan (सद् बोधन) - Pravin Hemchandra Vaidya (प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य) - KavitaSagar Publication

Sadbodhan (सद् बोधन) - Pravin Hemchandra Vaidya (प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य) - KavitaSagar Publication

  • Sadbodhan (सद् बोधन) - Pravin Hemchandra Vaidya (प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य) - KavitaSagar Publication
  • Price : Free
  • KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

एक आगळावेगळा प्रेरणादायी कथासंग्रह सद् बोधन     कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर या प्रकाशन संस्थेचा संस्थापक आणि संपादक - प्रकाशक या नात्याने कथा, कविता, लघुकादंबरी, दीर्घकादंबरी, चरित्रे अशा विविध प्रकारच्या लेखन साहित्याची ५६५ पुस्तके छापील स्वरुपात आणि तेवढीच ऑनलाइन स्वरुपात जगभरातील करोडो मराठी वाचकांच्या पर्यंत उपलब्ध करून दिली. कला, साहित्य, पुरोगामी विचार, चळवळी, महापुरुषांची चरित्रे, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, बालसाहित्य याचबरोबर व्यक्तिमत्व विकास विषयक पुस्तके विशेष सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली आहेत. लेखक - वाचक यांना आनंद मिळवून देण्याच्या कार्यात नव - नवीन लेखक - कवींचा परिचय व सुसंवाद घडवत आहोत व अखंडपणे अनेक कार्यक्रमातून, प्रकाशन सोहळ्यातून, मुलाखतीतून, साहित्य संमेलनातून हा सुसंवाद सातत्याने घडवत आहोत. शोध, संशोधन, विज्ञान, इतिहास, कला, आरोग्य, शिक्षण, बालसाहित्य, करिअर या विषयांवर आधारित आमच्या पुस्तकांना मोठी मागणी आहे.   जयसिंगपूर येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघातील एका कार्यक्रमाच्या प्रसंगी निवृत्त प्राध्यापक प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य यांचा परिचय आणि संवादाला सहा महिन्यापूर्वी सुरुवात झाली. (जून २०१६)   प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य बाहुबली विद्यापीठातून १० वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले. ते एक जाणकार, अभ्यासू आणि सन्मती, महापुरुष या नियतकालिकांचे सहाय्यक संपादक म्हणून वाचकांना चांगलेच परिचित आहेत. त्यांचे अध्यात्मिक लेखन उद् बोधक कथा अनेक नियतकालीकातून प्रकाशित होत आल्या.   प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य यांनी बाहुबली विद्यापीठातील त्यांच्या सेवा काळात अत्यंत निष्ठेने प्राध्यापकी केली, आपल्या विषयांचे सखोल वाचन, चिंतन, लेखन आणि मनन केले. अनेक साहित्यिक संमेलने अवलोकिली आणि सेवानिवृत्त झाले.   सेवानिवृत्ती नंतर पुढे काय? हा प्रश्न त्यांना कधीच भेडसावला नाही. कारण पुढे संपूर्ण वर्षभर त्यांनी वाचन व लेखन केले व पुस्तक रूपाने साहित्य प्रकाशित करण्याची योग्य वेळ, योग्य व्यक्ती याचा शोध घेत राहिले. या दरम्यान आमचा सुसंवाद झाला आणि पुस्तक प्रकाशनास आरंभ झाला.   त्यांचा पहिला कथासंग्रह ‘उद् बोधन’ प्रकाशित झाला १ जुलै २०१६ मध्ये, त्यामध्ये एकूण १७ कथांचा समावेश आहे. कथा लघु, कंटाळा न येणा-या आणि मोजक्या शब्दात मांडलेल्या, वाचकांचे चित्त वेधून घेणा-या असून प्रत्येक कथेतून काही बोध व्हावा अशा आहेत. ओघवती भाषा काही सुभाषितांचा कथेनुरूप वापर मोठ्या कौशल्याने लेखकाने केला आहे.   प्रकाशक म्हणून माझ्या कार्यात त्यांचे पूर्ण सहकार्य आहे आणि सतत संपर्क - संवादाने पहिला कथासंग्रह लवकरच प्रसिद्ध झाला.   पहिल्या कथासंग्रहाला प्रचंड प्रतिसाद आणि प्रसिद्धी मिळू लागताच दुस-या कथासंग्रहाची चर्चा सुरु झाली.   दुसरा कथासंग्रह ‘सुबोधन’ १५ ऑगस्ट २०१६ ला प्रकाशित झाला. त्यामध्ये १३ कथांचा समावेश होता. त्यातील कथा ह्या पशुपक्षांच्या प्रचलित कथांमधून त्यांच्या स्वभावातील साधर्म्याची मानव स्वभावास मिळती जुळती वैशिष्टये घेऊन कथा लेखन झालेले दिसते अर्थात पहिल्या व दुस-या कथासंग्रहास ही उत्तम प्रतिसाद मिळाला लगेच तिसरा कथासंग्रह ‘प्रबोधन’ ३ सप्टेंबर २०१६ ला प्रकाशित झाला. वाचकांच्या प्रचंड प्रतिसादाने तीनही कथासंग्रह रसिक वाचकांच्या पर्यंत पोहचली.     दरम्यानच्या काळात सदर लेखकाच्या पूर्वीच्या विस्कळीत स्वरूपातील अन्य नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या लेखांच्या लेखसंग्रहाचे प्रकाशन करण्याचे ठरले व ‘तत्त्वप्रकाश’ नावाचा लेखसंग्रह अर्थात चौथे पुस्तक १८ सप्टेंबर २०१६ ला प्रकाशित झाले.   पुन्हा कथासंग्रहाने उसळी घेतली आणि पाचवे पुस्तक कथासंग्रह ‘सद् बोधन’ चे प्रकाशन करण्यासाठी लेखकाने मला गळ घातली. हा कथासंग्रह उद् बोधन, सुबोधन, प्रबोधन यांच्यापेक्षा वेगळे कथाविषय आणि इतिहास किंवा पौराणिक कथांच्या आधारे लिखित काही कथांचा यात समावेश आहे. एवढे करूनही प्रत्येक कथा जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून जाते. भाषा सौंदर्य, वर्णन शैली, प्रसंगोचित संवाद यांचा तारतम्याने समावेश करून अधिक रंजकता, वास्तवता प्रदर्शित होते. कुठे अवडंबर नाही, पाल्हाळीकता नाही किंवा दुर्बोधता आढळत नाही.   त्यांच्या प्रत्येक कथेतून औत्सुक्य, प्रेरणा, ज्ञान आणि नवी वैचारिक दिशा मिळते. सहज विनोदातून, संभाषणातून खूप काही सांगून जाणा-या कथा वाचकांना लेखक प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य यांनी दिल्या आहेत.   एकूणच त्यांच्या लेखनाचा वेग अधिकच आहे. हे मान्यच करावे लागते कारण सलग सहा महिन्यात त्यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली. समाजाभिमुख होऊन लेखन ही काळाची गरज आहे त्याचे भान लेखकाने ठेवून अगदी लहानापासून ज्येष्ठांपर्यंत केवळ मनोरंजन न करता जीवन संदेश देण्याचे काम अतिशय कौशल्याने त्यांच्या कथासंग्रहाच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळेच त्यांच्या कथासंग्रहांना तज्ज्ञ समीक्षकांनी मनापासून दाद दिली आहे.   ‘सद् बोधन’ या कथासंग्रहाच्या प्रकाशनाबरोबरच प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य यांनी स्वतः प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनीच या कथासंग्रहाचे समीक्षण करावे असा आग्रह धरला, माझ्या कामाचा व्याप त्यांना विदित आहे. केवळ त्यांच्यावरील स्नेहामुळे, जिव्हाळ्यामुळे मी ही जबाबदारी स्वीकारली; त्यामुळे विनाविलंब लेखनाचे बंधन आलेच.   ‘सद् बोधन’ या त्यांच्या पाचव्या पुस्तकाचे वाचन करतांना अध्यात्माबरोबरच संत कबीराचा दोहा, त्यातील कबीराचे मौलिक विचार अत्यंत स्पर्शून जाणारे वाटतात. माणूस खोट्या पारंपारिक जीवनाचे समर्थन करतांना ख-या त्यागमय जीवनाकडे कसा पाठ फिरवतो हे आत्मीयतेने सांगतात.   ‘जाणीव’ कथेतून आपला शेवट जवळ येऊनही संसाराचे स्तुतीगान करणारे काही कमी नाहीत. क्षणभंगुर जीवनाची निदान जीवनाच्या संध्याकाळी तरी जाणीव व्हावी हे तत्त्वज्ञान ‘जाणीव’ कथेतून लेखकाने अत्यंत विचारपूर्वक लिहिले आहे.   ‘मूर्खांचा शिरोमणी’ या कथेत मनुष्य स्वभाव कसा परिस्थितीनुसार बदलतो त्याचे चित्रण आहे. भारतीय संस्कृतीत आतिथ्याचे महत्व सहजच शिकवून जाणारी ही कथा आहे.   ‘मुलाखत’ या कथेत प्रत्येक मनुष्य बुद्धीचा फार वापर न करता केवळ सुखासीन जीवन कसे भोगू इच्छितो या गोष्टी संवादरूपाने लेखकाने वाचकांना दिलेल्या कानपिचक्याच म्हणाव्या लागतील. जे मनुष्य जन्मात प्राप्त होऊन नको ते करत जो बसतो त्याचे जीवन व्यर्थच आहे.   ‘ब्रम्हज्ञानी’ ही कथा ‘अष्टावक्र’ या महान विद्वानाच्या जीवनातील एका घटनेवर आधारित आहे. राजा जनकाच्या गुरुस्थानी असलेला ‘अष्टावक्र’ हा शरीराने जरी वक्र असला तरी ज्ञानी होता हे वरील कथेतून आणि ‘अष्टावक्रा’ च्या महान विद्वत्तेचे दर्शन घडविते.   ‘वारसदार’ ही कथा संस्थानिकांच्या अनियंत्रित, अनागोंदी आणि निष्ठूरपणाने राजसत्ता भोगणा-या संस्थानिकांच्या अन्यायाने वारसदाराने सुरक्षिततेसाठी उचललेले पाऊल या कथेतून एक वेगळा आणि यथोचित निर्णय घेणा-या राजपुत्राचे वर्णन वाचून ‘योग्य झाले’ राजपुत्राला न्याय मिळाला याचे समाधान वाटून जाते.   ‘पूज्यता’ या कथेतून ‘तपस्वी’ आपले विकार जिंकून त्यावर आरूढ जो होतो तोच पूज्य आणि वंदनीय ठरतो. अतिशय कल्पकतेने, प्रसंगोत्कट आणि सुक्ष्म अवलोकन अध्यात्म अभ्यासाचा परिपाक असलेली ही कथा दीर्घकाळ मनात खोलवर परिणाम करून जाते.   ‘कायाकल्प विद्या’ या कथेतून महापुरुषाची आपल्या शरीरावरील ममत्वाचा त्याग केल्याने सिद्धी प्राप्त होते याचे वर्णन आहे.   ‘राजा भर्तृहरीचा सन्मार्ग’  भर्तृहरीचा परिचय, त्याच्या मनाचे परिवर्तन व त्यांनी निवडलेला शेवटचा सन्मार्ग योग्य वाटतो.   या कथासंग्रहातील शेवटची कथा ‘खेळ पूर्व संचिताचा’ सम्राट श्रेणिक राजाचा पुत्र वारिषेण यांच्या जीवनावर आधारित ही कथा आहे. अत्यंत कठोर प्रसंगातही हे पूर्वसंचिताचे खेळ आहेत हे ओळखून त्या स्थितीतही स्थितप्रज्ञता न सोडणारा वारिषेण. मानवास पुन्हा एकदा आपल्या जीवनाचे रहस्य उलगडण्याची संधी देऊन जातो, अंतर्मुख होण्यास भाग पाडतो.   प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य यांच्यासारख्या जीवनतत्त्व, जीवनप्रवाह आणि तत्त्वज्ञान सरळ, सोप्या आणि आकलन सुकर अशा कथारुपातून समाजापुढे येण्याची आवश्यकता पाहून आणि सुदैवाने अशा कथांच्या प्रकाशनाची संधी मला त्यांच्या सहवासाने मिळाली.   त्यांच्या आगामी प्रकाशित होणा-या चरित्रलेखन, सुभाषितसंग्रह आणि विविध साहित्याच्या लेखन प्रकाशनासाठी मी त्यांना अंत:करणापासून शुभेच्छा देतो. ‘कवितासागर प्रकाशन संस्था’ आणि ‘कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप’ कायम स्वरूपी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहील आणि त्यांचे विविध विषयांवरील साहित्य जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध मार्गाने प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी मी ग्वाही संस्था प्रमुख या नात्याने देतो.   त्यांचे उर्वरित जीवन आरोग्य संपन्न, ज्ञानार्जनाबरोबर पुढील प्रकाशन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. २०१६ साली प्रकाशित १५ दिवाळी अंकातून प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य यांच्या अनेक कथा, लेख आणि समीक्षा प्रकाशित झाल्या असून; २०१६ साली प्रकाशित ७ दिवाळी अंकांचे अतिथी संपादक होण्याची त्यांना संधी मिळाली याचा आनंद आणि रसिकांच्या साहित्याभिरुचीला खाद्य मिळाल्याचा आनंद खूप मोठा ठरतो.                        - डॉ. सुनील दादा पाटील, (कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर या प्रकाशन संस्थेचे संस्थापक, संचालक आणि भारतातील ज्येष्ठ प्रकाशक आहेत.) Ph: 02322 225500, 9975873569, 8484986064       कथासंग्रह - सद् बोधन लेखक - प्रा. प्रविणकुमार हेमचंद्र वैद्य स्वागत मूल्य - 80/- प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर संपर्क -  02322 - 225500, 09975873569, 08484986064   ईमेल - sunildadapatil@gmail.com, kavitasagarpublication@gmail.com  

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)