Short Novel - Order Order (लघुकादंबरी - ऑर्डर ऑर्डर) - Mahadev Aannappa Kamble (महादेव आण्णाप्पा कांबळे)
Short Novel - Order Order (लघुकादंबरी - ऑर्डर ऑर्डर) - Mahadev Aannappa Kamble (महादेव आण्णाप्पा कांबळे)

Short Novel - Order Order (लघुकादंबरी - ऑर्डर ऑर्डर) - Mahadev Aannappa Kamble (महादेव आण्णाप्पा कांबळे)

  • Short Novel - Order Order (लघुकादंबरी - ऑर्डर ऑर्डर) - Mahadev Aannappa Kamble (महादेव आण्णाप्पा कांबळे)
  • Price : Free
  • KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

ऑर्डर ऑर्डर महादेव आण्णाप्पा कांबळे कवितासागर प्रकाशन 02322 - 225500, 09975873569 KavitaSagar कवितासागर Registered with the International ISBN Agency, London, UK and the Government of India, Ministry of Human Resource Development, New Delhi • Title - Order Order (ऑर्डर ऑर्डर) • Author - Mahadev Aannappa Kamble (महादेव आण्णाप्पा कांबळे) Near Mahalaxmi Temple, Yalgud - 416236, Taluka - Hatkangale, District - Kolhapur, Maharashtra, India, Telephone: 7350651588 • Year of Publication - March 08, 2016 (मार्च 08, 2016) • Editions - First (प्रथम आवृत्ती) • Volume - One (खंड पहिला) • Price - Rs. 80/- (मुल्य 80/- रुपये) • Subject - Sociological Short Novel (sसमाजशास्त्रीय लघुकादंबरी) • Language - Marathi (मराठी) • Total 68 Pages including covers. • Copyright © Mahadev Aannappa Kamble (महादेव आण्णाप्पा कांबळे) All rights reserved. No part of this publication may be reproduced, stored in a retrieval system or transmitted, in any form or by any means, electronic, mechanical, photocopying, recording or otherwise, without the prior permission of the copyright holder. Only the publisher can export this edition from India. Due care has taken to ensure that the information provided in this book is correct. However, the publishers bear no responsibility for any damage resulting from any inadvertent omission or inaccuracy in the book. • Published in India in 2015 by - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील) • On Behalf of KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन) Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India 02322 - 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com • Typesetting by - Dhudat Desktop Publishing Center • Cover Design by - Shrikant Shinde (श्रीकांत शिंदे) • Printed and Bound in India by - KavitaSagar Printing Services • Views expressed in this book are entirely those of the respective Authors and do not represent the opinions or thoughts of the Publisher लेखकाचे मनोगत ऑर्डर ऑर्डर ही माझी कादंबरी सर्व प्रथम चाकोरीबाह्य आणि अननुकरणीय आहे. यातल्या विषयावर - घटनेवर - समस्येवर आजपर्यंतच्या लेखकांनी खूप सखोल आणि विदारक तसेच अंत:करण पिळवटून टाकणारे लेखन केले आहे. (काही काल्पनीक काही सत्य घटनेवर) ही एक कालोनकाल घडत आलेली मानवतेला कलंक लावणारी हीन प्रवृत्त्तीतून घडणारी घडीभराची घटना आहे. पण कित्येक आयुष्य उध्वस्त होतात. त्यांना सक्षम न्याय मिळतोच असे नसते. अन्याय उतावीळपणे अन्याय करुन रिकामा होतो. पण पीडीत उध्वस्त मनाने संथ कायद्याकडून योग्य आणि वेळेवर न्याय मिळवू शकत नाही. त्यात अन्यायी आर्थिक दृष्टया सबल आणि पीडीत सर्वच बाजुने दुर्बल असेल तर न्याय मिळविणे तर सोडाच पण कायदयाची पायरी चढायला धजावत नाही. हीच परिस्थिीती लक्षात घेवून, सदर कादंबरीची नायिका कायदा क्षेत्रातली असताना सुध्दा पीडीताला चाकोरीबाह्य नितिशास्त्राने कसा न्याय मिळवून देते. त्याहीपेक्षा अन्यायकर्त्याला शासन कशी देते. ही विषय हाताळणी मला लोकांसमोर माडंताना अस्वीकारणीय आहे याची खात्री आहे. पण केवळ मला प्रगट झालेल्या ज्ञानाशी प्रामाणिक रहाणेच्या हेतूने लेखन केले आहे. ही कादंबरी केवळ चार दिवसात लिहून पूर्ण केली आहे. अन्यायी कितीही असंस्कृत असला तरी त्याला सुसंस्कृत कायद्यानेच शासन करण्याची पध्दत असलेमुळे सदर कादंबरीची मांडणी-नायिकेचा निर्णय चाकोरीबाह्य व अननुकरणीय वाटतो. पण पीडीताची दुर्बलता आणि न्यायव्यवस्थेचा संथपणा लक्षात घेता नायिकेने घेतलेला निर्णय अव्यवहार्य असला तरी, अन्यायीला अलिप्तपणे शासन करणे आवश्यक होते. माझ्या ऑर्डर ऑर्डर या कादंबरीचं पाहिलं श्रेय डॉ. अनिता खेबुडकर यांना दिल्याशिवाय पुढं जाण म्हणजे अक्षम्य कृतघ्नता होईल. ज्यांनी माझ्या लिखाणाला प्रामाणीकपणाने वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांच्याकडूनच होईल असा विश्वास होता. याच त्यांच्या विश्वासाला सार्थ करण्याचा आणि ही लघुकादंबरी जणू स्वतःची समजून प्रकाशित करण्याचा जो जीवापाड प्रयत्न केला त्या डॉ. सुनील पाटील यांचे माझ्यावर जे उपकार झाले आहेत. ते पाहता मी केवळ आभार व्यक्त करण म्हणजे खूप खालच्या दर्जाचं होईल. परमेश्वराजवळ मी एवढीच प्रार्थना करतो की, या करिता फूल ना फुलाची पाकळी इतके काही करण्याची ऑर्डर दे, शक्ती दे. तिसरे श्रेय माझ्या लघुकादंबरीला ज्याचं समीक्षण लाभलं ते विचारवंत मंगेश विठ्ठल कोळी यांना कारण समीक्षण म्हणजे लिखाणाला चढवलेला मुकुट असतो, ते काम त्यांनी केले आहे. पुढे माझ्या हस्तलिखिताला संगणकीय स्वरूप देण्याचे काम करणा-या श्री. म्हाळू मूढाळ आणि राहुल कोळी यांना तर विसरून चालणार नाही. आपला नम्र, - महादेव आण्णाप्पा कांबळे, यळगूड ऑर्डर ऑर्डर - प्रस्तावना लेखक महादेव आण्णाप्पा कांबळे यांचे ऑर्डर ऑर्डर हे पुस्तक वाचताना आपल्या समाजातील अनेक कमकुवत असलेल्या परिस्थितीचा आढावा मिळतो तसेच भारतीय न्याय व्यवस्था ही जगात सर्वात श्रेष्ठ न्याय व्यवस्था म्हणून पहिली जाते परंतु मराठी मध्ये एक म्हण आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब या म्हणी प्रमाणे न्यायव्यवस्था ही संथगतीने कशा पद्धतीने चालते याचा आढावा लक्षात घेता येईल आणि काही वेळा न्याय देण्यासाठी इतर ही उपाय योजावे लागतात हे समजते. लेखकाने एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या कामातून निर्माण होते म्हणजे आपण समाजातील अनेक व्यक्तींना ते करीत असलेल्या कार्यामुळे ओळखतो. त्यानुसार स्वतः आपण काय काम करतो तशी स्वतः ची ओळख निर्माण होत असते. या पुस्तकातील वकिलाची भूमिका असणारे पात्र सुद्धा अशाच प्रकारची ओळख असणारे आहे. कोणाच्याही मदतीशिवाय आणि स्वतः च्या कुशाग्र बुद्धीने, बोलण्याच्या कौशल्यातून आणि शारीरिक हालचालीतून स्वतः ची एकवेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या पुस्तकामध्ये स्त्रीवर झालेल्या अन्याय आणि त्या नंतर तिच्या जगण्यातील बदलाची स्थिती लेखकाने खूप छान पद्धतीने लिहिली आहे. अचानक आलेल्या प्रसंगामुळे अनेकांचे जीवन उध्वस्त झाली असल्याची लाखो उदाहरणे आज समाजामध्ये आपणास पहावयास मिळतात. स्वतः च्या हातून न केलेल्या चुकीची शिक्षा मात्र आयुष्यभर भोगावी लागते. अशा वेळी जवळ असणा-या व्यक्ती सुद्धा सारड्या सारखे रंग बदलून टिकाकारांच्या भूमिकेत असतात आणि नको त्या शब्दामध्ये, नको त्या व्यक्तीसमोर, आणि नको असलेल्या ठिकाणी टिका केली जाते. त्याचा एखाद्याच्या मानसिक तसेच शारीरिक त्रासाला कंटाळून अनेकजण नको ते पाऊल उचलतांना आपण पाहतो. आपल्या समाजामध्ये अत्याचार घडलेल्या स्त्री किंवा पुरुषाला वाळीत टाकले जाते. परंतु त्याचा नेमका अपराध काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात नाही. उलट ज्या गोष्टीबद्दल आपल्याला संपूर्ण ज्ञान नाही अशाच गोष्टींवर अनेकजण तासन् तास गप्पा करत बसतात आणि स्वतः च्या अल्प बुद्धीने इतरांवर घाणेरडे आरोप केले जातात. लेखक महादेव कांबळे यांनी ऑर्डर ऑर्डर या पुस्तकामध्ये घेतलेला काल्पनिक प्रसंग आहे. परंतु समाजामध्ये अनेक ठिकाणी दररोज अशा प्रकारच्या प्रसंगाला अनेकांना सामोरे जावे लागते. त्यांच्या मानसिक आणि शारीरिकतेचा कोणीही विचार करत नाही. मराठीमध्ये एक छान म्हण आहे, दुस-याला सांगे ब्रह्म ज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशा प्रकारचे वर्तन करणा-या व्यक्तीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एखाद्या व्यक्तीने केलेल्या अपराधाची शिक्षा त्याला कायद्याच्या शिस्त बद्धतेने देता येत नसली तर कायद्याच्या बाहेर जाऊन परंतु मानवतेच्या हिताने योग्य अशा प्रकारचे निर्णय घेतले. लेखकाने या पुस्तकामध्ये समाजातील खूप चांगल्या आणि वास्तववादी विचारला स्पर्श केला आहे. यावर एखाद्या ठिकाणी उत्तमोत्तम नाटक नक्कीच समाजातील सर्वच स्तरातून पसंतीला उतरेल अशी माझी खात्री आहे. लेखक महादेव आण्णाप्पा कांबळे पुढील लिखाणासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. - मंगेश विठ्ठल कोळी (लेखक-संपादक-समीक्षक) रूपा निवास, पुष्पक चित्रमंदिरच्या मागे, गणेशनगर, शिरोळ - 416103, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र संपर्क : 9028713820, mangeshkoli@gmail.com

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)