Spandan Navya Jaganyache (स्पंदन नव्या जगण्याचे) - अ‍ॅड्. स्वाती हांजी (बेळगाव)
Spandan Navya Jaganyache (स्पंदन नव्या जगण्याचे) - अ‍ॅड्. स्वाती हांजी (बेळगाव)

Spandan Navya Jaganyache (स्पंदन नव्या जगण्याचे) - अ‍ॅड्. स्वाती हांजी (बेळगाव)

  • कवितासंग्रह - Spandan Navya Jaganyache (कवितासंग्रह - स्पंदन नव्या जगण्याचे) - अ‍ॅड्. सौ. स्वाती हांजी (बेळगाव)
  • Price : Free
  • KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

- डॉ सुनील दादा पाटील, संपादक आणि प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर सुदर्शन, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र मोबाईल - 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com Dr. Sunil Dada Patil Editor and Publisher of KavitaSagar Publication, Jaysingpur Sudarshan Palace, Plot # 16, Padmavati Society, Near Nandani Naka, Bypass Road, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India Ph: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com - पुस्तक परिचय … ... स्वातीताईचा पहिला काव्यसंग्रह, हा काव्यसंग्रह वाचतांना कवयित्रीच्या मनात असलेले प्रेमाच्या नात्यांबद्दलचं महत्व क्षणोक्षणी अधोरेखित होत जात. आईची महती शब्दातील आहे, अनेक कवी - लेखकांनी यापूर्वी ती शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे, ‘मातृ देवो भव’ या संकल्पनेचा अर्थ स्वातीताई खालील शब्दात मांडतात... अल्लाह आणि ईश्वराचा संगम असेल जिथे, वात्सल्यमूर्त आईचे अस्तित्व वसेल तिथे. ‘आई हा शब्दच हृदयस्पर्शी आहे’ असं त्यांना वाटत आणि ‘नऊ दिस अन् नऊ मास मरण यातना सोसल्या तिन’ ह्या शब्दात त्या आईने आपल्यासाठी सोसलेल्या कष्टांची जाणीव व्यक्त करतात. कोणत्याही पिढीसाठी मातृत्व भावना कायम विलोभनीय असते हेच त्या आपल्या ‘चाहूल चिमुकल्याची’ या कवितेतून सांगतात. आई मी होणार कल्पनेनी रंगले मी सप्तरंगी. आगमनाच्या आधीच झाले मन हे माझे हळवे, ह्या शब्दातून त्या मातृत्वाची ओढ व्यक्त करतात. आई होण्यात जे सुख आहे ते त्या ... स्वप्नाहुनी सुंदर आहे हे वात्सल्यातील सत्य आई होण्याच्या कल्पनेनेच जागले माझे अस्तित्व असे सांगतात. ‘स्त्री भ्रूणहत्या’ ह्या ज्वलंत प्रश्नाला स्वातीताई अगदी सहजपणे स्पर्श करतात. आपल्या ‘कल्पनेतील कळी’ या कवितेत त्या म्हणतात. कन्येसारख्या रत्नाला जर नको म्हणेल कुणी, आई - बहिणीच्या नात्याला ठरेल अखेरची ही सलामी. त्यांनी नकळत सर्व समाजालाच हा इशारा दिलेला आहे. त्यामुळेच आईपण हिरावून घेणा-यांना कळणार तरी कधी? एका जीवाची हत्या यांची ठरते असंख्य नात्यांचा बळी. असा ultimatum ही त्या देतात. मुलगा आणि मुलगी यामध्ये भेद नाही हे सांगताना त्या म्हणतात... बाळकृष्णाचे रूप घेऊनी लवकर येवो तो अंगणी, ‘ती’ असेल तरी चालेल होईल ती घरची चांदणी. तसेच पोरगी असून सुद्धा पोरासारखं धाडस करतंय, पोरगीच मला हाय म्हणून दोन घास तरी मिळतंय. मातृत्वाची, स्त्रीत्वाची जाणीव तर कवयित्रीला आहेच पण स्त्रीच ‘मानिनीच’ रूपही त्या विसरलेल्या नाहीत. अबला ही नारी आता सबला म्हणून रहाणार, अंगावर आलेल्यांना आता शिंगावरचं घेणार. असही त्या ठणकावून बजावत आहेत तसेच ‘जिद्द’ कवितेतून स्वतःची जिद्दही दाखवत आहेत. त्याचबरोबर पती पत्नीच्या नात्यातला हळुवारपणाही त्या ‘नात्यातील ऋणानुबंध’ मध्ये सांगून जातात. स्वातीताईना शिक्षण - संगीत अशा क्षेत्राबद्दलही आपुलकी असल्याच त्यांच्या ‘शिक्षकदिन’ व ‘सप्तसूर’ या कवितांवरून जाणवत. या कवितासंग्रहाच आणखी एक वैशिष्टय म्हणजे बालकविता; लहान मुलांसाठी कांही लिखाण करण हे खरोखर अवघड असतं. लहान मुलांच भावविश्व शोधायला आपल्याला पण लहान मुल व्हावं लागतं आणि ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. म्हणून तर कै. साने गुरुजींनी म्हटलंय की, ‘करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूंशी तयाचे’ ही एवढी अवघड गोष्ट स्वातीताईना सहज जमून गेली आहे. बडबडगीत, चिऊताई, प्राण्यांची सभा, सुट्टी या कवितांमध्ये लहान मुलांच्या भावना अगदी चांगल्याप्रकारे व्यक्त केल्या आहेत. मात्र खेळाबरोबर, गंमत करण्याबरोबरच आयुष्यात फक्त मजाच करायची नाही तर ‘यश’ मिळवण व त्यासाठी ... जगणं मरण तर ठरलेलंच असतं जीवनात काहीतरी करून दाखवायचं असतं हे गंभीर तत्वज्ञान त्या सहज सांगून जातात. त्यांच्या भारतमाता, मन, शक्ती वा-याची, पाऊस ह्या कविताही छान झालेल्या आहेत. स्वातीताईचा हा कवितासंग्रह निश्चितच सर्वाना आवडेल. त्यांच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)