Tattavprakash (तत्त्वप्रकाश) - Pravin Hemchandra Vaidya (प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य) - KavitaSagar Publication
Tattavprakash (तत्त्वप्रकाश) - Pravin Hemchandra Vaidya (प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य) - KavitaSagar Publication

Tattavprakash (तत्त्वप्रकाश) - Pravin Hemchandra Vaidya (प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य) - KavitaSagar Publication

  • Tattavprakash (तत्त्वप्रकाश) - Pravin Hemchandra Vaidya (प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य) - KavitaSagar Publication
  • Price : Free
  • KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Tattavprakash (तत्त्वप्रकाश) - Pravin Hemchandra Vaidya (प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य) - KavitaSagar Publication, Jaysingpur - शुभाशीर्वाद     दिग्देशेभ्य खगा एत्य संवसन्ति नगे नगे | स्व स्वकार्यवशाद्यांति देशे दिक्षु प्रगे प्रगे ||   अनेक दिशांतून, प्रदेशांतून अनेक पक्षी संध्याकाळी एका महावृक्षाच्या आश्रयाला येतात आणि प्रात:काळ होताच ते सर्व पक्षी आपापल्या कामासाठी भिन्न भिन्न प्रदेशांना निघून जातात.   आचार्यांनी या श्लोकातून अत्यंत नैसर्गिक उदाहरण देऊन संसारस्वरूप सांगितले आहे. या संसारात एकेंद्रियापासून पंचेद्रियांपर्यंत अनंतानंत जीवांचा निवास आहे. या संसाराचे स्वरूप त्यांनी एका महानवृक्षाचा दृष्टांत देऊन केलेला आहे. जसे एखाद्या वृक्षावर विविध प्रकारचे पक्षी दिग् - दिगंतरातून येऊन विश्रांती घेतात. तसेच या संसारातील माणसे या संसारात येऊन राहतात. कोण कोठून आला? कशासाठी आला? त्याचे येण्याचे प्रयोजन काय? हे त्यांनाही माहित नाही. ती सारी माणसे आयुष्य संपताच वेगवेगळ्या दिशेने म्हणजे चारही गतीला निघून जातात. हे संसाराचे मोठे सुंदर चित्र आहे. ज्यांना आपण आपले सगेसोयरे, माता, पिता, पुत्र, भगिनी, पत्नी समजतो, समजत होतो व ज्यांच्यावर आतोनात प्रेम केले ती सारी मंडळी आपणांस विसरून आणि एकटे सोडून निघून जातात.   आचार्य अमृतचंद्रानी प्रवचनसारात असे म्हटले आहे की, ‘हा जीव संसारात एकटाच असतो. दु:खे, सुखे एकटाच भोगतो. ज्ञान एकटाच मिळवतो. सुखही एकटाच भोगतो. इतकेच नव्हे तर तो जीवात्मा मुक्त झाल्यावर मोक्षातही एकटाच असतो.’ म्हणून आचार्य आपणास सांगतात -   भगवान बनने की ताकत है तुझ में क्यों भान बैठे है पुजारी समे   प्रा. प्रविणकुमार हेमचंद्र वैद्य हे बाहुबली विद्यापीठाचे एक ध्येयवादी मराठी भाषेचे उत्तम शिक्षक म्हणून नावारूपास आले. त्याचबरोबर त्यांच्या उत्तम लेखन शैलीने वाचकांचे विशेष लक्ष वेधले आहे. प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य यांनी जैन आचार पद्धतीचे सोपे व सुबोध तत्त्वलेखक ‘तत्त्वप्रकाश’ मधून लिहिले आहे. शिवाय  उद् बोधन, सुबोधन, प्रबोधन, सद् बोधन इत्यादी मराठी कथासंग्रहांचे यशस्वी लेखन ही केलेले आहे.   या पुस्तकाचे सर्वांनी वाचन करून आपले कल्याण करून घ्यावे असे वात्सल्य रत्नाकर शांतमुर्ती आचार्य सन्मतिसागरजींचे परम शिष्य प. पू. श्री १०८ अमितसागरजी महाराज यांचे असे अनेक आशीर्वचन आशीर्वाद...    2016 वर्षायोग, इचलकरंजी, जिल्हा - कोल्हापूर   ·        पुस्तकाचे नांव - तत्त्वप्रकाश ·        विषय - जैन तत्त्वज्ञानाचे विश्लेषण ·        लेखक - प्रा. प्रविणकुमार वैद्य ·        स्वागत मूल्य - 60/- ·        प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील ·        प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर ·        संपर्क - 02322 - 225500, 09975873569, 08484986064 ·        ईमेल - sunildadapatil@gmail.com

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)