Treasure of Opposite Words (विरुद्धार्थी शब्दांचा खजिना) - सौ. रोझमेरी राज धुदाट
Treasure of Opposite Words (विरुद्धार्थी शब्दांचा खजिना) - सौ. रोझमेरी राज धुदाट

Treasure of Opposite Words (विरुद्धार्थी शब्दांचा खजिना) - सौ. रोझमेरी राज धुदाट

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

- डॉ सुनील दादा पाटील, संपादक आणि प्रकाशक - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर सुदर्शन, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र मोबाईल - 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com Dr. Sunil Dada Patil Editor and Publisher of KavitaSagar Publication, Jaysingpur Sudarshan Palace, Plot # 16, Padmavati Society, Near Nandani Naka, Bypass Road, Jaysingpur - 416101, Taluka - Shirol, District - Kolhapur, Maharashtra, India Ph: 02322 225500, 9975873569, sunildadapatil@gmail.com - पुस्तक परिचय विरुद्धार्थी शब्दांचा खजिना इंग्रजी शब्दसंग्रह वाढविण्यासाठी एक उत्तम पुस्तक संगणकाचा कितीही प्रसार झाला आणि इंटरनेटच्या माध्यमातून कितीही माहिती उपलब्ध झाली; तरी ग्रंथांचे महत्व आणि अस्तित्व कायम याहते, या जगभर आलेल्या अनुभवाच्या आधारे “कविता सागर” प्रकाशन, जयसिंगपूर ने इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्यासाठी एक उत्तम पुस्तक "विरुद्धार्थी शब्दांचा खजिना" या नावाने इंग्रजी - मराठी शब्दकोश प्रसिद्ध केला आहे. अवघ्या पन्नास रुपयात तो सर्वत्र उपलब्ध आहे. इंग्रजी शब्दांचा अर्थबोध झाला नाही, तर शब्दकोश पाहण्याची सवय अनेकांना होती; पण आता नव्या जगात शब्दकोशाचे वाचन करून विविध शब्दांच्या अर्थछटा समजावून घेवून आपली भाषा समृद्ध करण्याकडे कल वाढला आहे. या शब्दकोशाचे संपादन प्रसिद्ध इंग्रजी शिक्षिका सौ. रोझमेरी राज धुदाट यांनी अथक प्रयत्न पूर्वक केले, त्यांच्या योगदानातून; विरुद्धार्थी शब्दांचा खजिना’ हा शब्दसंग्रह आकाराला आला. या साठी देखणा टाइप आणि उत्तम दर्जाचा कागद वापरला आहे. सौ. रोझमेरी राज धुदाट यांच्या अथक प्रयत्नानंतर सिद्ध झालेल्या या शब्दकोशानंतर ते आणखीही शब्दकोशाचे काम "कवितासागर" प्रकाशनासाठी करत आहेत. मातृभाषेतून शिक्षण द्यावे कि नाही, यावर खरे तर आपल्या देशाचे राष्ट्रीय धोरण असायला हवे. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ यावर मतप्रदर्शन करणार आहे, ही उत्तम बाब आहे; पण ते करण्यापूर्वी या प्रश्नाचा सर्व बाजूंनी अभ्यास, संशोधन करणारे रिसर्च संशोधक नेमून त्यांचा विचार घेणेही आवश्यक ठरेल. मातृभाषेत शिक्षण घेतले की मुलांचा ते ज्ञान आत्मसात करण्याकडे कल अधिक असतो, असे सांगणारी मंडळी आहेत, पण मुले लहान वयात एका वेळी अनेक भाषा सहजपणे शिकू शकतात आणि उलट ती जितक्या अधिक भाषा आत्मसात करतील तितक्या त्यांच्या भाषिक विकासाच्या दृष्टीने ते चांगले आहे. त्यामुळे घरी मातृभाषा आणि इंग्रजी ज्ञानभाषा, हे सूत्र किमान काळाची गरज ओळखून तरी आपण अंगीकारायला हवे. आपल्या भाषिक राज्यपद्धतीत त्या त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेला महत्व आहे; पण जातीक घडामोडींचा विचार होतो, तेंव्हा प्रादेशिक अस्मितेपेक्षा राष्ट्रीय धोरणालाच अधिक महत्व असते. साधा विचार केला तर महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठा झाल्यावर नोकरी-व्यवसायानिमित्त दुस-या राज्यात किंवा देशात गेला तर तो कोणत्या भाषेत व्यवहार करणार आहे? आपल्या देशातील विद्यापीठामध्ये, आयआयटी, आयआयएम्स मधली ज्ञानभाषा कोणती आहे? भाषेमुळे आपल्या मनातले विचार, भाव-भावना प्रकट करता येतात. भाषेशिवाय जीवनाची आपण कल्पनाच करू शकत नाही. भाषा ही आपल्याा जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपण आपल्या मातृभाषेत खूप चांगलं बोलतो, आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो. परंतू मातृभाषा सोडून आणखीन एक दोन भाषा जर येत असतील तर त्याचा देखील आपल्याला फायदा होतो हे जाणून घ्यायला हवे. असे म्हणतात 'Knowledge is not burden' ज्ञान हे ओझ नाही. इंग्रजी भाषेचे महत्व आणि वापर दिवसेंदिवस वाढवतच जात आहे. संपर्क - माध्यम म्हणून इंग्रजीला आज जे स्थान आहे ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या बर्यापच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकणे अवघड जाते . खरतरं कोणतीही भाषा सोपी किंवा अवघड अशी नसते. तर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जसा असतो त्यावर ते अवलंबून असते. जगात सुरु असलेल्या स्पर्धेचा विचार करून जगाची ज्ञानभाषा म्हणून आम्हाला इंग्रजीचा स्वीकार करावा लागेल. एखादी भाषा शिकायची झाल्यास त्या भाषेतील आपला शब्द साठा वाढविल्यास शिवाय ती भाषा आपण शिकूच शकत नाही. हे सत्य लक्षात ठेवून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. इंग्रजी शब्द संग्रह वाढवण्याची सुरुवात विरुद्धार्थी शब्दांपासून केली तर फारच उत्तम, कारण विरुद्धार्थी शब्दांचे वाचन किंवा पाठांतर करतांना कंटाळा येत नाही . पाठांतरानंतर वाचन, परत लेखन, असा आलटून-पालटून अभ्यास केल्यास. आपला शब्दसंग्रह नक्कीच वाढेल. विरुद्धार्थी शब्दांचा खजिना या पुस्तकाची इंटरनेट आवृत्ती सुद्धा प्रसिद्ध झाली असून या आवृत्तीला खूप मोठ्या प्रमाणावर वाचकांनी पसंती दर्शवली आहे. - अनिल धुदाट (पाटील) पुस्तक विरुद्धार्थी शब्दांचा खजिना लेखक सौ. रोझमेरी राज धुदाट प्रकाशक प्राचार्य डॉ. सुनील पाटील प्रकाशन कविता सागर प्रकाशन, जयसिंगपूर पृष्ठे 100 (कव्हर सह) आकार 1/8 मुल्य 100/- विषय इंग्रजी शब्दकोश वर्गवारी शैक्षणिक संपर्क 02322 225500, 9975873569 sunildadapatil@gmail.com

More books From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)