Sadhakbodh
Sadhakbodh

Sadhakbodh

  • श्रीरामरक्षा व भीमरुपी स्तोत्रांच्या अभ्यासातून साधकाला होणारा बोध
  • Price : 49.00
  • Srujanrang Prakashan
  • Language - Marathi
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Preview

दिवेलागणीला घरोघरी म्हणल्या जाणाऱ्या स्तोत्रांमध्ये श्रीरामरक्षा व श्रीभीमरुपी ही दोन स्तोत्रे येतातच. इतकेच काय घरात लहान बाळ असेल तर संध्याकाळी रामरक्षा आवर्जून म्हणण्याचा प्रघात आहे. इतक्या लहानपणापासून कानावर पडणाऱ्या व पुढे बोलता येऊ लागल्यावर रोज म्हणायच्या या रामरक्षेत आहे तरी काय नेमकं? या प्रश्नाचं उत्तर श्री. धनंजय चितळे यांच्या श्रीरामरक्षेवरील प्रवचनातून मिळालं आणि बघता बघता त्यातून एक अर्थपूर्ण, साधे सोपे पुस्तक तयार होत गेले. साधकबोध हे पुस्तक करताना आपल्या प्रत्येकातील 'राम' आपण जाणावा, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. तसेच आपण प्रत्येकाने या स्तोत्रातील प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेऊन, त्याप्रमाणे योग्य ते आचरण ठेवण्याचा प्रयत्न करावा, हाच हेतू आहे. आपल्याला स्वत:मधील रामाबरोबरच इतरांमधील राम जाणता आला तर ......आणि म्हणूनच केवळ साधनामार्गातीलाच नव्हे तर प्रत्येकाने साधक बनून हा 'साधकबोध' जाणून घ्यायला हवा.