Stotra Sumananjalee - 7
Stotra Sumananjalee - 7

Stotra Sumananjalee - 7

This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

Preview

आपल्या दैनंदिन उपासनेत स्तोत्रपठणाला विशेष स्थान आहे. भगवंताच्या कृपाप्रसादाचा हा जवळचा मार्ग आहे. आपल्या घरात विविध देव-देवतांची स्तोत्रे प्रातःकाळी व संध्याकाळी म्हणण्याचा प्रघात आहे. स्तोत्रपठणामुळे उपास्य देवतेची कृपा पठणकर्त्यास मिळते. परिणामी पठणकर्त्याला मानसिक बळ प्राप्त होते. त्याला पूर्वी प्रत्ययाला न आलेले अनुभव येऊ लागतात. प्रत्येक स्तोत्राची खरी शक्ति त्याच्या विनियोगात आहे. स्तोत्राचे शेवटी दिलेली फलश्रुती त्याला मिळते. मात्र हे स्तोत्रपठण अगदी श्रद्धापूर्वक व मनापासून असायला हवे. मंत्राप्रमाणे स्तोत्रातही विलक्षण शक्ती दडलेली असते. त्यांच्या पठणाने वातावरणात कंपने व लहरी निर्माण होतात. देवतांच्या स्तुतिपर ही स्तोत्रे असल्याने त्या देवतेस केलेली प्रार्थना देवतेपर्यंत पोहोचते. ती देवता प्रसन्न होऊन त्यांच्या आशीर्वादाने पठणकर्त्याचे कार्य सिद्धीस जाते अशी भाविकांची श्रद्धा असते. स्तोत्रपठण भक्तांच्या कार्यसिद्धीला पोषक व प्रेरक ठरतात. स्तोत्रपठणामुळे मनाला परम संतोष, आनंद व शांती मिळते. म्हणून स्तोत्रपठणाचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.