Diwali Ank - KathaSagar (कथासागर दीपोत्सव - दिवाळी अंक) कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप
Diwali Ank - KathaSagar (कथासागर दीपोत्सव - दिवाळी अंक) कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप

Diwali Ank - KathaSagar (कथासागर दीपोत्सव - दिवाळी अंक) कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप

  • KathaSagar (कथासागर दीपोत्सव - दिवाळी अंक 2016) मुख्य संपादक - अनिल धुदाट - कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप
  • Price : Free
  • KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)
  • Issues 2
  • Language - Marathi
  • Published annual
This is an e-magazine. Download App & Read offline on any device.

KathaSagar (कथासागर दीपोत्सव - दिवाळी अंक 2016) मुख्य संपादक - अनिल धुदाट - कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप........... दीपोत्सवातून कथाप्रेरणा... कथासागर दीपोत्सव २०१६ हा नव लेखक आणि अभिजात लेखकांची मांदियाळी, कथांचा दीपोत्सव प्रकाशित होतांना रसिक कथाप्रेमी, अभ्यासू, चोखंदळ वाचकांना साहित्य मेजवानी कथासागर दीपोत्सव २०१६ या दिवाळी अंकाच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे. विश्वव्यापी १०८ कथांचा एकाच दिवाळी अंकात समावेश करून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करणारे कवितासागर प्रकाशन संस्थेचे संस्थापक व प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील जेव्हा या विश्वविक्रमी विशेषांकाचे अतिथी संपादकीय लिहिण्यास आग्रह करतात, मला तो सन्मान प्राप्त करून देतात तेव्हा त्यांच्या कार्यास हातभार लावण्यास मिळालेल्या संधीला मी लगेच होकार देऊन लिहिण्यास सुरुवात केली. १०८ वर्षाच्या दिवाळी अंकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा, सर्वात महाग, सर्वात जास्त कथांचा आणि कमीतकमी लेखकांचा समावेश असलेला व संपूर्णपणे जाहिरात विरहित प्रकाशित होणारा एकमेवाद्वितीय असा दिवाळी अंक ठरला आहे. दिवाळी म्हणजे तेजाचा उत्सव. दाट अंधारातून उमलणा-या प्रकाशफुलांचा महोत्सव. आनंदाच्या विविध रंगांची उधळण करणारा, सकारात्मकतेचा प्रसाद ओंजळीत ठेवणारा सण. बदलांचं महत्व अधोरेखित करणारा क्षण. बदलांशी सहजपणानं मिसळून - समरसून जाणारा नवा अध्याय म्हणजेच दिवाळीचा महाउत्सव होय. कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुनील दादा पाटील यांच्याबाबत मी असे म्हणेन - ‘दिप दाविला तुवा प्रेषिता - उजाळाया तमा’ कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुपचे अद्वितीय कार्य पाहून डोळे दिपून जावे असा हा सुयोग आणि वाचकांची पर्वणीच म्हणावी लागेल. अव्वल दर्जाच्या या दिवाळी अंकाचे वैशिष्टय अगदीच आगळेवेगळे आहे. भारतीय कथा वाङमयाची परंपरा फार प्राचीन आहे. अगदी रामायण, महाभारत, बौद्धकथा, इसापकथा, जैन कथा, पंचतंत्र, बोधकथा यांच्या माध्यमातून असंख्य दंतकथा, तत्त्वकथा, भावकथा, सत्यकथा, दृष्टांतकथा अशा आधुनिक कथा तंत्रा पर्यंत वाचकांचे आकर्षण ठरले आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान, ऋजुता, पापभिरुता, जीवनशैली, यांचे संस्कार बीज रुजविण्यासाठी साधू-संतांना कथांचा आधार घेऊन समाजाच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न पूर्वीपासून चालत आला. कथांचे स्वरूप, भाषा, प्रसंग, घटना काळानुरूप परिवर्तीत होत राहिल्या, मानव जीवनाच्या विविध छटा, संस्कार व भाषेच्या दृष्टीने प्रमाण भाषा, ग्रामीण भाषा, प्रांतिक भाषेचा समावेश लेखकाच्या परीसरानुरूप बदलत राहिल्या. वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते, यातून जीवन संदेश देणा-या कथा अधिक रंजकता निर्माण करू लागल्या. कथा वाङमयातून विविध विषय हाताळतांना सत्यतेबरोबरच काल्पनिक विश्व वाचकांचे लक्ष वेधून घेणा-या ठरल्या आहेत. कथेतून विविध रसांचा परिपोष आढळतो. स्वभावाचे विविध रंग बहरून जातात. रति, हास्य, क्रोध, उत्साह, भय, जुगुप्सा, विस्मय तसेच अनेक रस म्हणजे वीररस, शृंगाररस, शांतरस अशा विविधांगांनी नटलेल्या कथा एका वेगळ्या विश्वाचा अनुभव प्रदान करणा-या आहेत. जीवनमुल्ये रुजवणे, बिंबवणे हे कथा साहित्याचे मूळ सूत्र आहे. दैनंदिन जीवन पध्दती, परमेश्वरावरील श्रद्धा, भक्ती, पापभिरुता, सात्विक जीवन शैली, अहिंसा, इत्यादी तत्वांचा संस्कार वाचकांच्या मनावर हळुवार ठसवणा-या आहेत. जनकल्याण व लोकाभिमुखता यांचा महापुरुषांच्या जीवनातील घटना, प्रसंगांचा अत्यंत कौशल्याने वाचकांचे चित्त वेधून घेणा-यातर काही हृदयाला भिडणा-या, हेलावून सोडणा-या, दीर्घस्मृतीत राहणा-या अशा कथांचा समावेश कथासागर दिपोत्सवामध्ये आढळतो. सामाजिक, पौराणिक घटनांच्या आधारे लिहिलेल्या कथा, लेखक ज्या वातावरणात घडतो, वाढतो, आपले जीवन व्यतीत करतो त्याचे प्रतिबिंब, त्याचा धर्म, संस्कृती, परिस्थिती, परिसर, समाजातील त्या लेखकाचे स्थान, बालवाङमयापासून नीतिकथा, रूपककथा, थोरांसाठी, ज्येष्ठांसाठी, श्रद्धा, निष्ठा, जीवनमूल्ये, समाधान, साफल्य इत्यादी घटनांचा समावेश, पशु - पक्षी यांच्या स्वभावाची वैशिष्टये, निसर्ग इत्यादी गोष्टी आपल्या दृष्टीपथात घेऊन लेखन करणारे कुशल लेखक त्यांच्या कथातून डोकावतात. भारतीय कथांचा प्रचार केवळ भारतातच नव्हे तर इतर देशातही होत आहे कारण त्या निधर्मी, माणुसकीला जागवणा-या, जपणा-या आहेत, प्रेरणा देणा-या आहेत. म्हणून कथांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे चिन्ह दिसते. मोबाईल - इंटरनेट - टेलीविजन यांच्या जाळ्यातून सुटण्याचा हा एकमेव मार्ग म्हणजे पालकांपासून पाल्यांपर्यंत कथासागर दीपोत्सवाचे वाचन - चिंतन - मनन व सुसंस्काराला प्रेरित करणारे ठरावे. लघुतेबरोबरच रंजकता, चित्ताकर्षकता या गोष्टींचा सखोल अभ्यास असलेल्या लेखक मंडळींचे लेखन, संकलित स्वरुपात अत्यंत कुशलतेने, नेटकेपणाने सुज्ञ वाचकांच्यासमोर आणण्याचे, प्रकाशित करण्याचे कौशल्य केवळ कवितासागर प्रमाणेच कथासागरचे निर्माते, अथक परिश्रमाचे, कवी - लेखकांचे हितकर्ते, नवोदितांना विचारपीठ मिळवून देणारे डॉ. सुनील दादा पाटील यांना अखंड यश व उदंड आरोग्य संपन्न - सुख समृद्धीचे आनंद विभोर जीवन लाभो अशी कवी - लेखक आणि हितचिंतकांची हार्दिक मनोकामना असून या कार्यात अविरतता राहो ही भावना व्यक्त करीत आहेत; ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानकरी होवोत ही सदिच्छा. मोठमोठ्या व्यक्तींचे आत्मचरित्रे वाचल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये बदल हा निश्चित होतो. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मत करता येते. जाणीवा विकसित होतात. चांगले वाईट समजते त्यामुळे उत्तम माणूस बनण्यासाठी ग्रंथ वाचन अत्यंत महत्वाचे ठरते. कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या वैचारिक बैठकीवर अवलंबून असते. त्यासाठी प्रत्येक समाजात पुस्तकांचे मोठ्या प्रमाणावर वाचन झाले पाहिजे कारण माणूस बनण्यासाठी ग्रंथवाचन हे आवश्यक आहे. सर्व धर्म शांतता, समता आणि विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करतात. विविध धर्म परंपरांनी नटलेल्या भारत देशात आज परस्पर प्रेम भावना निर्माण करण्याची गरज आहे. या उदात्त हेतुनेच कथासागर दीपोत्सवाची निर्मिती करण्यात आली आहे. संस्कृती संवर्धनासाठी समाजातील एकतेची आणि संगतीची भावना विकसित केली पाहिजे. समाजातील संतमहात्मे यांच्या विचारधनामुळे मानवी जीवन समृद्ध होते. जेव्हा समाज जीवनाचा तोल ढळतो, तेव्हा समाज मनावर संस्कार करण्यासाठी भगवान महावीर यांच्यासारखे महापुरुष जन्माला येतात आणि ते संस्कृतीचे वैभव वाढवितात. नित्य आनंद मिळविण्यासाठी अलौकिक दिवाळी साजरी करण्याकरिता संत अवतीर्ण झाले. ज्ञानाची दिवाळी साजरी करण्याकरिता धनाची गरज नसून विवेकाची गरज आहे. जीवनात लौकिक दिवाळी आणि अलौकिक दिवाळीसाठी पुण्याईची गरज आहे. लौकिक दिवाळी काही काळापुरती आहे तर अलौकिक दिवाळी निरंतर असून ती साजरी करण्यासाठी विवेकाची गरज आहे. प्रत्येकाच्या जीवनात विवेक आहे. पण त्याच्यावर काजळी आली आहे. देव किंवा संत हे जीवनामध्ये आलेली काजळी निवृत्त करतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये विवेक जागा झाला पाहिजे. माणूसपण हरवल्याने अत्याचार, हिंसाचार, दुराचार, भ्रष्टाचार आदींच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. विवेक जागृत करण्याचे काम संत करतात. विवेक जागृत झाला तर दारिद्रय राहत नाही. संत संगती शिवाय विवेक जागा होत नाही. विवेकदीप लावण्याचे सामर्थ्य संतांच्या जवळ आहे. उपदेश करून विचाराने पटवून देण्याचे कार्य भगवंत करतात. कथा विषय म्हटला की त्याचा रंग, रूप, आकार, प्रकार, यातील विविधता विचारात घ्यावी लागते. एखाद्या कथेचे बीज जसे असेल त्या प्रमाणात त्याची रचना, प्रसंग, व्यक्तिमत्व, भाव भावना, स्वभाव, सवयी इतकेच नव्हे तर ती कथा कोणत्या पद्धतीची, परिसरातील आहे या सर्वा बरोबरच लेखकाचे कौशल्य, वर्णन शैली, कथेची मांडणी, विषय, आशय पात्रांची निवड या सर्व गोष्टी लेखक कशा प्रकारे मांडतो की, ज्यामुळे आपली कथा वाचकांचे चित्त आकर्षून घेऊ शकते हे पाहणे मजेशीर ठरते. सर्वच कथा अशा स्वरूपाच्या असतील असे नाही तरीपण सुक्ष्म निरीक्षण, अवलोकन अशा ब-याच गोष्टी नकळत वाचक आणि लेखक यांचा सूर जुळण्यास कारणीभूत ठरू शकते. न आवडणा-या कथेच्या चारओळी वाचून पुस्तक बंद करणा-या वाचकांची संख्या लक्षात घेऊन किंवा प्रसारमाध्यमांवर मात करून आपले लेखन उत्कृष्ट कसे होईल. याचा अभ्यास असलेल्या लेखकांच्या कथा नक्कीच एक उंची गाठू शकतात यात शंकाच नाही. कथासागर दीपोत्सव मधील सहभागी सर्व लेखक बंधू - भगिनींना कथालेखनात अधिक यश लाभो व त्यांचे हातून अधिक कसदार आणि दर्जेदार कथा निर्मिती होवो आणि जन - सामान्यांच्या हृदयात आदर - सन्मानाचे भाव अढळ राहो ही सद् भावना... - अतिथी संपादक: प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य (9766581353) • दिवाळी अंक - कथासागर दीपोत्सव 2016 • मुख्य संपादक - अनिल धुदाट (पाटील) • कार्यकारी संपादक - मंगेश विठ्ठल कोळी • प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील • स्वागत मूल्य - 1000/- • पृष्ठे - 350 • प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर • संपर्क - 02322 - 225500, 9975873569 • ई-मेल - sunildadapatil@gmail.com

Diwali Ank - KathaSagar (कथासागर दीपोत्सव - दिवाळी अंक) कवितासागर इंटरनॅशनल मिडिया ग्रुप

More magazines From KavitaSagar Publishing House, Jaysingpur (Kolhapur)